A local crime branch squad arrests the suspects in the theft at Shastri Pharmacy College. esakal
जळगाव

Jalgaon Crime News : महाविद्यालयातील चोरीप्रकरणी 5 संशयित जेरबंद; चौघांना पोलिस कोठडी

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Crime News : तालुक्यातील पळासदड येथील शास्त्री इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी महाविद्यालयात झालेल्या लोखंडी पाईप व ॲंगल चोरी प्रकरणातील पाच संशयितांना जळगाव येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गुरुवारी (ता.४) रात्री अटक केली. याशिवाय एका अल्पवयीन संशयिताचाही चोरी प्रकरणात समावेश आहे. दरम्यान, पाचही संशयितांना न्यायालयात हजर केले असता, त्यांना तीन दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायाधीशांनी दिला. (5 suspects in college theft case and 4 in police custody)

दरम्यान, अटकेतील संशयितांकडून आणखी काही गुन्हे उघड होण्याची शकयता आहे. संशयितांकडून चोरी केलेले लोखंडी पाईप जप्त करण्यात आले आहे. पळासदड येथील शास्त्री फार्मसी महाविद्यालयातून गेल्या १५ जूनला अज्ञात चोरट्यांनी ५० हजार रुपये किमतीच्या लोखंडी पाइपांची चोरी केली होती. एरंडोल शहरासह ग्रामीण भागात गेल्या काही दिवसांपासून शेतातील पाइप, वीजपंप, शेतीची अवजारे यांसह अन्य वस्तू चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली होती.

पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक बबन आव्हाड यांना चोरीच्या गुन्ह्यांचा तपास करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे हवालदार नंदलाल पाटील व भगवान पाटील हे गस्त घालत असताना त्यांना शास्त्री इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी कॉलेजमध्ये किशोर मोहन माळी याने लोखंडी पाईपची चोरी केल्याची माहिती मिळाली.

स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ निरीक्षक बबन आव्हाड यांनी उपनिरीक्षक राहुल तायडे, गणेश वाघमारे हवालदार नंदलाल पाटील, भगवान पाटील, किरण चौधरी, राहुल बैसाणे, हेमंत पाटील, सचिन महाजन, ईश्वर पाटील, मोतीलाल चौधरी यांचे पथक तयार केले. एरंडोलचे पोलिस निरीक्षक सतीश गोराडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक विकास देशमुख, हवालदार अनिल पाटील, मुकेश आमोदकर, अकिल मुजावर, मिलिंद कुमावत, अनंत पाटील, योगेश जाधव यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने संशयित किशोर माळी (रा. माळीवाडा, एरंडोल) याच्याबाबतची माहिती काढून त्यास ‘उपसरपंच चहा’ या दुकानाजावळून ताब्यात घेतले.

पथकातील सदस्यांनी त्याची चौकशी केली असता, त्याने शास्त्री कॉलेजमध्ये पाईप चोरी केल्याची कबुली दिली. या चोरीच्या गुन्ह्यात तोताराम ऊर्फ तुषार हेमंत माळी व एका अल्पवयीन मुलाचा सहभाग असून, तिघांनी कॉलेजमधून ५७ लोखंडी पाईप चोरी केल्याचे सांगितले. कॉलेजमधील चोरी करण्यात आलेले पाईप राज भगवान गायकवाड (रा. जुना धरणगाव रस्ता, एरंडोल) व समीर उर्फ सनी आनंदा संदानशिव यांच्या ताब्यात दिल्याची माहिती दिली.

स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने किशोर मोहन माळी, तोताराम ऊर्फ तुषार हेमंत माळी, राज भगवान गायकवाड, समीर ऊर्फ सनी आनंदा संदानशिव व दीपक ऊर्फ गोलू नामदेव पाटील (रा. गाढवे गल्ली, एरंडोल) यांना ताब्यात घेत विचारपूस केली. त्यात किशोर माळी, तोताराम माळी व एका अल्पवयीन मुलाने राज गायकवाड व सनी संदानशिव यांच्या सांगण्यावरून ५७ पाइपांची चोरी करून ते दीपक ऊर्फ गोलू नामदेव पाटील यांच्या मालकीच्या ट्रॅकक्टरमधून वाहून नेल्याचे सांगितले.

गुन्ह्यात वापरलेले ट्रॅक्टर पोलिस ठाण्यात

जळगाव येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने संशयितांकडून ४१ हजार २०० रुपये किमतीचे ४७ लोखंडी पाईप व गुन्ह्यात वापरलेले सोनालिका कंपनीचे ट्रॅक्टरही जप्त केले. अटक करण्यात आलेल्या पाचही संशयितांना न्यायालयात हजर केले असता, त्यांना तीन दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले. दरम्यान, अटकेतील संशयितांकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. पोलिस निरीक्षक सतीश गोराडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक विकास देशमुख पुढील तपास करीत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Kisan Yojana: पीएम शेतकरी योजनेचा अठरावा हप्ता मिळण्यास सुरुवात; 2000 खात्यात आले का? लगेच चेक करा

"यांच्यात नक्की काय शिजतंय ?" अंकुश -भाग्यश्रीचे फोटो झाले व्हायरल , कांदेपोह्यांच्या कार्यक्रमाची चर्चा

Kolhapur: नेता असावा तर असा! कुठल्याही हॉटेलला न जाता राहुल गांधींनी गाठलं थेट टेम्पोचालकाचं कौलारू घर; कोणाची घेतली भेट?

Pune Crime: बोपदेव घाट बलात्कार प्रकरण, संशयित आरोपींचे CCTV फुटेज समोर; पाहा VIDEO

Latest Marathi News Live Updates: हिंदुत्वाच्या मुद्द्यावर आक्रमक असणारे नितेश राणे आता संविधानाच्या मुद्द्यावरही आक्रमक

SCROLL FOR NEXT