Suspect stealing money from beer bar counter esakal
जळगाव

Jalgaon Crime : बिअरबार लुटमारीचा व्हिडिओ व्हायरल! 5 लाख 70 हजारांची लूट CCTVत कैद; दोघांना अटक, दोन संशयित फरार

Latest Crime News : हॉटेलमधून लुटलेली रक्कम अद्यापही मिळून आली नसल्याने या घटनेचे लाईव्ह फुटेज सोशल मीडियावर गुरुवारी (ता.१९) व्हायरल झाले. या घटनेत सिनेस्टाईल लूटमार होत असल्याचे स्पष्ट जाणवत आहे.

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Crime : शहरातील गुजराल पेट्रोल पंपाशेजारील बियरबारवर दगडफेक करून मॅनेजरसह दोघांना बेदम मारहाण करून सिनेस्टाईल हॉटेलचा गल्ला लुटला जात असल्याचा व्हिडिओ चार दिवसांनी व्हायरल झाला. या गुन्ह्यात दोन संशयितांना पोलिसांनी अटक केली आहे. अन्य दोघांचा अद्यापही शोध सुरू आहे. (Video of beer bar robbery viral)

गुजराल पेट्रोल पंपाशेजारील शंकर प्लाझामध्ये एनएन वाईन ॲण्ड बारमध्ये अमोल संतोष कोळी हा तरुण मॅनेजर आहे. गेल्या रविवारी (ता.१५) रात्री नऊच्या सुमारास सचिन चव्हाण, राकेश जाधव, भोला ऊर्फ सुगर भोई, अक्षय ऊर्फ गंप्या राठोड त्याठिकाणी आले. त्यांनी पाच बियरची मागणी केली.

परंतु, मॅनेजरने पैसे मागितले असता, त्यांच्याकडून शिवीगाळ करण्यात आली. मी कोण आहे? आताच ‘एमपीडीएम’ मधून सुटून आलो आहे, असे म्हणत ते बारमध्ये शिरले. त्यांनी ग्राहकाच्या हातातील बियरची बाटली ग्राहकाच्या डोक्यात मारून गंभीर जखमी केले. त्यानंतर ग्राहकांत पळापळ झाल्याने सचिन चव्हाणसह त्याच्या साथिदारांनी बारवर दगडफेक करण्यास सुरुवात केली.

त्यानंतर सचिन चव्हाण, अक्षय उर्फ गंप्या राठोड हे कॅश काऊंटरजवळ गेले आणि त्यातील पाच लाख ७० हजार रुपयांची रोकड जबरीने लुटून पसार झाले. मॅनेजर अमोल कोळी याच्या तक्रारीवरुन जिल्हा पेठ पोलिसांत सचिन चव्हाण, राकेश मिलिंद जाधव (वय २१, रा. पिंप्राळा), सागर ऊर्फ भोला अरुण भोई (वय २६, रा. पिंप्राळा), अक्षय ऊर्फ गंप्या राठोड यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राकेश जाधव व सागर भोई यांना अटक करण्यात आली असून, त्यांची पोलिस कोठडी पूर्ण होऊन आता कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. अन्य दोघे फरार आहेत. (latest marathi news)

सोशल मीडियावर चर्चा

घटनेची माहिती मिळताच जिल्‍हा पेठ पोलिस ठाण्याचे निरीक्षक राजेश मानगावकर घटनास्थळी आले. त्यांनी घडलेल्या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज माध्यमांना दिले तर, कारवाई करीन, असा दम हॉटेल मॅनेजर व पोलिस कर्मचाऱ्यांना दिला होता. मात्र, घटनेला पाच दिवस उलटूनही चौघा संशयितांना अटक होऊ शकली नाही.

हॉटेलमधून लुटलेली रक्कम अद्यापही मिळून आली नसल्याने या घटनेचे लाईव्ह फुटेज सोशल मीडियावर गुरुवारी (ता.१९) व्हायरल झाले. या घटनेत सिनेस्टाईल लूटमार होत असल्याचे स्पष्ट जाणवत आहे. जळगाव पोलिस दलाचा किती धाक गुन्हेगारांवर आहे, याचे चित्रण म्हणून यावर चर्चा सुरू झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime : धक्कादायक ! विरोधी उमेदवाराचा प्रचार केला म्हणून तडीपार गुंडांनी हातात कोयते घेऊन माजवली दहशत

Exit Poll : नवा एक्झिट पोल जाहीर, 175 जागांसह नवे सरकार, मुख्यमंत्री कोण होणार ?

Latest Maharashtra News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? जाणून घ्या एका क्लीकवर

Aaryavir Sehwag Double Hundred : वीरूच्या लेकाची दमदार खेळी! कुटल्या ३४ चौकार, २ षटकारांसह नाबाद २०० धावा

Gautam Adani: अदानी समुहाला आणखी एक मोठा धक्का! केनिया सरकारने रद्द केले सर्व करार

SCROLL FOR NEXT