Burglary Crime News esakal
जळगाव

Jalgaon Crime : चोरट्यांकडून एकापाठोपाठ 4 घरफोड्या! विकसित नव्या वस्त्या टार्गेटवर; लाखोंच्या ऐवजासह रोकड लंपास

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Crime : एमआयडीसी आणि शहराचा विस्तारित भाग पांडुरंगनगर, पंढरपूरनगरसह सुधाकरनगरात भागात चोरट्यांच्या टोळीने झोपडीपासून ते बंगल्यांपर्यंत एकाच रात्रीत चोऱ्या व घरफोड्यांचा रेकॉर्ड केला. लाखो रुपयांची रोकड आणि सोन्याचे दागिने चोरून नेले. एकाच रात्रीमध्ये चार घरांमध्ये चोरी झाल्यामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर आता प्रश्न उपस्थित केला जात आहे. (Jalgaon Crime 4 burglaries in row by thieves)

पांडुरंगनगरात घरफोडी

शहरापासून थोडे अंतरावरील पांडुरंगनगरातील रहिवासी धिरज वाघ यांना रोकड घरातील कपाटात ठेवली होती. रविवारी (ता. १४) मध्यरात्री अडीचच्या सुमारास चोरट्यांनी त्यांच्या घराचा कडीकोयंडा तोडून घरात प्रवेश केला व कपाटाचे लॉकर तोडून दोन लाखांची रोकड आणि १५ ग्रॅम सोन्याचे दागिने चोरुन नेले. त्यानंतर चोरट्यांनी त्याच परिसरात बंद असलेल्या अन्य तीन घरांमध्ये चोरी करून तेथून रोकडसह सोन्याचे दागिने चोरून नेले. याप्रकरणी अद्याप गुन्हा दाखल झालेला नाही.

कर्जाचा हप्ताही लंपास

पांडुरंगनगरातील निवृत्ती उतरकर यांनी कर्ज घेतले असून, त्याचा हप्ता भरण्यासाठी घरात ठेवलेले १० हजार रुपये चोरट्यांनी चोरून नेलेत. कर्जाच्या हप्त्याचे पैसे चोरीला गेल्यामुळे उतरकर कुटुंब हताश झाले. त्याच परिसरातील एका वॉचमनच्या झोपडीतून चोरट्यांनी मोबाईल चोरून नेला. (latest marathi news)

सैनिकाचे घरही फोडले

सलग तीन घर फोडल्यानंतर चोरट्यांच्या टोळीने तेथून हाकेच्या अंतरावरील सुधाकरनगरातील निवृत्त सैनिक योगेश कुणबी यांच्या घरातून चोरट्यांनी ५० ते ६० हजारांची रोकड चोरून नेली. यामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. चोरी करणारी सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. प्रामाणिकपणे पोलिस गस्ती होतच नसल्याने घरफोडीच्या घटनांत वाढ झाली आहे.

महामार्गावरील रहिवासी सावधान..!

महामार्गाला लागून असलेल्या विस्तारित वस्त्या, कारखाने, एकांतवासातील बंद घरे चोरट्यांनी लक्ष्य केली आहेत. कृषिआधारित अर्थचक्र असल्याने बहुतांश कुटुंबायांत पेरण्यांसाठी मोठ्या रकमांची उलाढाल होते. ट्रॅक्टर, घर कर्जाचे हप्ते भरण्याच्या रकमा, दागिने असतात. घरफोडी करणाऱ्या अट्टल गुन्हेगारांमध्ये पारंपरिक काही टोळ्याही कार्यरत आहेत.

बंद घरांऐवजी टोळ्या दरोडे टाकून हल्लेही करतात. आपल्या परिसराची सुरक्षा आपणच ठेवण्याची वेळ आली असून, अशा रहिवासी वस्त्यांमध्ये प्रत्येक गल्ल्या सीसीटीव्हीने कव्हर करणे गरजेचे आहे. मोठे बंगले, अपार्टमेंटमध्ये सुरक्षारक्षक, पाळीव कुत्रे बाळगणे अपेक्षित आहे. सुरक्षारक्षकांकडून नियमित शिट्टी किंवा पुकारा करण्याची सोय करावी. जवळच्या पोलिस ठाणे आणि नियंत्रणक कक्षासह मदतीसाठी ११२ या क्रमांकावरर संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'हा जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार', IND vs BAN सामन्याविरोधात हिंदू संघटना आक्रमक, मालिका रद्द होणार?

Aaditya Thackeray : महायुती गद्दारांचा चेहरा घेऊन विधानसभा लढणार का?

Raj Thackeray: डॉ. अजित रानडेंना कुलगुरु पदावरुन हटवल्यानंतर राज ठाकरेंची पोस्ट; राज्यासह केंद्र सरकारला सुनावले खडेबोल

Sanjay Gaikwad: संजय गायकवाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल; वडेट्टीवारांचा जोरदार हल्ला

दोन टप्प्यात निवडणुका कुठे होणार? सुरत आणि गुवाहाटीला का? शिंदेंच्या वक्तव्यावर आदित्य ठाकरेंची खोचक टीका

SCROLL FOR NEXT