अडावद (ता. चोपडा) : येथील लोखंडेनगरमधील ३५ वर्षीय तरुणाचा दगडाने ठेचून निर्घृण खून केल्याची घटना मंगळवारी (ता. १) उघडकीस आली. येथील पोलिस ठाण्याच्या हद्दीत महिनाभरात झालेल्या खुनाच्या तिसऱ्या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. या प्रकरणी काही संशयितांना चौकशीसाठी पोलिसांनी ताब्यात घेतले असून, रात्री उशिरापर्यंत पोलिसांत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. (Youth killed by stone adavad)
येथील भगवाननगरमधील मोकळ्या जागेवर तरुणाचा खून झाल्याची वार्ता सकाळी गावात वाऱ्यासारखी पसरली. ही माहिती पोलिसांना कळताच सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रमोद वाघ, उपनिरीक्षक राजू थोरात यांनी सहकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या तरुणाची ओळख पटत नसल्याने पोलिसांनी तपास सुरू केला.
काही वेळात मृत लोखंडेनगरातील बापू हरी महाजन (वय ३५) असल्याचे निष्पन्न झाले. त्याच्या डोक्यावर, तसेच तोंडावर गंभीर जखमेच्या खुणा होत्या. त्याचा चेहरा ओळखू येऊ नये म्हणून मारेकऱ्यांनी लाकडी दांड्यासह दगडांनी ठेचून खून केल्याचे प्रथमदर्शनी पोलिसांना दिसून आले. विच्छेदनासाठी चोपडा उपजिल्हा रुग्णालयात मृतदेह पाठविण्यात आला. मृत बापू महाजनच्या मागे आई आणि भाऊ आहे. (latest marathi news)
श्वानपथक पाचारण
खुनाचा तपास करण्यासाठी प्रमोद वाघ यांनी जळगाव येथील श्वानपथकाला पाचारण केले. पोलिस कर्मचारी विनोद चव्हाण व प्रशांत कंखरे ‘चॅम्प’ नामक श्वानासह घटनास्थळी दाखल झाले असता, श्वानाने मारेकऱ्यांचा माग दाखविला. त्यादृष्टीने पोलिसांनी तपास सुरू केला आहे. स्थानिक पोलिस कर्मचारी भरत नाईक, संजय धनगर, सतीश भोई, विनोद धनगर, भूषण चव्हाण, किरण शिरसाठ, जयदीप राजपूत उपस्थित होते.
संशयित ताब्यात
तपासासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक गणेश वाघमारे, ठसेतज्ज्ञ किरण चौधरी, रफीक शेख आले होते. अपर पोलिस अधीक्षक डॉ. कविता नेरकर, चोपड्याचे उपअधीक्षक अण्णासाहेब घोलप यांनीही घटनास्थळी धाव घेऊन तपासाच्या दृष्टीने मार्गदर्शन केले. पोलिसांनी काही संशयितांना ताब्यात घेतले होते. सहाय्यक निरीक्षक प्रमोद वाघ तपास करीत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.