जळगाव : परिवहन राज्य महामंडळाच्या बसचालक व वाहकाला मारहाण केल्याप्रकरणी जिल्हा न्यायालयाने आरोपीला सहा महिने सश्रम कारवासासह दंडाची शिक्षा सुनावली.
भुसावळ आगारातील वाहक दीपक रामकृष्ण बडगुजर, चालक अनिल उत्तम पाटील भुसावळ-सुरत बस (एमएच १९, सीक्यू ६९४) २६ एप्रिल २०१८ ला घेऊन निघाले होते. बस राष्ट्रीय महामार्गावरील खेडी पेट्रोलपंपाजवळ आली असता, नवनाथ आसाराम शिंदे याने त्याच्या दुचाकीने पाठलाग करत बस समोर दुचाकी आडवी लावली. नंतर बसमध्ये शिरत वाहक दीपक बडगुजर यांना मारहाण केली व त्यांच्याजवळील तिकीट बुकिंगचे हजार रुपये काढून घेतले.
वाहक दीपक यांच्या जबाबावरून एमआयडीसी पोलिस ठाण्यात संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता. तपासाधिकारी संभाजी पाटील यांनी वेळेत तपास पूर्ण करून दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले. अतिरीक्त सत्र न्यायाधीश शरद आर. पवार यांच्या न्यायालयात खटल्याची सुनावणी झाली. सरकारी अभियोक्ता ॲड. सुरेंद्र काबरा यांनी सात साक्षीदारांच्या साक्षी नोंदविल्या. त्यात प्रत्यक्षदर्शी प्रवासी, तपासाधिकारी, चालक, उपचार करणारे डॉ. बिराजदार यांच्या साक्ष महत्त्वाच्या ठरल्या. दोन्ही पक्षाचा युक्तिवाद होऊन आरोपीविरुद्ध दोषारोप सिद्ध झाले. सरकार पक्षाचे म्हणणे ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपी नवनाथ आसाराम शिंदे यास सहा महिने सश्रम कारवास आणि पाचशे रुपये दंडाची शिक्षा ठोठावली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.