Jalgaon Crime News : वीटभट्टी साठी लागणारा गाळ माती वाहतुकीचे परमिट काढून त्यावर मात्र पिवळी मातीची अवैधवाहतूक होत असल्याची तक्रार रावण कौतिक कुंभार (रा.कुंभारवाडा अमळनेर) यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.
तक्रारदार कुंभार यांच्या तक्रारीनुसार, मोजे कोळंबा (ता.चोपडा) येथील एका गटातून घोडगाव (ता चोपडा) येथील एकाच्या नावाने गाळ माती वाहतूकीचे परमीट ५०० ब्रास विना मुदतीचे काढले आहे. (Jalgaon crime Licensing Silt Soil Transportation Yellow Soil Complaint to District Collector against illegal traffic)
जानेवारीपासून डंपर पिवळी मातीची सर्रास वाहतूक करीत असल्याचे दिसून येत आहे. शहरात कॉलनी परिसरात नर्मदा नगर, श्रीराम नगर येथे खासगी बांधकामावर मातीचा भराव करत असून एका दिवसात सात ते आठ ट्रीपा वाहतूक करीत असल्याने आतापर्यंत १२०० ते १५०० ब्रास पिवळी मातीचे वाहतूक मौजे कोळंबे शिवारातून करण्यात आली आहे.
पण यात आजपर्यंत एकही ट्रीप घोडगावला आली नाही , सदर गाडी फक्त पिवळी माती वाहतूक करत आहे.
सदर गाडी मालक व शेत मालक हे हेतू पुरस्कर शासनाची फसवणूक करीत असून आतापर्यंत शासनाचा लाखो रुपये महसूल बुडविला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कायदेशीर कडक कारवाई करावी व दोषींवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी रावण कौतिक कुंभार यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केलेल्या तक्रारीत म्हटले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.