Crime esakal
जळगाव

Jalgaon Crime News : भुसावळातील ‘गँगवॉर’ची धग संपता संपेना..! धंद्यावर पकड ठरले कारण

Jalgaon Crime : जिल्ह्यातील गुन्हेगारीचे प्रमुख केंद्र म्हणून नेहमीच भुसावळची ओळख आहे.

रईस शेख

Jalgaon Crime News : जिल्ह्यातील गुन्हेगारीचे प्रमुख केंद्र म्हणून नेहमीच भुसावळची ओळख आहे. पथरोड गँग, बारसे गट आणि वेळपरत्वे छोट-छोट्या गटातून येथे गँगवॉरची स्फोटक प्रकरणे नेहमीपासूनच समोर येत आहेत. प्रस्थापित बारसे गटावर कोणी चाल करेल, अशी परिस्थिती नसतानाही पथरोड गँगने सूर्यवंशी गटाशी हातमिळवणी करून भाजपचे माजी नगरसेवक संतोष बारसे, सुनील रांखुंडे यांची हत्या घडवून आणली. ( Crime gang war in Bhusawal is continue)

केवळ पाण्याच्या टँकरचा वाद आणि त्यातून हत्या हे सामान्य नागरिकांसह गुन्हेगारीचा अनेक वर्षे निरखून अभ्यास करणाऱ्यांनाही न पटणारे आहे. वास्तविक भुसावळचे गँगवार आणि गुन्हेगारी पाहता सर्वांत आधी मध्य रेल्वेचे जंक्शन असलेल्या रेल्वे केंद्रस्थानी येते.

रेल्वेतील गुन्हेगारी

रेल्वेतील गुन्हेगारीवर सध्या पथरोड गँगचे ‘राशनपानी’ सुरू आहे, तर बारसे गट मोहन पहिलवान असल्यापासून मजबूत आणि राजकारणात सक्रिय असणारा परिवार आहे. औष्णिक प्रकल्प, आयुध निर्माणीतील (ऑर्डिनन्स फॅक्ट्ररी) कंत्राटी कामे, आमदार-खासदार निधीतून मिळणारे रस्ते, गटारांसह पालिकेच्या विकासकामांवर या टोळ्या पोसल्या जात आहेत. भुसावळ शहरावर वर्चस्व असणारी टोळी किंवा त्यांच्याशी संबंधित लोकांनाच कंत्राटाची मलाई चाखायला मिळते, हे सर्वश्रूत आहे.

राजकीय गुन्हेगारीचे वर्चस्व

माजी आमदार संतोष चौधरी, अनिल चौधरी यांची चलती असतानाही या टोळ्या कार्यरत होत्या. मात्र, सर्वांनाच खायला मिळत असल्याने टोकाचे गँगवॉर होत नव्हते. चौधरींची सद्दी संपल्यापासून जो-तो आपल्या पद्धतीने गँग चालवतो. अशाच गँगवॉर आणि तत्कालीक वादातून रवींद्र बाबूराव खरात ऊर्फ हंप्या याच्यासह पाच जणांची गोळीबार अन्‌ चॉपरने हल्ला चढवून हत्या केल्याची घटना ऑक्टोबर २०१९ मध्ये घडली होती. एका खुनाचा बदला खून म्हणून भुसावळची गुन्हेगारी कुप्रसिद्ध आहे. तसाच प्रकार यापुढेही घडेल, यात तीळमात्र शंका नाही.

असे धंदे, असे प्रस्थ

पथरोड टोळी मुळात रेल्वेतील चोऱ्या, अंमली पदार्थ तस्करी, तृतीयपंथीयांकडून होणारी वसुली, रेल्वेतील अनधिकृत वेंडर्स, हप्ते वसुलीतून आपले प्रस्थ चालवीत आहे, तर बारसे कुटुंब सुरवातीपासूनच राजकारणात सक्रिय असल्याने नगरपालिकेंतर्गत निघणारे सर्व कंत्राटी कामे त्याच्या माध्यमातून होतात. याच कामात राजू सूर्यवंशी गटाला काही वर्षांपासून जम बसवता येत नव्हता. सुनील रांखुडे पूर्वी विविध शासकीय योजनांची कामे, कर्जप्रकरणे मंजुरीची कामे करीत होता. संतोष बारसे यांच्या संपर्कात आल्यापासून रिअल इस्टेटच्या मोठ्या व्यवहारातही राखुंडे सक्रिय असल्याचे समोर आले.

वर्चस्वाची लढाई

भुसावळवर अधिराज्य गाजवायचे असेल, तर गुन्हेगारीत जम बसवावा लागतो. चार-दोन मर्डर, अपहरण, प्राणघातक हल्ले आणि इतर गुन्ह्यात सक्रिय असणारी टोळीच इतर वैध-अवैध धंद्याचा माल कमावू शकते. माजी नगरसेवक संतोष बारसे यांचे कंत्राटी कामांसोबतच जुन्या वादग्रस्त मिळकती खरेदी-विक्रीचेही काम होते. त्यात सुनील राखुंडे मदत करीत असे. वादग्रस्त व्यवहारात मध्यस्थीतही बऱ्यापैकी पैसा ते कमावत होते. बारसेंनी नगरपालिकेच्या माध्यमातून नगरसेवक असल्याने आमदार-खासदार निधी मिळवून अनेक विकासकामे केली आहेत. त्यांचे प्रस्थ वाढल्याने इतर कुणालाही कामे मिळत नसे. यातूनच राजू सूर्यवंशी, पथरोड टोळीचे दुखत होते.

पोलिसिंग संपल्यात जमा

भुसावळ उपविभागात जटील पद्धतीची गुन्हेगारी असून, मुंबईच्या धरतीवर चालणारे पराकोटीचे गँगवार येथे सक्रिय आहे. सर्वांत प्रथम तत्कालीन अप्पर पोलिस अधीक्षक दिलीप सावंत यांनी प्रस्थापित गुन्हेगारीला सुरंग लावला. पोलिस अधीक्षक संतोष रस्तोगी, अप्पर अधीक्षक इशू सिंधू यांनी चौधरी बंधुंची सद्दी संपुष्टात आणली. अप्पर अधीक्षक निलोत्पल यांनी बऱ्यापैकी भुसावळ नियंत्रणात आणले होते. आता पोलिसच गुन्हेगारांसोबत भागीदारीत असल्याने भुसावळच्या गुन्हेगारीने तोंड वर काढले आहे.

नेमका काय होता वाद?

पाण्याच्या टँकरवरून झालेल्या तत्कालीक वादातून संतोष बारसे, सुनील राखुंडे यांची हत्या घडल्याचे सांगण्यात येत असले, तरी वास्तव वेगळे आहे. संतोष बारसे यांनी मंदिराच्या जमिनीबाबत केलेला व्यवहार आणि गुन्हेगारीवरील मजबूत पकड राजू सूर्यवंशीसह पथरोड गँगच्या डोळ्यात खूपत होते. त्यातून नुकताच वाद झाल्याचे कारण हाती लागले आणि राजू सूर्यवंशी याने पथरोड टोळीला सेाबत घेत बारसेंची हत्या घडवून आणल्याचे सांगण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Delhi Weather: दिल्लीची हवा बनली विषारी...! श्वास घेणंही कठीण; AQI 460 पार , GRAP-4 लागू...

Raj Thackeray: ..तर जाऊ शकते मनसेची मान्यता; राज ठाकरेंचे भवितव्य जनतेच्या हाती

Mallikarjun Kharge : उत्तरप्रदेशात आगीत 10 मुलांचा मृत्यू झाला तरी योगींच्या महाराष्ट्रातील सभा थांबल्या नाहीत, खर्गेंचा हल्लाबोल

आज सायंकाळी 6 वाजता थंडावणार प्रचाराच्या तोफा! मतदानापूर्वीच्या 30 तासातील हालचालींवर भरारी पथकांचा वॉच; बुधवारी सकाळी 7 ते सायंकाळी 6 पर्यंत मतदान

Amit Shah : राज्यात १६० पेक्षा जास्त जागांवर महायुतीचा विजय निश्चित..! : अमित शाह

SCROLL FOR NEXT