Crime  esakal
जळगाव

Jalgaon Crime News : आयजी पथकाचा जुगार अड्ड्यावर छापा; साडेचार लाखांचा मुद्देमाल जप्त

Jalgaon Crime : चोपडा शहर ठाण्याचे अधिकारी व अंमलदारांनी मंगळवारी (ता. २) नगरपरिषदच्या पाठीमागील मोकळ्या जागेत सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर छापा टाकला व चार लाख ३४ हजारांचा मुद्देमाल जप्त केला.

सकाळ वृत्तसेवा

चोपडा : नाशिक परिक्षेत्रचे विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. बी. जी. शेखर पाटील यांचे पथक व चोपडा शहर ठाण्याचे अधिकारी व अंमलदारांनी मंगळवारी (ता. २) नगरपरिषदच्या पाठीमागील मोकळ्या जागेत सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर छापा टाकला व चार लाख ३४ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. लक्ष्मण बाविस्कर (वय ४०, रा. पंचशीलनगर, चोपडा) खुशाल एकनाथ बाविस्कर (४८, रा. कोळंबा). (Jalgaon crime IG team raids gambling dens Four and a half lakh worth of goods seized)

अजय कैलास माळी (२२, रा. लोहीयानगर, थाळनेर दरवाजा, चोपडा), वाल्मीक जिजाबराव शिंदे (४६, रा. वर्डी, ता. चोपडा), अमोल पुखराज जैन (३८, रा. पंकजनगर, चोपडा), हिरालाल रामदास बाविस्कर (४३, रा. कोळंबा, ता. चोपडा), सागर किशोर पाटील(१९, रा. बुधगाव, ता. चोपडा), प्रवीण ओमकार बाविस्कर (४०, रा. कोळंबा, ता. चोपडा), प्रदीप धुडकू महाजन (५३, रा. अडावद, ता. चोपडा). (latest marathi news)

अनिल प्यारेलाल लोहार (४७, रा. मराठा गल्ली, आशा टॉकीजजवळ, चोपडा), सुधाकर छन्नू सोनवणे (३८, रा. गौतमनगर, चोपडा), आकाश आझाद कोळी (२०, रा. कुरवेल, ता. चोपडा), योगेश सुधाकर भोई (२२, रा. होळनांथे, ता. शिरपूर) व इतर पळून गेलेले काही जण पत्यांवर पैसे लावून तिरट नावाचा जुगाराचा खेळताना मिळून आले. चार लाख ३४ हजार रुपयांचा मुद्देमालही पोलिसांना मिळून आला. याबाबत चोपडा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT