call esakal
जळगाव

Jalgaon Crime News : उद्योजकाकडे मागितली 8 लाखांची खंडणी; पत्रकारासह 3 महिलांचा समावेश

सकाळ वृत्तसेवा

एरंडोल : येथील प्रसिद्ध उद्योजक तथा बालाजी ग्रुपचे संचालक अनिल गणपती काबरे यांना वारंवार धमक्या देऊन आठ लाखांची खंडणीची मागणी करणाऱ्या पत्रकारासह आठ संशयिताना पोलिसांनी सापळा रचून खंडणी स्वीकारताना अटक केली.

संशयितांमध्ये तीन महिलांचा समावेश आहे. यातील एक महिला, तीन पुरुष यांना पोलिसांनी आपल्या सहकाऱ्यांना पकडल्याची चाहूल लागताच चारही जणांनी दुचाकीवरून पळ काढला. मात्र सहाय्यक पोलिस निरीक्षक गणेश अहिरे, पोलिस कर्मचारी जुबेर खाटीक, महिला पोलिस ममता तडवी, होमगार्ड दिनेश पाटील यांनी त्यांचा सिनेस्टाईल पाठलाग करून पाळधी पोलिसांच्या सहकार्याने ताब्यात घेतले.

येथील प्रसिद्ध उद्योजक अनिल काबरे व त्यांच्या परिवारातील सदस्यांची म्हसावद रस्त्यावर बालाजी ऑइल मिल नावाची तेलाची कंपनी आहे. अनिल काबरे यांना एक महिला व एका पुरुषाने तुमच्या ऑइल मिलबाबत सरकारी कार्यालयाकडे तक्रार करण्यात येईल, अशी धमकी देऊन सात ते आठ लाखांची खंडणी मागितली.

उद्योजक अनिल काबरे यांनी खंडणीची धमकी आल्यानंतर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. खंडणीखोर खंडणीची रक्कम घेण्यासाठी आज येणार असल्याची माहिती अनिल काबरे यांनी पोलिसांना दिली. पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव, सहाय्यक निरीक्षक गणेश अहिरे, उपनिरीक्षक शरद बागल, पोलिस कर्मचारी अनिल पाटील, मिलिंद कुमावत, संदीप पाटील, जुबेर खाटीक, महिला पोलिस ममता तडवी, होमगार्ड दिनेश पाटील यांनी पंचांसह बालाजी ऑइल मिल येथे सापळा रचला.

त्याचवेळी दोन महिला व दोन पुरुष हे खंडणी मागण्यासाठी ऑइल मिलमध्ये आले. तर एक महिला व तीन पुरुष मिलच्या बाहेर उभे राहिले होते. मिलमध्ये आलेल्या आलेल्या खंडणीखोरांपैकी एका महिलेने उद्योजक काबरे यांच्याकडून एक लाख रुपयांची खंडणी स्वीकारताच दबा धरून बसलेल्या पोलिस पथकाने महिलेसह तिच्या साथीदारांना पकडले.

पोलिसांनी सहकाऱ्यांना पकडल्याची चाहूल लागताच मिलच्या बाहेर थांबलेल्या एक महिला व तीन पुरुषांनी दुचाकीवरून म्हसावद नाकामार्गे जळगावकडे पळून जाण्याचा प्रयत्न केला. सहाय्यक पोलिस निरीक्षक गणेश अहिरे व त्यांच्या सहकाऱ्यांनी सिनेस्टाइल पाठलाग करून पाळधी पोलिसांच्या सहकार्याने त्यांना ताब्यात घेतले. सर्व खंडणीखोरांना ताब्यात घेऊन पोलिस ठाण्यात आणले.

पोलिसांनी चौकशी केली असता त्यांनी त्यांची नावे शशिकांत कैलास सोनवणे (रा. द्वारकानगर, भुसावळ), सिद्धार्थ सुनील सोनवणे (रा.ताप्ती क्लब, भुसावळ), रुपाली राजू तायडे (रा.धम्मनगर, भुसावळ), आकाश सुरेश बोदडे (रा.तळणी, ता. मोताळा), मिलिंद प्रकाश बोदडे (पत्रकार; रा. तळणी, ता. मोताळा, जि.बुलडाणा), गजानन आनंदा बोदडे (रा. धम्मनगर, भुसावळ) भुसावळच्या कुलकर्णी प्लॉटमधील अल्पवयीन मुली अशी सांगितली.

सर्व खंडणीखोरांना पोलिसांनी ताब्यात घेतले. दरम्यान पत्रकार मिलिंद बोदडे यांनी यापूर्वी देखील विविध शासकीय कार्यालयात वेगवेगळ्या नावाने बालाजी ऑइल मिलविरोधात तक्रारी करून अनिल काबरे यांच्याकडून सुमारे साठ ते सत्तर हजार रुपये खंडणी घेतली आहे.

सर्व संशयितांनी अनिल काबरे यांना मिलबाबत तक्रारी करण्याची धमकी देऊन आठ लाख रुपयांची खंडणी मागितली होती. पोलिसांनी त्यांना आज सापळा रचून एक लाख रुपये स्वीकारताना ताब्यात घेतले.

पोलिसांनी संशयितांकडून एक लाख रुपये रोख, आठ मोबाईल, दोन दुचाकी व एक डिझायर कार असा १० लाख ४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. संशयितांमध्ये दोन मुलींच्या वयाबाबत साशंकता असल्यामुळे त्यांची बालसुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे. सहाय्यक निरीक्षक गणेश अहिरे व त्यांचे सहकारी तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur North Assembly Election 2024 Results : 'कोल्हापूर उत्तर'मधून राजेश क्षीरसागर तब्बल 30 हजार मतांनी विजयी; लाटकरांचा केला पराभव

karmala Assembly Election 2024 Result Live: करमाळ्यात नारायण आबा पाटील यांचा विजय, संजयमामा शिंदे यांना धोबीपछाड, बागल गटाचे अस्तित्व धोक्यात

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: राज ठाकरेंना मोठा धक्का, अमित ठाकरे पडले

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: महायुतीचे नेते पत्रकार परिषद घेणार

Jaykumar Gore won Man Assembly Election 2024 Result: जयाभाऊचा विजयाचा चाैकार! माण-खटावमध्ये प्रभाकर घार्गे यांचा माेठा पराभव

SCROLL FOR NEXT