Jalgaon Robbery News esakal
जळगाव

Jalgaon Robbery News : जळगाव शहरात 2 घरफोड्या! सदगुरुनगरातून 15 हजार, सदाशिवनगरातून 58 हजारांचा ऐवज लंपास

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : शहरातील दोन बंद घर फोडून चोरट्यांनी ऐवज लंपास केला. एमआयडीसीच्या सदाशिवनगरात बंद घर फोडून साडेपंधरा हजार, तर, सदाशिवनगरातून ५८ हजारांचे दागिने व रोकड, असा ऐवज चोरट्यांनी लंपास केला. सदगुरूनगरातील तृप्ती कॉर्नर येथे जयश्री मयूर वाणी यांच्या आईच्या बंद घराचा कडीकोयंडा चोरट्याने तोडून घरातील लोखंडी कपाटातून १५ हजारांची रोकड आणि चांदीच्या वस्तू, दोन प्लॅस्टिकच्या सुटकेस चोरून नेल्या.

ही घटना मंगळवारी (ता. २३) सकाळी दहाला उघडकीस आली. याबाबत जयश्री वाणी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. सहाय्यक फौजदार विजय पाटील तपास करीत आहेत. जुनाखेडी रोडवरील सदाशिवनगरात नितीन सुरवाडे (वय ३१) यांच्या बंद घराच्या काडीकोयंडा तोडून चोरट्यांनी घरात प्रवेश केला.

घरातील लोखंडी कपाटातून सोने- चांदीचे दागिने आणि ५ हजार रुपयांची रोकड, असा एकूण ५८ हजार २८५ रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. ही घटनाही मंगळवारी उघडकीस आली. याबाबत नितीन सुरवाडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शनिपेठ पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. सहाय्यक फौजदार रघुनाथ पवार तपास करीत आहेत. (latest marathi news)

पोलिस गस्त कागदावर

जळगाव शहरातील नियमित गस्त खंडित झाली असून, रात्री कधीतरी संबंधित पोलिस ठाण्याचा एकटा चालक गाडी घेऊन सायरन वाजवत फिरतो. बीट मार्शल असो, की डीबी पथकातील कर्मचारी मनाला पटेल तेव्हा फेरफटका मारून निघून जातात.

शहरातील विकसीत कॉलन्या आणि संमिश्र लोकवस्तीचा रहिवास असलेल्या झोपडपट्ट्यांत नियमित गस्तीसह रेकॉर्डवरील संशयितांची तपासणी करणे गरजेचे झाल्याचे बोलले जात आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'हा जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार', IND vs BAN सामन्याविरोधात हिंदू संघटना आक्रमक, मालिका रद्द होणार?

Aaditya Thackeray : महायुती गद्दारांचा चेहरा घेऊन विधानसभा लढणार का?

Raj Thackeray: डॉ. अजित रानडेंना कुलगुरु पदावरुन हटवल्यानंतर राज ठाकरेंची पोस्ट; राज्यासह केंद्र सरकारला सुनावले खडेबोल

Sanjay Gaikwad: संजय गायकवाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल; वडेट्टीवारांचा जोरदार हल्ला

दोन टप्प्यात निवडणुका कुठे होणार? सुरत आणि गुवाहाटीला का? शिंदेंच्या वक्तव्यावर आदित्य ठाकरेंची खोचक टीका

SCROLL FOR NEXT