Pistol esakal
जळगाव

Jalgaon Crime News : पारोळा शहरात बंदुक दाखवून तरुणाला जीवे मारण्याचा प्रयत्न; चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

Crime News : परिसरातील नागरिकांनी या चौघांना पकडून मारहाण केली. त्यात गर्दीचा फायदा घेत ते चौघेही पसार झाले. पैकी दोघांना अटक करण्यात आली.

सकाळ वृत्तसेवा

पारोळा : शहरातील श्रीराम मंदिर चौक परिसरात सराईत गुन्हेगार व त्याच्या चारही साथीदारांनी एका तरुणाच्या कानाला बंदूक लावून ३० हजारांची मागणी केली. मात्र, त्याने पैसे न दिल्याने त्याला बेदम मारहाण केली. शिवाय त्याच्या घरात जाऊन त्याला फाशी लावून जीवे मारण्याचा प्रयत्न केला.

मात्र, परिसरातील नागरिकांनी या चौघांना पकडून मारहाण केली. त्यात गर्दीचा फायदा घेत ते चौघेही पसार झाले. पैकी दोघांना अटक करण्यात आली. दोनजण फरार झाले आहेत. यात पाच जण जखमी झाले. ही घटना शनिवारी (ता.२९) रात्री साडेदहाच्या सुमारास झाली. (Jalgaon Crime Attempt to kill young man by showing gun in Parola)

भीकन तुकाराम पाटील (वय ३४, रा. कोळी गल्ली, श्रीराम मंदिर चौक, पारोळा) असे जखमी तरुणाचे नाव आहे. तो जेवण करून साडेदहाला चौकात बसला होता. त्याचवेळी सुनील उर्फ सल्ल्या लक्ष्मण पाटील (वय ३६), ज्ञानेश्वर उर्फ अमोल वसंत पाटील (४०), किरण प्रकाश पाटील (३५) व अन्य एक (नाव गाव माहित नाही, सर्व रा. पारोळा) हे दोन दुचाकीवरून आले व भीकनच्या डोक्यावर बंदूक लावली.

तीस हजार रुपये दे नाहीतर तुला जीवे मारेल असा दम दिला. मात्र, पैसे देण्यात भीकनने नकार दिला म्हणून संशयित किरण पाटीलने वीट उचलून तोंडावर मारली व अन्य दोघांनी लोखंडी रॉड व काठीने बेदम मारहाण केली. चौकातील नागरिकांनी भांडण आवरत भिकन घराकडे जात असताना चारही आरोपींनी त्यांचा पाठलाग करीत त्यांच्या घरात प्रवेश केला व भिकनला दोरीच्या साह्याने गळफास लावून मारून टाकण्याचा प्रयत्न केला.

भीकनच्या डाव्या खांद्यालाही मोठा चावा घेतला. यावेळी त्यांची पत्नी मनीषा पाटील व वडील तुकाराम पाटील आवरण्यास गेले असता, त्यांनाही बेदम मारहाण केली व त्यांच्या पत्नीस अंगावरील कपडे फाडून लज्जास्पद वर्तणूक केली. लहान मुलगा शौर्यलाही उचलून कॉटवर फेकून दिले.

त्याचवेळी परिसरातील लोकांनी गुन्हेगारांना घराबाहेर काढले. संतप्त जमावाने आरोपींना मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यावेळी चौघांनी तेथून पळ काढला. त्याचवेळी घटनास्थळी पोलिस निरीक्षक सुनील पवार, उपनिरीक्षक राजू जाधव, बाळू गीते, अमरदीप वसावे व कर्मचारी यांनी येऊन परिस्थितीवर नियंत्रण मिळविले. (latest marathi news)

जखमींना पारोळा कुटीर रुग्णालयात दाखल केले. भिकन पाटील यांनी पोलिसांत फिर्याद दिली. पोलिस निरीक्षकांनी लागलीच पथके तयार करीत गुन्हेगारांचा शोध घेतला. त्यातील किरण पाटील जखमी असल्याने त्याला धुळे जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले व सुनील उर्फ साल्ल्याचा शोधात पथक रवाना झाले आहे.

दरम्यान, चारही आरोपींवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले. मध्यरात्री अमळनेरमधून सुनील उर्फ सल्ल्यास ताब्यात घेतले. आरोपींकडून एक बंदूक, दोन मोटरसायकली, लोखंडी रॉड", चोपर जप्त करण्यात आले. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक बाळू गीते करीत आहेत.

आरोपी व फिर्यादींतील मागील भांडणीवरून ही घटना घडल्याचे सांगितले जात आहे. गेल्या आठवड्यात भिकन पाटीलसह एकाने जनाने बंदूक व काडतुसे बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. चार दिवसांपूर्वीच तो कारागृहातून सुटून आला होता. त्यानंतर ही घटना घडली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT