Sadiq pinjari esakal
जळगाव

Jalgaon Crime News : अनाधिकृत गॅस पंप सुरूच! शिरसोलीतील छाप्यात 73 सिलिंडरसह संशयिताला अटक

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Crime News : शहरासह तालुक्यात स्वयंपाकाच्या सिलिंडरचा मोठ्या प्रमाणावर काळा बाजार सुरू आहे. दैनिक सकाळने विशेष वृत्तांकन करुन याकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. मात्र, या अनाधिकृत गॅस पंपावर कुठलीच कारवाई अद्याप झाली नाही. पोलिस दलाच्या स्थानिक गुन्हेशाखेने शहरापासून २० किलोमिटरवरील शिरसोली येथे छापा टाकत काळाबाजारात गॅस विक्री केंद्रावरून ७३ अनाधिकृत सिलिंडरसह तब्बल साडेपाच लाखांचा ऐवज जप्त केला. या एका संशयिताला अटक केली आहे. (Suspect arrested with 73 cylinders in Shirsoli raid)

स्थानिक गुन्हेशाखेचे वरिष्ठ निरीक्षक बबन अव्हाड यांना मिळालेल्या माहितीनुसार, सादीक सिराज पिंजारी (वय ४१, रा. मलीकनगर, शिरसोली प्रन ता. जळगाव) हा त्याच्या राहत्या घराच्या मोकळ्या जागेत घरघुती वापराचे सिलिंडर प्रवासी वाहनांत ब्लॅकने भरून विक्री करीत होता.

त्यासाठी त्याने तब्बल ७३ सिलिंडरचा साठा केल्याचे आढळून आले. पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्या पथकातील वरिष्ठ निरीक्षक बबन अव्हाड, दत्तात्रेय निकम, उपनिरीक्षक दत्तात्रेय पोटे, सहायक फौजदार अतुल वंजारी, अधिकार पाटील, विजय पाटील, हरीलाल पाटील, प्रदिप चवरे, ईश्वर पाटील, प्रदिप सपकाळे, शुद्धोधन ढवळे यांच्या पथकाने साध्या वेशात शिरसोलीत जाऊन रविवारी (ता.२९) दुपारी छापा टाकला. (latest marathi news)

या ठिकाणी सादिक सिराज पिंजारी वाहनांत गॅस भरताना आढळला. त्याच्याजवळ तब्बल ७३ सिलिंडरचा साठाही आढळून आला. पथकाने भारत, एचपी गॅस, इंडीयन गॅस कंपनीचे सिलिंडरसह ऑटो रिक्षा (क्रमांक मएमएच.१९.बी.एम.२७८४), वाहनात गॅस भरण्याचे मशिन, गॅस नळ्या असा एकूण पाच लाख २९ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या गॅस फिलींग सेंटरचा चालक सादिक पिंजारीविरुद्ध रात्री उशिरा एमआयडीसी पोलिस ठाण्यात जीवनावश्यक वस्तू काळ्याबाजारात विक्री अधिनियमाअंतर्गत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Baba Siddique Murder : बाबा सिद्दीकींच्या हत्येमागे लॉरेन्स बिश्नोई गँगचा हात? पकडलेल्या दोघांपैकी एक यूपी तर दुसरा हरियानाचा

CM on Baba Siddique: सिद्दीकी हत्येचा खटला फास्टट्रॅक कोर्टात चालवणार; एन्काऊंटर स्पेशालिस्ट दया नायक करणार तपास; मुख्यमंत्र्यांची घोषणा

Baba Siddiqui: कार्यक्रमाला उपस्थिती, फटाके फोडताना साधला डाव, वाचा बाबा सिद्धिकींचा हत्येचा थरार!

Baba Siddiqui Case: ...हे मोठं षडयंत्र; बाबा सिद्दिकींची हत्या चिंतेची बाब, भाजप नेत्याची प्रतिक्रिया

Samir Khan: नवाब मलिक यांचे जावई समीर खान यांचं निधन; काही दिवसांपूर्वी झाला होता अपघात

SCROLL FOR NEXT