Closed house of Vijay Bhaskar Patil in Dixit Wadi. esakal
जळगाव

Jalgaon Crime News : मुलाच्या अपहरणासाठी पित्याच्या पिस्तुलाचा वापर

Jalgaon Crime : स्वर्गीय नगरसेवक नरेंद्र (अण्णा) पाटील यांच्या भावंडांकडूनच मुलगा पीयूष आणि परिवाराचा छळ केला जात आहे.

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Crime : स्वर्गीय नगरसेवक नरेंद्र (अण्णा) पाटील यांच्या भावंडांकडूनच मुलगा पीयूष आणि परिवाराचा छळ केला जात आहे. (स्व.) नरेंद्र पाटील यांच्या लग्नातील सोने हिसकावून घेतल्याप्रकरणी दाखल गुन्हा सिद्ध झाला असताना आम्ही सांगू तसे शपथपत्रावर स्वाक्षरी करावी, यासाठी ॲड. पीयूष पाटील यांचे अपहरण केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. या गुन्ह्यातील शस्त्रजप्तीसाठी गुन्हे शाखा घरझडतीसाठी गेली असता, त्यांना खाली हात माघारी परतावे लागले. (Jalgaon Crime Use of father pistol to abduct child)

सलग तीस-चाळीस वर्षे जळगावच्या आपल्या प्रामाणिक राजकारणाचा दबदबा निर्माण करणारे स्वर्गीय नरेंद्र पाटील यांच्याच कुटुंबाला आता दहशतीत जीवन जगावे लागत असल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. ॲड. पीयूष नरेंद्र पाटील यांनी बुधवारी (ता. ६) त्यांच्या निवासस्थानी घेतलेल्या पत्रकार परिषदेत या सर्व छळाचा घटनाक्रम मांडला.

वडिलांच्या मृत्यूनंतर काही वर्षांनी वडिलांच्या लग्नाचे सोने बँकेच्या लॉकरमध्ये असल्याचे समोर आले. लॉकरमधून सोने काढून ते घराजवळील बँकेत ठेवण्याचे सांगत लहान काका संजयने सोबत जाऊन बँकेतून आणलेले सर्व सोने हिसकावून मारझोड केली. या प्रकरणी जिल्‍हापेठ पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यात तपास होऊन ते सर्व सोने तपासात संजय आणि मनोज पाटील यांच्या नव्याने उघडलेल्या लॉकरमधून पोलिसांनी ताब्यात घेतले.

या प्रकरणात न्यायालयात १६४ नुसार आईसह माझाही जबाब नोंदविण्यात आला होता. ॲड. पीयूष यांनी सांगितले, की पोलिसांत दाखल गुन्हा सिद्ध झाल्याने संशयितांना चिड आली. २८ डिसेंबर २३ रोजी रात्री साडेअकराला मी घरी परतल्यावर दबा धरून असलेल्या विजय पाटील यांनी लाथ मारून खाली पाडले.

लगोलग तेथे मनोज, संजय, नरेंद्र गांगुर्डे, सुहास चौधरी आले. विजय पाटीलने पिस्तूल लावून अपहरण करून त्यांच्या घरातील तळघरात नेले. तेथे आत्या शैलजा व इतर मंडळींनी हातपाय बांधून बेदम मारहाण केली. पिस्तूल लावत आम्ही सांगतो त्या शपथपत्रावर मुकाट्याने स्वाक्षरी कर, नाहीतर तुला मारून टाकू, असे धमकावत सकाळपर्यंत मारहाण केली. त्यानंतर दोन महिन्यांच्या मुदतीवर या सर्वांनी सोडले होते. परत त्यांचा वेगळाच प्रयत्न सुरू असल्याने मी पोलिसांत तक्रार दिली.

ते पिस्तूल माझ्या वडिलांचे

अपहरणानंतर विजय भास्कर, संजय, मनोज आणि आत्या शैलजा यांनी मारहाण करताना विजय पाटील यांच्याजवळ असलेल्या पिस्तुलीचे कव्हर मला दिसले, ते मी ओळखले. हे पिस्तूल माझ्या वडिलांचे असून, त्याच पिस्तुलीने गोळ्या घालून मारण्याचा या सर्वांचा प्रयत्न असल्याचे ॲड. पीयूष यांनी सांगितले. बेकायदेशीररीत्या हे पिस्तूल वापरात असून, संबंधितांवर कारवाई होणे अपेक्षित आहे.

पोलिस आले; मात्र घर बंद

जिल्‍हापेठ पोलिस ठाण्यात दाखल गुन्हा तपासाकरिता स्थानिक गुन्हे शाखेकडे सोपवावा, असा अर्ज ॲड. पीयूष यांच्याकडून देण्यात आला आहे. दरम्यान, मंगळवार (ता. ५) रात्री गुन्हे शाखेचे पथक न्यायालयाच्या आदेशाने सर्च वॉरंट घेऊन घरझडतीसाठी दीक्षित वाडीतील विजय भास्कर पाटील यांच्या घरी आले असताना घर बंद करून ही मंडळी बाहेरगावी निघून गेली होती. पोलिसांनी फोनवरून संपर्क साधला. मात्र पोलिसांना प्रतिसाद न मिळाल्याने माघारी परतावे लागले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Government Job: जिल्हा परिषद भरतीमध्ये घोळ? 19 नोव्हेंबरपर्यंत स्पष्टीकरण सादर करण्याचे कोर्टाचे आदेश

इलेक्शन ड्युटी नाकारणाऱ्या ८७२ कर्मचाऱ्यांना नोटिसा! प्रशिक्षणालाही दांडी, निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी काढली यादी; आता दाखल होणार गुन्हे अन्‌ शिस्तभंगाची कारवाई

Latest Maharashtra News Updates : गृह मतदान मोहिमत ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगांनी बजावला मतदानाचा हक्क

Mumbai School : मुंबईत शाळा-महाविद्यालयांना तीन दिवस सुट्टी, काय आहे कारण? घ्या जाणून!

Sakal Podcast: जोगेश्वरी-गोरेगाव दरम्यान १२ तासांचा ब्लॉक ते विम्याचे पैसे लाटण्यासाठी युवक बनले अस्वल

SCROLL FOR NEXT