Innova car seized by Sakri police in Saval murder case. esakal
जळगाव

Jalgaon Crime News : गुजरातला पळून जाताना साक्रीहून 6 संशयित ताब्यात

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Crime News : भुसावळ येथील माजी नगरसेवक व त्याच्या मित्राच्या दुहेरी हत्याकांड प्रकरणात धुळे जिल्ह्यातील साक्री पोलिस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी गुजरातकडे पळून जात असताना भुसावळ येथील सहा संशयितांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून ५४ हजारांची रोकड, दहा मोबाईल व इनोव्हा कार जप्त केली. भुसावळ शहरात बुधवारी (ता. २९) रात्री पावणेदहाच्या सुमारास माजी नगरसेवक व त्याच्या मित्राची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. ( 6 suspects arrested from Sakri while fleeing to Gujarat )

त्यानंतर पोलिस अधीक्षक डॉ. महेश्‍वर रेड्डी यांनी तपासाची चक्रे फिरवत सर्व सीमावर्ती भागांना ॲलर्ट केले. त्यात धुळे पोलिस दलालाही सूचना देण्यात आली होती. यादरम्यान यातील काही संशयित गुजरातकडे पळून जात असल्याच्या शक्यतेवरून जळगाव व धुळे पोलिसांनी धुळे जिल्ह्यातून गुजरातकडे जाणाऱ्या सीमावर्ती भागातील संबंधित ठाण्यांना सूचना दिली. त्यानुसार साक्री पोलिसांना दहिवेल गावाजवळील हॉटेल शिवम येथे संबंधित वर्णनाची इनोव्हा कार (एमएच१९ सी ९३३३) आढळून आली. त्यातील संशयित हॉटेलमध्ये जेवणासाठी थांबले होते.

अटकेतील संशयित असे

या सूचनेनुसार पोलिसांनी चार संशयितांना लगेच ताब्यात घेतले. दोन जण पळून जात असताना त्यांना पकडण्यात आले. ताब्यात घेतलेल्या संशयितांमध्ये राजू भागवत सूर्यवंशी (वय ५५), रोहन राजू सूर्यवंशी (२३), आनंद भागवत सूर्यवंशी (४०, तिघेही रा. संभाजीनगर, वरणगाव रोड, भुसावळ), चालक इम्रान शेख गुलाम रसूल (३५, रा. जलालशहा बाबा दर्गाजवळ, सरस्वतीनगर, भुसावळ), विकास पांडुरंग लोहार (३१, रा. साकेगाव, भुसावळ), धरमसिंग राससिंग पंडीत (२९, रा. बालाजी मंदिराजवळ, राहुलनगर, भुसावळ) यांचा समावेश आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sakal Podcast: नवीन रक्तगटाचा शोध ते येत्या पंधरा दिवसात आचार संहिता लागणार

Maratha Reservation : आता वेळ वाढवून देणार नाही; मनोज जरांगे पाटील

Bigg Boss Marathi: सूरज चव्हाण शेवटच्या पाचमध्ये असेल का? 'कलर्स'चे प्रमुख केदार शिंदेंनी स्पष्टच सांगितलं

Vaman Mhatre यांच्या अडचणी वाढणार! FIR व्हायरल केल्याचा आरोप; पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची पीडित मुलीच्या आईची मागणी

AFG vs SA 1st ODI : अफगाणिस्तानने इतिहास घडवला, दक्षिण आफ्रिकेला पराभवाचा धक्का दिला

SCROLL FOR NEXT