Jalgaon Crime News : शहरातील शाहुनगर परिसरात मोठ्या प्रमाणावर ड्रग्ज् विक्री होत असल्याच्या माहितीवरून काल उप अधिक्षक संदीप गावित यांच्या मार्गदर्शनाखाली छापेमारीत शाहुनगरला गुटख्याचा साठा मिळाला. तर एक महिला एम.डी.ड्रग्जचा माल घेवुन पळून गेली. तर एका घरातून गांजा मिळाला. हे कमी कि काय याच भागात तलवार आणि चॉपरने दहशत माजविणारे जेरंबद करण्यात पोलिसांना यश आले.(Jalgaon Crime police inspecting in Shahunagar on information about sale of drugs)
पोलिस नाईक तेजस मराठे यांना शाहुनगर कॉम्पलेक्स जवळ नशेत तर्रर्र अयान असन भिस्ती (वय २०) या गोंधळ घालणाऱ्या तरुणाला हटकल्यावर त्याच्याकडील एमडी ड्रग्जचा सुगावा लागला.
निरीक्षक अनिल भवारी यांनी वरिष्ठांना कळविल्यावर उप अधिक्षक गावित यांच्यासह गुन्हे शोध पथकाने शाहुनगरात धडक देत अयान भिस्ती याच्या घराच्या झडतीत अन्सार हसन भिस्ती (वय २२) याच्याकडे १३४ पुडे विमल पानमसाला, सुगंधित तंबाखू आणि रोख रक्कम असा ७४ हजार १४९ रुपयांचा ऐवज पोलिसांनी जप्त केला.
ड्रग्ज घेउन महिला फरार
पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या नशेखोर तरुणाने दिलेल्या माहितीनुसार, त्याने एम.डी.ड्रग्जचा सर्व माल एका महिलेकडे ठेवण्यासाठी दिला होता. पोलिसांचा छापा पडताच ती महिला ड्रग्जचा साठा घेवुन पसार झाली. पोलिसांनी बराच वेळ शोध घेऊनही पोलिसांना रिकाम्या हाताने परतावे लागले.
इंदिरानगरला गांजा
पिंप्राळा रोडवर इंदिरानगर झोपडपट्टीतील रहिवासी मजीद शेख चांद (वय ४४) याच्या घरावरील छाप्यात पोलिसांना ३४४ ग्रॅम गांजाच्या पुड्या मिळाला. यात संशयित मजीद शेख चांद याला अटक करण्यात आली आहे. सहाय्यक निरीक्षक रवींद्र बागूल करत आहेत. पोलिस कर्मचारी किशोर निकुंभ यांच्या तक्रारीवरून शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
तलवारीसह चॉपरधारी जेरबंद
धाडसत्र सुरु असताना व्हॉटस्ॲपग्रुपवर तलवारीसह नाचताना एका तरुणाचा फोटो व्हायरल झालेल्या संशयिताला पोलिस निरीक्षक अनिल भवारी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार उमेश भांडारकर, विजय निकुंभ, प्रफुल्ल धांडे, रतन गिते, तेजस मराठे, अमोल ठाकूर यांच्या पथकाने शहरातील शाहुनगर पडकी शाळेच्या मागील गल्लीतून सर्फराज जावेद भिस्ती (वय २०) याला ताब्यात घेत त्याच्याकडील तलवार जप्त केली.
चॉपरधारी अटक
याच भागातील सैय्यद आफताब सैय्यद ऐजाज (वय २४) याचा चॉपर हातात घेतलेला फोटो व्हॉटस्ॲप ग्रुपवर व्हायरल झाला होता. गुन्हेशोध पथकाने शाहुनगरातून सैय्यद आफताब सैय्यद ऐजाज याला ताब्यात घेत त्याचा पाहुणचार केल्यावर त्याच्याकडून चॉपर हस्तगत केला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.