A team of revenue department taking action with seized sand stock in Chahardi Shivara. esakal
जळगाव

Jalgaon Crime: नऊ लाखांची अवैध वाळू जप्त! महसूल विभागाची कारवाई; चोपडा तालुक्यातील चहार्डी शिवारात होता साठा

Jalgaon News : चहार्डी शिवारातील या शेतात शेकडो ब्रास वाळूचा अवैध साठा असल्याची माहिती जळगावच्या जिल्हाधिकारी यांच्याकडे मिळाली.

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Crime : तालुक्यातील चहार्डी शिवारात गट क्रमांक ९०३मधील शेतात विना परवाना अवैध वाळूसाठा असल्याची गोपनीय माहिती महसूल विभागाला मिळाली. त्यावरून महसूल विभागाच्या पथकाने भेट देऊन तपासणी केली. त्यानंतर सुमारे नऊ लाख ४० हजार रुपये किंमतीचा अवैध वाळूसाठा जप्त करण्यात आला. (Jalgaon Crime Illegal sand seized worth nine lakhs Revenue Department action)

चहार्डी शिवारातील या शेतात शेकडो ब्रास वाळूचा अवैध साठा असल्याची माहिती जळगावच्या जिल्हाधिकारी यांच्याकडे मिळाली. त्यांनी चोपडा येथील तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांना कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यानुसार चोपडा येथील महसूल पथकात नायब तहसीलदार सचिन बांबळे, मंडळ अधिकारी रवींद्र बेलदार, तलाठी मुकेश देसले, पंकज बाविस्कर, गजानन पाटील, कुलदीप पाटील यांनी मंगळवारी (ता.९) दुपारी घटनास्थळी भेट दिली. त्यात तपासणीनंतर सुमारे २०० ब्रास वाळूचा अवैध साठा पथकाने जप्त केला. शासकीय परवानगी न घेता अवैधरित्या गौणखनिज वाहतूक व साठा करून तिची नदी पात्रातून वाहतूक करून साठा केला. (latest marathi news)

याप्रकरणी शेतमालक गणेश रमेश पाटील व इतर त्यांच्या सोबत असणाऱ्यांविरुद्ध तलाठी मुकेश सुरेश देसले यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चोपडा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतचा पुढील तपास पोलिस निरीक्षक मधुकर साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक अनिल भुसारे करीत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitin Gadkari: भाजपच्या दुसऱ्या यादीवर कोणाचं वर्चस्व? फडणवीस, बावनकुळे दिल्लीहून थेट गडकरींच्या घरी

Wayanad Loksabha ByElection : ‘बनवाबनवी’त भाजप पटाईत; वायनाडच्या व्हायरल व्हिडिओवरून काँग्रेसचे टीकास्त्र

Maharashtra Assembly Elections 2024 : मोदींच्या सभांचा राज्यात धडाका ?

Bomb Attack : इराक, सीरियावर तुर्किएचा बॉम्बवर्षाव; कुर्दिश दहशतवाद्यांची ठिकाणे केली नष्ट

अग्रलेख : उघड्यावरचे वाघडे!

SCROLL FOR NEXT