Kunwar Singh Kharate esakal
जळगाव

Jalgaon Crime News : घरफोडीतील संशयितास 18 दिवसांत पकडले! 2 साथीदार फरार; संशयितास तीन दिवस पोलिस कोठडी

सकाळ वृत्तसेवा

एरंडोल : राष्ट्रीय महामार्गावरील हॉटेल कृष्णा समोरील महाजननगरातील दगडांपासून मूर्ती बनविणाऱ्या कारागिराच्या घरात सात मेला पहाटेच्या सुमारास खिडकीची लोखंडी जाळी वाकवून चोरी करणाऱ्या संशयितास पोलिस उपनिरीक्षक शरद बागल यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांनी अठरा दिवसांत मध्य प्रदेशातील शिरपूर येथून अटक केली.

संशयिताकडून चोरीतील एक मोबाईल जप्त केला असून, त्याचे दोन साथीदार फरार आहेत. संशयितास न्यायालयासमोर उभे केले असता, तीन दिवस दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायाधीशांनी दिला. दरम्यान संशयिताकडून अनेक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. संशयिताचे फरार असलेल्या दोन्ही साथीदारांनादेखील लवकरच अटक केली जाईल, असा विश्वास उपनिरीक्षक शरद बागल यांनी व्यक्त केला. (Jalgaon Crime Burglary suspect nabbed in 18 days)

महाजननगरात मेहेरबाननाथ सिंधुनाथ सोलंकी हे पत्नी व मुलांसह भाड्याच्या घरात राहतात. मेहेरनाथ सोलंकी हे राजस्थानमधून दगड आणून त्याच्यापासून मूर्त्या घडविण्याचे काम करतात. सात मे रोजी पहाटेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी सोलंकी यांच्या घराच्या भिंतीची लोखंडी जाळून वाकवून एक लाख ९८ हजार रुपये रोख, १५ हजार रुपये किमतीचे चांदीचे कडे व

५० हजार रुपये किमतीचे मोबाईल असा एकूण दोन लाख ६३ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला होता. चोरी झाल्यानंतर पोलिस निरीक्षक सतीश गोराडे, उपनिरीक्षक शरद बागल यांनी घटनास्थळी भेट देवून पाहणी केली होती. गुन्ह्याबाबत कोणताही पुरावा उपलब्ध नसल्यामुळे चोरट्यांना पकडण्याचे आव्हान पोलिसांसमोर होते.

पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, चाळीसगावच्या अप्पर पोलिस अधीक्षक कविता नेरकर, अमळनेर विभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी सुनील नंदनवाळ, पोलीस निरीक्षक सतीश गोराडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक शरद बागल व त्यांचे सहकारी हवलदार अकिल मुजावर, आकाश शिंपी, पंकज पाटील यांनी चोरट्यांचा शोध सुरु केला. (latest marathi news)

उपनिरीक्षक शरद बागल यांनी घरफोडी झालेल्या मेहेरबाननाथ सोलंकी यांच्या चोरी झालेल्या मोबाईल क्रमांकाचा आयएमईआय सी.डी.आर. व घटनास्थळाचा सेल आयडी डमडाटा काढून त्याच्या माध्यमातून तपास केला. त्यात आरोपीचा एक मोबाईल सुरु असल्याची माहिती मिळवली.

तांत्रिक माहितीच्या आधारावर उपनिरीक्षक बागल व त्यांचे सहकारी अकिल मुजावर, आकाश शिंपी, पंकज पाटील यांनी यांनी कुंवरसिंग गंगाराम खराटे यास शनिवारी रात्री साडेनऊच्या सुमारास ताब्यात घेतले. संशयिताकडून चोरीस गेलेल्या तीन मोबाईलपैकी एक मोबाईल जप्त केला असून त्याचे सुनील बारेला व काळू बारेला हे दोन साथीदार फरार झाले आहेत.

घरफोडीप्रकरणी कोणताही पुरावा उपलब्ध नसतांना तांत्रिक बाबींच्या माध्यमातून संशयितास पोलिसांनी अटक केल्याबद्दल नागरिकांत समाधान व्यक्त केले जात आहे. संशयिताकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sakal Podcast: नवीन रक्तगटाचा शोध ते येत्या पंधरा दिवसात आचार संहिता लागणार

Maratha Reservation : आता वेळ वाढवून देणार नाही; मनोज जरांगे पाटील

Bigg Boss Marathi: सूरज चव्हाण शेवटच्या पाचमध्ये असेल का? 'कलर्स'चे प्रमुख केदार शिंदेंनी स्पष्टच सांगितलं

Vaman Mhatre यांच्या अडचणी वाढणार! FIR व्हायरल केल्याचा आरोप; पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची पीडित मुलीच्या आईची मागणी

AFG vs SA 1st ODI : अफगाणिस्तानने इतिहास घडवला, दक्षिण आफ्रिकेला पराभवाचा धक्का दिला

SCROLL FOR NEXT