Crime  esakal
जळगाव

Jalgoan Crime News : मुस्लीम समाजाच्या 2 गटात तुंबळ हाणामारी; मुक्त हस्ते शस्त्रांचा वापर, एक मृत तिघे गंभीर

सकाळ वृत्तसेवा

Jalgoan Crime News : शहरातील सय्यद वाडा आणि इस्लामपुरा या दोन नगरातील मुस्लीम समाजाच्या दोन गटात नगर पालिका ते लोहार दरवाजा दरम्यान तुफान हाणामारी झाल्याची घटना मंगळवार ( ता.४) दुपारी दीड ते दोनच्या सुमारास घडली. या हाणामारी दरम्यान चाकू व धारदार वस्तूंचा वापर केल्याचा धक्कादायक प्रकार घडला. यात आरिफ अली अहमद अली याचा मृत्यू झाला. (Clash between 2 groups of Muslim community )

दरम्यान, या हाणामारीत चार जण गंभीर जखमी झाले होते. चौघा जखमींना वरणगाव ग्रामीण रुग्णालयात प्रथमोपचार करून त्यांना उपचारासाठी पाठविण्यात आले. मात्र रस्त्यातच एकाचा मृत्यू झाला. तिघांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना गोदावरी वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरु आहेत. दरम्यान, उपस्थितांच्या माहितीवरून वरणगाव येथील सय्यदवाडा आणि इस्लामपुरा या नगरातील मुस्लीम समाजाच्या दोन गटात जुना वाद आहे.

तोच वाद मंगळवार ( ता. ४ ) दुपारी दीड ते दोनच्या सुमारास उफाळून आला. नगरपालिका आणि लोहार दरवाजा दरम्यान मोटर सायकल लावण्याच्या कारणांवरून उफाळून आलेल्या या वादात दोन्ही गटात तुंबळ हाणामारी होऊन एकमेकांवर हल्ला चढवला. चाकू व धारदार वस्तुचा वापर झाला.

यात आरीफअली सद्दाम अली ( वय.२८), आकीबअली कमरअली (वय.२१), समीर खान अजित रवान ( वय २८ )आणि सय्यद मुस्ताक अली सय्यद लाला ( वय ५० ) चौघे गंभीर जखमी झाले.पोलिसांना माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक भरत चौधरी यांनी कर्मचाऱ्यांचा फौजफाटा घेऊन घटनास्थळी धाव घेऊन जखमींना वरणगाव ग्रामीण रूग्णालयात पाठवून परिस्थिती नियंत्रणात आणली. (latest marathi news)

रस्त्यात एकाचा मृत्यू

ग्रामिण रुग्णालयात प्रथमोपचार करून तिघांना पुढील उपचारासाठी रवाना केले असता, वाटेतच आरिफ अली अहमद अली याचा मृत्यू झाला त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जळगाव जिल्हा रुग्णालयात नेला आहे. आकिबअली कमरअली, सय्यद मुस्ताक सय्यदलाला आणि समीर खान आजित खान यांचे वर गोदावरी वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू आहे.

या प्रकरणी वरणगाव पोलिसात अजून कोणत्याही गुन्ह्याची नोंद करण्यात आलेली नव्हती. मात्र पोलिसांचे दोन पथक फरार संशयितांचा शोध घेत असून मुक्ताईनगर विभागीय पोलिस अधिकारी राजकुमार शिंदे यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक भरत चौधरीसह कर्मचारी तपास करीत आहे.

वर्षभरापूर्वीच विवाह

सय्यद आरीफ सय्यद समद अली या तरुणाने नुकतेच वर्षभरापुर्वी लग्न झालेले आहे. वडील-काका यांचा जनावरांच्या खरेदी विक्रीच्या व्यवसायासह बटाटे-कांद्याचा व्‍यवसाय आहे. गावात कुणाशीही त्याचे वाद नव्हते. मात्र, काही दिवसांपूर्वी किरकोळ कारणावरुन हल्लेखोर तरुणांशी त्याचे वाद झाल्याचे सांगण्यात येते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'हा जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार', IND vs BAN सामन्याविरोधात हिंदू संघटना आक्रमक, मालिका रद्द होणार?

Aaditya Thackeray : महायुती गद्दारांचा चेहरा घेऊन विधानसभा लढणार का?

Raj Thackeray: डॉ. अजित रानडेंना कुलगुरु पदावरुन हटवल्यानंतर राज ठाकरेंची पोस्ट; राज्यासह केंद्र सरकारला सुनावले खडेबोल

Sanjay Gaikwad: संजय गायकवाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल; वडेट्टीवारांचा जोरदार हल्ला

दोन टप्प्यात निवडणुका कुठे होणार? सुरत आणि गुवाहाटीला का? शिंदेंच्या वक्तव्यावर आदित्य ठाकरेंची खोचक टीका

SCROLL FOR NEXT