यावल : तालुक्यातील साकळी येथील छोटा हत्ती वाहनात कत्तलीच्या उद्देशातून गोवंश वाहतूक केली जात होती. याबाबतची माहिती यावल पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी रविवारी (ता.१५) त्या ठिकाणी जाऊन कारवाई करीत गोवंश व वाहन ताब्यात घेतले. याप्रकरणी दोन संशयितांविरुद्ध यावल पोलिस ठाण्यात प्राणी अधिनियम अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Crime case registered against two people in case of cattle traffic)
साकळीत कत्तलीच्या उद्देशातून छोटा हत्ती वाहनात (क्रमांक एम. एच. १९ एस. ८०१५) गोवंश वाहतूक केली जात असल्याचे पोलिस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांना समजले. त्यांनी त्या ठिकाणी पथक पाठवले. पथकाने गोवंश व वाहन ताब्यात घेतले. याप्रकरणी हवलदार उमेश महाजन यांनी यावल पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.
त्यावरून नासिर शेख व जहांगीर खान (दोन्ही रा. साकळी) यांच्याविरुद्ध प्राणी अधिनियम अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतचा पुढील तपास पोलिस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार उमेश सानप करीत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.