Jewellry Theft esakal
जळगाव

Jalgaon Crime: जुन्नी टोळीच्या मदतीने सराफा पेढ्या फोडण्याचा धडाका! एक लाखांची चांदी जप्त; रितेशने आखली गुन्ह्यांची ब्लुप्रिंट

Crime News : सिक्कलगर-जुन्नी याची टोळी अन्‌ दुसरीकडे शनिपेठेतील मेहतर वाड्यातील सारवान गँगच्या युतीने सौरभ ज्वेलर्ससह यापूर्वी सराफ बाजारात तीन मोठे गुन्हे केल्याचे निष्पन्न झाले आहे.

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Crime : सराफ बाजारातील सौरभ ज्वेलर्स दरोडा प्रकरणात सहा संशयितांच्या टोळीला पोलिसांनी अटक केली आहे. एकीकडे राजीव गांधीनगरातील सिक्कलगर-जुन्नी याची टोळी अन्‌ दुसरीकडे शनिपेठेतील मेहतर वाड्यातील सारवान गँगच्या युतीने सौरभ ज्वेलर्ससह यापूर्वी सराफ बाजारात तीन मोठे गुन्हे केल्याचे निष्पन्न झाले आहे. (Jalgaon Crime robbery bullion heaps with help of junni gang)

जळगाव सराफ बजारात एका मागून एक सराफा पेढ्या फोडल्या जात असून, कुठे जबरी लूट, दरोडा, तर कुठे नुसतेच दुकान फोडण्याचे एका मागून एक चार गुन्हे दाखल झाले. संशयित मात्र हाती लागत नव्हते. पोलिसांनी सीसीटीव्हीवरून संशय घेत रणजितसिंग जुन्नी याचा शोध सुरू केला, तर तो पुण्याला पळून गेल्याची भनक लागली अन्‌ त्याचा रातोरात पिच्छा पुरवून त्याला अटक केली.

सोबत त्याचे तिन्ही भाऊ तावडीत सापडले अन्‌ गुन्ह्याचा उलगडा झाला. सौरभ ज्वेलर्ससह सराफ बाजारात यापूर्वी झालेल्या गुन्ह्यांचा मास्टरमाईंड रितेश संतोष आसेरी असल्याचे निष्पन्न झाले. सर्व सहा संशयितांना समोरासमोर आणत पोलिसी पाहुणाचाराची पंगत झाल्यावर या टोळीने सव्वा लाखांच्या चांदीचा ऐवज काढून दिला, तसेच गुन्ह्यात वापरलेल्या तिन्ही दुचाकी पोलिसांनी जप्त केल्या आहेत.

ओतारी मास्टर माईंड

रितेष संतोष ओतारी कोरोना काळापूर्वी सौरभ ज्वेलर्समध्ये कामाला होता. लॉकडाऊन लागल्याने बेरोजगार झाल्याने तो जिल्हा रुग्णालयात कान्ट्रॅक्टवर कामाला होता. तेथेच त्याची सोनू सारवानच्या मदतीने राजीव गांधीनगरातील जुन्नी टोळीशी ओळख होऊन मैत्री झाली होती. (latest marathi news)

रितेशने यापूर्वी सराफ बाजारात इतरही ठिकाणी कामे केली असल्याने भवानीपेठ, मारुतीपेठ, बागवान मोहल्ला, जोशीपेठ हा सराफा कारागीरांचे प्रस्त असलेल्या परिसरातील खडान्‌खडा माहिती त्याला आहे. त्याने कामे केलेल्या मोठ्या सराफ पेढ्यांना लक्ष केले. रणजितसिंग जुन्नीला त्याने आखलेला संपूर्ण प्लॅन समजावून सांगत दरोडे टाकत असल्याचे कबूल केले. यापूर्वीच्‍या तीन मोठे दुकान फोडल्याचे व दरोड्याची कबुली संशयितांनी दिली आहे.

सारवान-जुन्नी युती

राजीव गांधीनगरातील अट्टल गुन्हेगारी टोळी असलेल्या जुन्नी टोळीसोबत रितेश सारवान, सोनू सारवान, दीपक भक्तराज गोयर, रणजितसिंग जुन्नी, सागरसिंग जुन्नी, जसवंतसिंग जुन्नी यांनी सौरभ ज्वेलर्सवगळता मारोती पेढेतील दरोडा आणि तीन गुन्हे केले. याव्यतिरिक्त धुळे, नंदुरबार, नाशिक येथे कोटीच्या घरात सराफा पेढ्या फोडल्या आहेत. सोनू सारवान याच्यावर चौगुले प्लॉट गोळीबार प्रकरण, कापूस व्यापारी लूट व खून प्रकरणासह इतर गंभीर गुन्हे दाखल आहेत.

"रणजितसिंग जुन्नीची टोळी आणि सोनू सारवानची गँग मिळून संघटितपणे अनेक गुन्हे करीत असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यांच्यावर मकोका अंतर्गत कारवाई विचाराधीन आहे."

-संदीप गावित, पोलिस उपअधीक्षक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

बाप'माणूस! सरकारी रुग्णालयातील अग्निकांडात याकूबने परक्यांच्या बाळांना वाचवले, मात्र आपल्या जुळ्या मुली गमावल्या...

'Rishabh Pant ला हॉस्पिटलमध्ये पाहिलं तेव्हा वाटलं परत क्रिकेट...', रवी शास्त्रींनी सांगितली आठवण

Satara Crime : घरात जेवण बनविण्याच्या वादातून पतीने केला पत्नीचा खून; लाथाबुक्क्या, लाकडी काठीने बेदम मारहाण

'या' तारखेला सामांथाचा पूर्वाश्रमीचा नवरा अडकणार पुन्हा लग्नबंधनात ; पत्रिकेचा फोटो झाला व्हायरल

Chh. Sambhajinagar Assembly Election 2024 : निवडणूक प्रचाराकडे रोजंदारी मजुरांनी फिरवली पाठ

SCROLL FOR NEXT