भुसावळ : शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागात गेल्या काही महिन्यांत ‘मटका’ जुगाराचे प्रमाण वाढले असून, खेळविणारे मालामाल तर खेळणारे कंगाल होत आहेत. ज्येष्ठांसह युवा वर्ग मोठ्या प्रमाणात या मटक्याच्या विळख्यात अक्षरशः बुडाला आहे. परिणामी, त्यांचे कुटुंब कर्जाच्या खाईत लोटले जात असल्याचे गंभीर बाब समोर आली आहे. (Jalgaon Crime Bhusawal youth bookie in trap of Matka)
भुसावळ हे तालुक्याचे शहर असून प्रत्येकाच्या हाताला काम आहे तर शहराला लागूनच ग्रामीण क्षेत्रात तापी काठावर बागायती पट्टा असल्याने धनसंपन्न आहे. शहर आणि ग्रामीण क्षेत्रात वाळू व्यवसाय तेजित असताना कष्ट कमी, अल्प वेळेत बक्कळ पैसा, यामुळे सुखचैनीत जगणारा युवावर्ग वाळू व्यवसाय आणि हातातील काम बंद झाल्याने हतबल झाला होता.
काहींनी वेगवेगळे मार्ग शोधून व्यवसाय सुरू केले, तर काही युवकांना कमी वेळात कमी कष्टात जास्त पैसा हवा असल्याने ‘मटक्या’ची चटक लागली. तरुणाई खिशात पैसा नसेल तर उधार मटका खेळत आहे. मटक्यातून झालेली लाखो रुपयांची उधारी फेडण्यासाठी खासगी सावकारांकडून दहा ते वीस टक्के व्याजाने पैसे घेत आहेत.
यामुळे संपूर्ण कुटुंब सावकारी विळख्यात अडकून अक्षरशः वाताहत होत आहे. मटका जुगारात बुकी तेवढे सुखी झालेत, बाकी सर्व दुःखी अशी परिस्थिती आहे. भुसावळ शहरासह तालुक्यात गावोगावी मटक्याचे अड्डे वाढत असून, या सर्व धद्यांवर पोलिस प्रशासनाचे होत असलेले दुर्लक्ष या धंद्याला चालना देत आहे.
या अवैधधंद्यांवर कारवाई कधी होणार? असा सवाल ग्रामस्थांमधून उपस्थित केला जात आहे. शहरात काही मटका बुकींची दिवसाची उलाढाल ही सरासरी आठ- दहा लाख रुपयांची असल्याची चर्चा आहे, तर काही तरुण दिवसाला पन्नास हजार रूपयांपर्यंत मटका खेळत असतात. (latest marathi news)
या सर्व घडामोडीमध्ये मटका बुकी मात्र मालामाल झाले असून, खेळणारे कंगाल झाले आहेत. यात अडकलेल्या सर्वसामान्य कुटुंबांना मात्र मटक्याचा झटका लागत आहे. यावर कडक कारवाईची मागणी ग्रामीण भागातून होत आहे. तालुका पोलिस प्रशासन कडक कारवाई करणार का? याकडे सर्वसामान्यांचे लक्ष लागले आहे.
बुकींचे वसुलीसाठी ‘नेटवर्क’
भुसावळ आणि ग्रामीण क्षेत्रातील अवैधधंद्यांवर कारवाईचा बडगा उगारला जातो. काही ठिकाणी ठोस पावलेही उचलली जातात. मात्र, कारवाईत सातत्याची गरज असून, ठोस कारवाईची आवश्यकता असण्याची गरज आहे. मटका धंद्यात जुगार खेळणाऱ्यांकडे झालेली उधारी वसूल करण्यासाठी बुकींनी परिसरातील काही खास लोकांच्या नियुक्त्या केल्या असून, त्यांच्यामार्फत ही उधारी धमक्या किंवा मारहाण करून वसूल करण्यात येते. कोणत्याही परिस्थितीत वसुलीही बुकींना अपेक्षित असते.
"भुसावळ शहर असो किंवा ग्रामीण परिसर अवैध व्यवसायासंबंधी पोलिस प्रशासन कारवाईत अग्रेसर आहे आणि यापुढे सातत्याने कारवाया केल्या जाणार आहेत."
- कृष्णांत पिंगळे, विभागीय पोलिस अधिकारी, भुसावळ
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.