Jalgaon Crime News : येथे दाखल चोरीच्या गुन्ह्यात अटकेत असलेल्या दोन संशयितांची चौकशी केली असता त्यांनी जिल्ह्यातील विविध सात ठिकाणी चोरी केल्याचे उघड झाले. या संशयितांकडून ३ लाख ५५ हजार रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला. येथे २५ मे व १८ जूनला चोरीचा गुन्हा दाखल झाला होता. अनुक्रमे तीन लाख तीन हजार रोख रक्कम व सोन्या चांदीचे दागिने तसेच १ लाख २८ हजार रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम चोरी झाली होती. (Two arrested in Faizpur theft case revealed that 7 places were stolen in district )
या गुन्ह्याचा तपास सुरू असताना शिरपूर येथेही चोरीचा गुन्हा दाखल झाला होता. त्यात असलेले संशयित व ‘सीसीटीव्ही’ कॅमेत कैद असलेले येथील चोरीच्या गुन्ह्यातील संशयित यांचे वर्णन सारखे दिसत असल्याने या संशयितांना पोलिसांनी तपासासाठी ताब्यात घेतले. राजेंद्रसिंग उर्फ राजन प्रितमसिंग बरनाल( वय २६) व ईश्वरसिंग नुरबिनसिंग चावला (वय २३, दोघे रा. उमर्टी, ता. वरला, जि. बडवाणी, मध्य प्रदेश) अशी संशयितांची नावे आहेत.
या दोघांची पोलिसांनी कसून चौकशी केली असता त्यात फैजपूर येथील २, रावेर येथील २, यावल येथील २, अडावद येथील १ अशा एकूण ७ गुन्ह्यांची कबुली या संशयितांनी दिली. दरम्यान, पथकाने इंदूर येथे जाऊन सातही गुन्ह्यातील तब्बल ३ लाख ५५ हजार रुपयांचा सोने चांदीच्या दागिन्यांचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे. त्यात ७० ग्राम सोने व १०० ग्रॅम चांदीच्या दागिन्यांचा समावेश आहे. सहाय्यक पोलिस अधीक्षक अन्नपूर्णा सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक नीलेश वाघ, पोलिस उपनिरीक्षक मैन्नुद्दीन सय्यद, पोलिस कर्मचारी रवींद्र मोरे, अनिल पाटील, मोती पवार, विकास सोनवणे, भूषण ठाकरे या पथकाने हा तपास केला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.