Crime  esakal
जळगाव

Jalgaon Crime News : तलाठी परिक्षेत घोळावरुन तिघांवर गुन्हा

Jalgaon Crime : महसूल विभागाच्या १२ मार्चला झालेल्या तलाठी सरळसेवा भरती प्रक्रियेत ऑनलाईन परिक्षेत झोल झाल्याचे निष्पन्न झाले आहे.

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Crime News : महसूल विभागाच्या १२ मार्चला झालेल्या तलाठी सरळसेवा भरती प्रक्रियेत ऑनलाईन परिक्षेत झोल झाल्याचे निष्पन्न झाले आहे. ऑनलाईन परिक्षेत संगणकावरच चिटींग करणाऱ्या तीन उत्तीर्ण उमेदवारांच्या उत्तरपत्रिकांसह यांत्रिक विश्लेषणाच्या आधारे प्राप्त अहवालावरुन आज जिल्हापेठ पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला.राजेश गेठे, भूषण पाटिल, आणि परिहार भागवत असे संशयित उमेदवारांची नावे आहेत. (Jalgaon Crime Crime against three in Talathi Exam)

जळगाव तहसीलदार ज्योती छबुराव गुंजाळ (वय-३८) यांनी जिल्‍हापेठ पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून हा गुन्हा दाखल झाला आहे. तहसीलदारांच्या तक्रारीनुसार, तलाठी (गट-क) संवर्गा करता सरळसेवा भरती प्रक्रिया ऑनलाईन परिक्षांचा निकाल जळगाव जिल्‍हाधिकारी आयुष्य प्रसाद यांच्या मेलवर पाठवण्यात आला हेता.

त्यात संशयीत उमेदवार राजेश रामभाउ गेठे (रा.बिच्छू टेकडी अमरावती) यास ११८.२० गुण मिळाले आहे. भूषण रघुनाथ पाटील (मु.पो.गौताणे जि.धुळे) याला २०४.०६ गुण तर तिसरा उमेदवार भागवत जनार्दन परिहार (रा.आंजरवाडी ता.चिखली. बुलढाणा) याला १९७.११ गुण मिळवून तिघे उमेदवारांच्या नावा पुढे पुण्यातील जमाबंदी आयुक्त कार्यालयाने स्टार चिन्ह दर्शवले होते. तसेच या तीनही उमेदवारांचे निकाल राखीव ठेवण्यात आले होते. (latest marathi news)

जिल्हाधिऱ्यांकडून चौकशी

१४ मार्चच्या निकालाची यादी जाहीर झाल्यानंतर जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी या प्रकरणाची दखल घेत तीनही उमेदवारांना कागदपत्र पळताळणीला बोलावून घेत २२ मार्चच्या परिक्षेत तिन्ही उमेदवारांनी काय गैरप्रकार केला आहे, उत्तरपत्रिका सोडवताना कुठल्या अवैध मार्गाचा अवलंब केला याची समक्ष विचारपूस केली. मात्र, तिघांनीही उडवा उडवीची उत्तरे दिली. चौकशी पडताळणीत असमाधान कारक उत्तरे देण्यात आली

अहवालानुसार गुन्हे दाखल

जिल्‍हाधिकारी कार्यालयाला जमाबंदी आयुक्त कार्यालय पुणे येथून बेब कॅबिनेटवर ऑडीट लॉग अॅनालिसीस रिपोर्ट प्राप्त झाला होता. त्यानुसार या तिनही संशयीत उमेदवारांनी निर्धारित वेळेपेक्षा अत्यल्प वेळेत चिटींग करून प्रश्नपत्रिका सोडवल्याचे आढळून आले असून तहसीलदार ज्योती गुंजाळ याच्या तक्रारीवरुन गेठे राजेश रामभाऊ(रा.बिच्छू टेकडी अमरावती), पाटील भुषण रघुनाथ (रा.गौताणे जि.धुळे), परिहार भागवत जनार्दन(रा.चिखली बुलढाणा) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: छत्रपती संभाजीनगरमध्ये मतमोजणीसाठी भाजपचे प्रतिनिधी मतमोजणी केंद्रावर दाखल

Mumbai Assembly Election 2024 Results Live : मुंबईत नक्की कोण मारणार बाजी? वाचा एका क्लिकवर

Chopda Assembly Election 2024 Result Live: चोपडा विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडी विरुद्ध महायुतीत काटे की टक्कर..!

Islampur Assembly Election 2024 Results : जयंत पाटील विरुध्द निशिकांत पाटील

Erandol Parola Assembly Election 2024 result live : एरंडोल पारोळ्यात कोण मारणार बाजी?

SCROLL FOR NEXT