Power Cut esakal
जळगाव

Jalgaon: ग्राहक वाढले, विजेची मागणी वाढली...यंत्रणा तीच! आपत्कालीन भारनियमन; 10 वर्षांत ना उपकेंद्र वाढले, ना अपग्रेडेशन

Jalgaon News : दरवर्षी ही स्थिती निर्माण होणे क्रमप्राप्त असताना, गेल्या दहा वर्षांत ‘महावितरण’ने यंत्रणा अपडेट तर केली नाहीच, शिवाय आहे ती यंत्रणाही दोषपूर्ण असल्याने जळगावकरांवर आपत्कालीन भारनियमनाचे संकट आले आहे.

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : तापमानाचा पारा ४५ अंशांवर पोहोचल्यानंतर विजेची मागणीही प्रचंड वाढली. परिणामी, आधीच सुस्त असलेल्या महावितरण कंपनीच्या यंत्रणेचा पुरता बोजवारा उडाला आहे. विजेच्या मागणीत या दोन महिन्यांत तब्बल दुप्पटीने वाढ झाली.

मात्र, दरवर्षी ही स्थिती निर्माण होणे क्रमप्राप्त असताना, गेल्या दहा वर्षांत ‘महावितरण’ने यंत्रणा अपडेट तर केली नाहीच, शिवाय आहे ती यंत्रणाही दोषपूर्ण असल्याने जळगावकरांवर आपत्कालीन भारनियमनाचे संकट आले आहे. (Jalgaon Consumers increased electricity demand increased system same)

जळगाव शहरात गेल्या महिनाभरापासून विजेचा लपंडाव सुरू आहे. दरवर्षी उन्हाळ्यातील हा अनुभव आहे. जळगावसह खानदेशात दरवर्षीच्या उन्हाळ्यात तापमानाचा पारा ४४-४५ अंशांवर जातो. यंदा उन्हाची दाहकता गेल्या दहा वर्षांतील सर्वाधिक जाणवतेय. आता सलग आठ- दहा दिवसांपासून जळगाव शहरासह जिल्ह्याचे तापमान ४२-४३ अंशांवर कायम आहे.

एकीकडे कमाल तापमान वाढत असताना, किमात तापमानही सातत्याने वाढत असल्याने दिवसभर उन्हाच्या तप्त झळांनी होरपळ आणि रात्रीच्या उकाड्याने काहिली, अशी स्थिती निर्माण झाली आहे. स्वाभाविकत: पंखे, कुलर, एसी आदी उपकरणांचा वापर मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. त्यामुळे विजेची मागणी एरवीपेक्षा जवळपास दुप्पटीने वाढल्याचे दिसत आहे.

महवितरणचे नियोजन नाही

जळगाव जिल्ह्यातील उन्हाळ्याबाबत आणि दरवर्षी विक्रमी नोंदविल्या जाणाऱ्या तापमानाबाबत कुणीही अनभिज्ञ नाही. मात्र, उन्हाळ्याची तीव्रता वाढेल, तशी विजेच्या मागणीतही वाढ होईल. त्यामुळे विजेच्या मागणीएवढ्या वीजपुरवठ्याची व्यवस्था करून ठेवणे किंवा त्यासंबंधी अंदाज घेऊन नियोजन करणे गरजेचे होते. मात्र, ‘महावितरण’ची व्यवस्था याबाबत उदासीन राहिली. त्यामुळेच मागणी वाढूनही विजेचा पुरवठा नसल्याने ‘महावितरण’ची व्यवस्था अक्षरश: कोलमडली आहे.

दरवर्षी हीच भीषणता

तापमान वाढीबाबत जळगाव जिल्ह्यात दरवर्षी हीच भीषणता दिसून येते. एप्रिल ते जून असे जवळपास अडीच- तीन महिने तापमानाचा पारा रोज ४० अंशांवर जातो. त्यामुळे उष्णतेपासून बचावासाठी नागरिकांची उपाययोजना सुरू होतात. मात्र, दरवर्षीचा हा अनुभव लक्षात घेऊनही महावितरण कंपनीने त्याबाबतचे नियोजन केल्याचे दिसत नाही. (latest marathi news)

सध्याची स्थिती अशी

सध्या जवळपास महिनाराभापासून जळगाव शहरासह जिल्ह्यातील बहुतांश भागांत सातत्याने वीजपुरवठा खंडित होत आहे. नियमित भारनियमन नसले, तरी विजेची मागणी वाढून भार वाढल्याने वीजपुरवठा ठप्प होत असल्याचे सांगितले जातेय. जळगाव शहरात तर गेल्या दोन आठवड्यांपासून रोज बहुतांश भगात तब्बल आठ- दहा तास वीजपुरवठा खंडित झालेला असतो. त्यामुळे दिवसा उष्म्याच्या त्रासाने हैराण झालेल्या नागरिकांना रात्रीही वीज गायब होत असल्याने शांत झोपही लागत नाही, अशी स्थिती आहे.

अशी वाढली मागणी

जळगाव शहराचा विचार करता एरवी (उन्हाळा नसताना) शहरातील एकूण विजेची रोजची मागणी ९८ मेगावॉट असते. त्यादृष्टीने ‘महावितरण’चे नियोजन असून, वीजपुरवठा साधारण ११० ते ११५ मेगावॉट असतो. उन्हाळ्यात, म्हणजे सध्या महिनाभरापासून विजेच्या मागणीत तब्बल दुपटीने वाढ झाली असून, रोजची शहराची वीज मागणी १८५ मेगावॉटपर्यंत गेली आहे. त्यामुळे तब्बल ७० मेगावॉट विजेचा तुटवडा आहे. त्यामुळेच शहरातील विविध भागांत वीज गायब होण्याचे प्रकार वाढले आहेत.

दहा वर्षांत अपग्रेडेशन नाहीच

महानिर्मिती व महापारेषण या कंपन्या ‘महावितरण’ला आवश्‍यकतेनुसार वीजपुरवठा उपलब्ध करून देतात. दर उन्हाळ्यात ही समस्या गंभीर होते, तरीही ‘महावितरण’ने पूर्वतयारी म्हणून त्याचे नियोजन केलेले नाही. विशेष म्हणजे, वीज उपलब्ध असूनही केवळ यंत्रणा अपडेट नसल्याने वीजपुरवठा पुरेसा होऊ शकत नाही, अशी धक्कादायक बाब समोर आली आहे.

कारण, गेल्या दहा ते १५ वर्षांत जळगाव शहरासह जिल्ह्यात विजेचे ग्राहक वाढले, उपकरणे वाढली, त्यानुसार विजेची मागणीही वाढली. मात्र, असे असताना वीज उपकेंद्र, ३३ केव्हीच्या वाहिन्यांमध्ये कुठलीही वाढ झालेली नाही, किंबहुना ते अपग्रेड केलेले नाहीत. त्यामुळेच सध्याचा विजेचा लपंडाव सुरू असून, नागरिकांना नरकयातना भोगाव्या लागत आहेत. (latest marathi news)

ही आहेत उपकेंद्रे

जळगाव शहरात एमआयडीसीतील जुन्या व नव्या क्षेत्रात १३२ केव्हीची प्रत्येकी १, अशी दोन केंद्रे, महाबळ-मेहरुणचे १, जिल्हापेठचे १, गिरणा पंपिंग १, हुडको १, निमखेडी १, शिवाजीनगरचे १, अशी उपकेंद्रे आहेत. या उपकेंद्रांशी जोडलेले पॉवर ट्रान्सफॉर्मर अपडेट केलेली नाहीत.

ट्रान्सफॉर्मवरून ज्या वाहिन्या वीज वाहून नेतात, त्या ३३ केव्हीच्या वाहिन्यांची दुरवस्था झाली आहे. कारण, त्याही दहा वर्षांत अपग्रेड केलेल्या नाहीत. जी केंद्रे, त्यावरील पॉवर ट्रान्सफॉर्मर व वाहिन्या आहेत, त्यांची क्षमता आता पूर्वीसारखी राहिलेली नाही. या सर्व यंत्रणेवर अतिरिक्त भार असल्याचे सांगितले जातेय. म्हणजेच, एवढी मोठी यंत्रणा असूनही केवळ ती गरजेनुसार अपग्रेड न केल्यामुळे आपत्कालीन भारनियमनाचे मोठे संकट जळगावकरांवर कायम आहे.

आकडे बोलतात

-एरवी शहराची मागणी (रोज) : ९८ मेगावॉट

-आताची रोजची वीज मागणी : १८५ मेगावॉट

-उपलब्ध वीज : ११५ मेगावॉट

-मागणी- पुरवठ्यातील तफावत : ७० मेगावॉट

-शहरातील उपकेंद्र : ८

-मागणीनुसार आवश्‍यक : किमान १२

"गेल्या काही दिवसांत विजेची मागणी प्रचंड वाढली आहे. त्या तुलनेत पुरवठा मर्यादित उपलब्ध आहे. त्यामुळेच विजेच्या तफावतीने वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रकार वाढले आहेत. त्यामुळे नागरिकांचे हाल होत आहेत, याची जाणीव आहे. ‘महावितरण’चे सहकारी दिवस आणि रात्री काम करीत आहेत. आमच्या यंत्रणेला नागरिकांनी सहकार्य करावे."

-जयंत चोपडे, कार्यकारी अभियंता, शहर विभाग, महावितरण, जळगाव

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: मावळ विधानसभा मतदारसंघातून सुनील शेळके यांना ९९७० मतांची आघाडी

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मानखुर्द विधानसभेत नवाब मलिक पिछाडीवर, अबू आझमी आघाडीवर

नुकतीच पार पडलेली ब्राइड टू बी पार्टी; आता बॅचलर पार्टीसाठी थायलंडला पोहोचली मराठी अभिनेत्री; पाहा झक्कास फोटो

Winter Diet: आहारात 'या' 5 पदार्थांचा करा समावेश, हिवाळ्यात राहाल निरोगी

Assembly Election 2024 Result : चर्चांना उधाण! विधानसभेचे एक्झिट पोल खरे ठरणार का? ठिकठिकाणी उमेदवारांच्या विजयाचे ‘बॅनर वॉर’

SCROLL FOR NEXT