जळगाव : शहरातील कोळीपेठेत धूलिवंदनसाठी स्पीकर लावत असताना वाद होऊन एका तरुणाच्या पोटात चॉपर खुपसून त्यांचा खून करण्याचा प्रयत्न झाला. जखमी तरुणाच्या तक्रारीवरून संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून, शनिपेठ पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. (Jalgaon Crime Dhulivandan Koli Peth Assault by chopper due to dispute over speaker installation two arrested marathi News)
जखमी दीपक ऊर्फ भूषण अंबर सपकाळे (२५) याने शनिपेठ पोलिसांना दिलेल्या जबाबानुसार, सोमवारी (ता. २५) सायंकाळी साडेसातच्या सुमारास बलभीम व्यायामशाळेचे सदस्य राहुल अभिमान सपकाळे, पवन रवींद्र इंगळे, शुभम रवींद्र इंगळे, सतीश दिगंबर सपकाळ असे आठ ते दहा तरुण नरेंद्र हरी सपकाळे यांच्या घराच्या ओट्यावर स्पीकर लावत होते.
त्या वेळी सागर ऊर्फ बीडी सुरेश सपकाळे तेथे आला. त्याने स्पीकर लावण्यावरून शिवीगाळ केली. दीपक सपकाळे याने ‘तुम्ही कोणाला बोलताय एकाला बोला’ असे प्रतिउत्तर केल्याने वाद वाढत जाऊन सागर ऊर्फ बीडी व त्याचा साथीदार सागर ऊर्फ झंपऱ्या आनंदा सपकाळे या दोघांनी घरी जाऊन धारदार चॉपर आणत दीपक सपकाळ याच्या पोटावर सपासप वार करून जखमी केले.
दीपक जखमी होताच इतर तरुणांनी आरडाओरड केल्याने दोघांनी पळ काढला. जखमी दीपकला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. तो शुद्धीवर आल्यानंतर शनिपेठ पोलिसांनी घेतलेल्या जबाबानुसार प्राणघातक हल्ल्याचा गुन्हा दाखल केला आहे. (latest marathi news)
पूर्ववैमनस्याची किनार...
हल्लेखोर सागर ऊर्फ बीडी सपकाळे याचा भाऊ आकाश ऊर्फ धडकन सुरेश सपकाळे याने चार- पाच वर्षांपूर्वी दीपककडून चाळीस हजार रुपये उधार घेतले होते. पैशांची मागणी केल्यावरून त्यांच्यात तेव्हा वादही झाला. मात्र, जुने स्टँड येथे झालेल्या गँगवारमध्ये आकाशचा मृत्यू झाला.
ते पैसे सपकाळे यांच्या कुटुंबीयांना मागितल्याचा राग तेव्हापासून होता, असे जबाबात नमूद केले आहे. शनिपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होताच निरीक्षक आर. टी. धारबडे यांच्या पथकातील राहुल पाटील, परिष जाधव, अमोल विस्पुते आदींनी संशयित सागर ऊर्फ बीडी सुरेश सपकाळे, त्याचा साथीदार सागर ऊर्फ झंपऱ्या आनंदा सपकाळे या दोघांना अटक केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.