Jalgaon Crime News esakal
जळगाव

Jalgaon Crime News : जनावरांचे वाहन पकडले; 21 लाखांचा मुद्देमाल जप्त!

Jalgaon News : शहर पोलिसांनी अकुलखेडा गावाजवळील हॉटेल नयनजवळ रविवारी (ता. २८) जनावरांची अवैध वाहतूक करताना गुजरातमधील संशयितांना अटक केली.

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : शहर पोलिसांनी अकुलखेडा गावाजवळील हॉटेल नयनजवळ रविवारी (ता. २८) जनावरांची अवैध वाहतूक करताना गुजरातमधील संशयितांना अटक केली असून, त्यांच्याकडून ट्रकसह जनावरे, असा एकूण २० लाख ९५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. (Animal vehicle seized 21 lakh worth of goods seized)

चोपडा-शिरपूर रस्त्यावरील अकुलखेडे गावाजवळ अवैध जनावरांची तस्करी करणारा ट्रक जात असल्याची गुप्त माहिती चोपडा शहर पोलिसांना मिळाली असता दुपारी चारच्या सुमारास पोलिसांनी आयशर ट्रक (क्रमांक जीजे ०३, बीझेड २७१३) वाहन थांबवून तपासणी केली असता त्यात जवळपास दहा ते अकरा गाई.

वासरू, गोऱ्हे अवैध पद्धतीने वाहनात कोंबून वाहतूक करताना आढळून आले. या प्रकरणी रमेश शेलाभाई सुसरा (वय २८), राजकोट सुकलाल वालजी गरवाड (वय ३३) (ह.मु. विखरण, ता. एरंडोल, दोघे रा. गुजरात यांना ताब्यात घेण्यात आले आहे. (latest marathi news)

त्यांच्याकडून आयशर कंपनीचा ट्रक (अंदाजे किंमत वीस लाख) तर जनावरांची किंमत ९५ हजार असा एकूण वीस लाख ९५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Border Gavaskar Trophy: ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय संघ जाहीर, Shami नाहीच; KL Rahulला अभय

Porsche Car Accident : डॉ. तावरेसह हाळनोरविरुद्ध फौजदारी खटला चालणार; राज्य सरकारकडून मंजुरी

South West Nagpur Assembly Election : विरोधकांसाठी आमच्या ‘लाडक्या बहिणी’च पुरेशा; देवेंद्र फडणवीस यांची टीका

Imtiaz Jaleel: "ज्यानं मला पाडलं, त्याला पाडण्यासाठी मी काय करतो बघाच"; इम्तियाज जलील यांचा थेट इशारा

IND A vs AFG A : भारतीय संघाचे लोटांगण; अफगाणिस्तानने उपांत्य फेरीत वाईट पद्धतीने हरवले

SCROLL FOR NEXT