The buffaloes were mercilessly driven into the vehicle. esakal
जळगाव

Jalgaon Crime News : म्हशींची निर्दयी वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई!

सकाळ वृत्तसेवा

मेहुणबारे : वाहनांमध्ये क्षमतेपेक्षा अधिक म्हशी निर्दयीपणे कोंबून त्यांची वाहतूक करताना मिळून आल्यावरून मेहुणबारे पोलिसांनी कारवाई केली. १३ म्हशींची सुटका करण्यात आली आहे. लळींग धुळे येथील दुग्ध व्यावसायिक किसन धोेंडू झिपरे यांना चाळीसगाव बायपासवर एक टाटा आयशर गाडी मालेगाव रस्त्याने जाताना दिसली. (Action taken against cruel transporters of buffaloes)

श्री. झिपरे यांनी त्या वाहनाचा पाठलाग करून वाहन साकूर फाटा येथे थांबवून मेहुणबारे पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन (एमएच ४३ इ ५६३०) या वाहनाची पाहणी केली असता, त्यात लहान मोठ्या अशा १३ म्हशी आढळून आल्या.

या म्हशी अत्यंत निर्दयीपणे वाहनात कोंबल्याचे आढळून आले. वाहनचालकाकडे गुरे खरेदी-विक्रीचा कुठलाही परवाना नव्हता. (latest marathi news)

पोलिसांनी १३ म्हशी आणि वाहन, असा सुमारे चार लाख ४२ हजारांचा ऐवज जप्त केला. याबाबत किसन झिपरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मेहुणबारे पोलिस ठाण्यात चालक आबिदखान अकमलखान कुरेशी (रा. चाळीसगावए व क्लीनर आसिफखान आयुबखान (रा. मालेगाव) यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. एएसआय मिलिंद शिंदे तपास करीत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींचे टपालात दीड लाख खाती; जिल्हाभरातील महिलांची पसंती

IND vs NZ, Test: जड्डू मानलं तुला! किवींच्या दोन फलंदाजांचे उडवले त्रिफळे, भारताचे दमदार पुनरागमन

Model Code Of Conduct: विधानसभेचा धुरळा... आचारसंहितेत काय करता येते अन् काय नाही? जाणून घ्या एका क्लिकवर

Ratan Tata: कोणाला मिळणार 7,900 कोटी रुपये? रतन टाटांच्या मृत्यूपत्राची अंमलबजावणी कोण करणार?

Rishabh Pant कसोटी मालिकेला मुकण्याची चिन्ह; तिसऱ्या दिवशी मैदानावर नाही आला, BCCI ने दिले अपडेट्स

SCROLL FOR NEXT