Crime News esakal
जळगाव

Jalgaon Crime News : व्याजाच्या पैशांसाठी मुलीचा विनयभंग; पैसे वसुलीसाठी शिक्षकाने सोडली पातळी

Crime News : काजूच्या व्यवसायासाठी पीडितेच्या आईवडिलांनी सुवर्णा रामकृष्ण पाटील (संत मीराबाईनगर) व वंदना अजय पाटील (रा. खोटेनगर) यांच्याकडून व्याजाने दोन लाख रुपये घेतले होते.

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Crime News : पैशांवरील व्याज न दिल्याने सिंधी कॉलनी परिसरातील शाळेत १५ वर्षीय मुलीस बळजबरी नेत विनयभंग करून धमकावण्यात आले. याबाबत एमआयडीसी पोलिस ठाण्यात दोन महिलासंह त्यांच्या पतींविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून, पीडितेला धमकावणारा शिक्षक असल्याचे तक्रारीत नमूद केले आहे. (Jalgaon Crime Girl molested for interest money)

काजूच्या व्यवसायासाठी पीडितेच्या आईवडिलांनी सुवर्णा रामकृष्ण पाटील (संत मीराबाईनगर) व वंदना अजय पाटील (रा. खोटेनगर) यांच्याकडून व्याजाने दोन लाख रुपये घेतले होते. त्यापोटी चार कोरे चेक दोघांना दिले होते. पीडितेच्या आईने घेतलेल्या दोन लाखांऐवजी तब्बल सहा लाख रुपये व्याज म्हणून दोघी महिलांना परत केले आहे. तरीही १ लाख ४० हजारांची बाकी असल्याने संबंधितांकडून पैशांचा तगादा सुरू होता.

बळजबरी नेण्याचा प्रयत्न

व्याजाची रक्कम दिली नाही, म्हणून संशयितांनी मुलीला १२ जूनला बळजबरी दुचाकीवर बसवून नेण्याचा प्रयत्न केला. पीडितेच्या आईने फोनवरून विनवण्या केल्यावर दोघी बहिणींना सोडून देण्यात आले. पीडिता शिक्षण घेत असलेल्या शाळेत संशयित सुवर्णा पाटील यांचे मेहुणे अजय शांताराम पाटील शिक्षक आहेत. १८ जूनला या शिक्षकाने पीडितेला पैशांसाठी धमकावले व विनयभंग केला. घडला प्रकार कुणाला सांगितला, तर दोघी बहिणींना मारून टाकू, असे धमकावल्याचे पीडितने तक्रारीत नमूद केले आहे. (latest marathi news)

मदतीनंतर तक्रार

पीडित कुटुंब भितीमुळे कुठे येत-जात नसल्याने मदत मिळू शकली नाही. अखेर मेहरुण परिसरातील काही सामाजिक आणि राजकीय पदाधिकाऱ्यांच्या संपर्कात आल्यावर त्यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्याचे निरीक्षक बबन अव्हाड यांना घडलेला प्रकार सांगितला.

या प्रकरणी सुवर्णा पाटील, रामकृष्ण देवराम पाटील (रा. संत मीराबाईनगर) शिक्षक अजय पाटील, वंदना शांताराम पाटील (श्रद्धा कॉलनी, दत्तमंदिराजवळ) यांच्याविरुद्ध एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. सहाय्यक फौजदार राजेंद्र उगले तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chopda Assembly Election 2024 Result Live: चोपडा विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडी विरुद्ध महायुतीत काटे की टक्कर..!

Islampur Assembly Election 2024 Results : जयंत पाटील विरुध्द निशिकांत पाटील

Erandol Parola Assembly Election 2024 result live : एरंडोल पारोळ्यात कोण मारणार बाजी?

Ghatkopar East Assembly Election 2024 Result live : घाटकोपर पूर्व मतदार संघात भाजप आणि शरद पवार गटात दुहेरी लढत

Mira Bhaindar: Assembly Election 2024 Result Live: मिरा-भाईंदर मतदारसंघात सय्यद मुजफ्फर हुसेन विरुद्ध नरेंद्र मेहता

SCROLL FOR NEXT