Crime esakal
जळगाव

Jalgaon Crime News : पत्नीने दिराच्या मदतीने पतीला संपवले; चाळीसगाव पोलिसांकडून पत्नीला अटक

Jalgaon : प्रेमसंबंध प्रस्थापित करणाऱ्या पत्नीने दिराच्या मदतीने पतीवर ब्लेडने वार करून व डोक्यात दगड घालून त्याचा खून केला.

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Crime News : पतीकडून होणाऱ्या सततच्या त्रासाला कंटाळून आपल्या चुलत दिराशी प्रेमसंबंध प्रस्थापित करणाऱ्या पत्नीने दिराच्या मदतीने पतीवर ब्लेडने वार करून व डोक्यात दगड घालून त्याचा खून केला. खुनाचा हा प्रकार अपघात वाटावा या उद्देशाने अपघाताचा बनाव करणाऱ्या पत्नीला तिच्या प्रियकर दिरासह येथील पोलिसांनी मोठ्या शिताफीने अटक केली. ()

पोलिसांनी सांगितले, की कोदगाव (ता. चाळीसगाव) येथील तुषार देसले यांनी शहर पोलिस ठाण्यात खबर दिली, की रात्री पावणे अकरापूर्वी कुणाल बुंदेलखंडी यांच्या यांच्या शेताजवळ राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५२ वर बाळू सीताराम पवार (रा. गवळीवाडा, न्यायडोंगरी, ता. नादंगाव, जि. नाशिक) याला कोणत्या तरी अज्ञात वाहनाने धडक दिल्याने त्याचा मृत्यू झाला आहे. त्यानुसार पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली.

घटनास्थळी पोलिस गेल्यानंतर मयताच्या अंगावरील जखमांवरुन हा खुनाचा प्रकार असावा, असा पोलिसांना संशय आला. त्यानुसार, मयताच्या नातेवाइकांची विचारपूस केल्यावर मयताची पत्नी वंदना पवार हिच्यावर संशय बळावला. पोलिस निरीक्षक संदीप पाटील यांनी सहाय्यक निरीक्षक सागर ढिकले, गुन्हे शोध पथकाचे उपनिरीक्षक सुहास आव्हाड, संदीप घुले व कर्मचाऱ्यांना पाठवून वंदना पवार हिला येथील रेल्वे स्टेशन परिसरातून ताब्यात घेतले. पोलिसांनी तिची कसून चौकशी केल्यानंतर तिने खरी हकिगत सांगितली.

त्रासामुळे काढला काटा

वंदना पवार हिला तिचा पती बाळू पवार हा रोज दारू पिऊन शिवीगाळ करून मारहाण करायचा. त्याच्या त्रासाला ती खूपच कंटाळली होती. या दरम्यान तिचा चुलत दिर गजानन राजेंद्र पवार (रा. न्यायडोंगरी, ता. नांदगांव, जि. नाशिक) याच्याशी तिचे दोन वर्षांपासून प्रेमसंबंध जुळले होते. आपल्या प्रेमसंबधाची माहिती पती बाळू पवार याला समजल्यावर तो अडथळा निर्माण करेल म्हणून वंदना पवार हिने दिर गजानन पवार याच्यासोबत पती बाळू पवारला जिवे ठार मारण्याचा चार- पाच महिन्यांपासून कट रचला होता.

त्यानुसार मंगळवारी (ता. १८) वंदना पवार व तिचा पती चाळीसगाव येथे येणार असल्याचे तिने दीर गजानन पवार याला अगोदरच सांगितले होते. ठरल्याप्रमाणे वंदना व गजानन यांनी गजाननच्या मोटारसायकलने मयत बाळू पवार याला हॉटेलमध्ये नेऊन जास्त प्रमाणात दारू पाजली. अंधार झाल्यावर वंदना हिने ‘मला माहेरी कन्नडला जायचे आहे’ असे सांगून दिर गजानन पवार याच्या मोटारसायकलवर मयत बाळू पवारला बसवून कोदगाव रस्त्याकडे नेले. दोघांनी बाळू पवारच्या पोटावर ब्लेडने वार करून, दोन वेळा डोक्यात मोठा दगड टाकून त्याला जिवे ठार मारले.

अपघाताचा बनाव

खुनाच्या या घटनेचा कोणी संशय घेऊ नये म्हणून तसेच हा अपघात वाटावा या उद्देशाने दोघांनी बाळू पवारचा मृतदेह ओढत नेऊन महामार्गावर टाकून दिला. त्याचा ओळख पटावी म्हणून त्याचे आधारकार्ड त्याच्या शर्टाच्या खिशात टाकले व दोघे तेथून पसार झाले. पोलिसांनी मात्र, संशयित वंदना पवार व गजानन पवार यांना पळून जाण्याची संधी न देता, दोघांना मोठ्या शिताफीने अटक केली.

ही कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अपर अधीक्षक कविता नेरकर (पवार), सहायक पोलिस अधीक्षक अभयसिंह देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलिस निरिक्षक संदीप पाटील, सहाय्यक पोलिस निरीक्षक सागर ढिकले, उप निरीक्षक सुहास आव्हाड, संदीप घुगे, सुभाष पाटील यांच्यासह कर्मचारी राहुल सोनवणे, योगेश बेलदार, विनोद भोई, पंढरीनाथ पवार, प्रवीण जाधव, अजय पाटील, महेंद्र पाटील, भूषण पाटील, दीपक पाटील, रवींद्र पाटील, तुकाराम चव्हाण.

प्रकाश पाटील, शरद पाटील, नंदकुमार महाजन, विजय पाटील, नीलेश पाटील, अमोल भोसले, विनोद खैरनार, आशुतोष सोनवणे, रवींद्र बच्छे, राकेश महाजन, गोपाल पाटील, अमोल पाटील, समाधान पाटील, पवन पाटील, मनोज चव्हाण, ज्ञानेश्वर पाटोळे तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे सुधाकर अंभोरे, लक्ष्मण पाटील, राहुल पाटील, ईश्वर पाटील, महेश सोमवंशी तसेच सायबर विभागाचे गौरव पाटील, मिलिंद जाधव तसेच फॉरेन्सिक टीमचे हरीश परदेशी, शिवराज नाईक, प्रमोद ठाकूर यांनी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi Press Conference: 'एक है तो सेफ है' राहुल गांधींनी उघडली तिजोरी अन् निघाला अदानी-मोदींचा फोटो, Video Viral

Latest Maharashtra News Updates : नाशिकमधील रेडीसन ब्लू हॉटेलवर निवडणूक आयोगाची कारवाई

ऋषभ पंतसारखाच आणखी एका क्रिकेटपटूचा भीषण अपघात; गाडीचा झालाय चुराडा...

भावासाठी उदयनराजे मैदानात! 'झुकेगा नही साला' म्हणत, कॉलर उडवत शिवेंद्रराजेंना मताधिक्‍याने विजयी करण्याचं केलं आवाहन

Nawab Malik : मतदानाच्या एक दिवस आधीच नवाब मलिक यांचे 'एक्स' अकाऊंट हॅक

SCROLL FOR NEXT