Crop Lone esakal
जळगाव

Jalgaon Crop Lone : सिमावर्ती शेतकऱ्यांच्या पीक कर्जाचा बँकेकडून निर्णय होईना

Crop Lone : राज्यभर सगळीकडे खरीपाची तयारी सुरु झाली आहे. जळगाव जिल्ह्याही याला अपवाद नाही.

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Crop Lone : राज्यभर सगळीकडे खरीपाची तयारी सुरु झाली आहे. जळगाव जिल्ह्याही याला अपवाद नाही. जून महिना उजाडला असल्याने शेतकरी मशागतीत व्यस्त असला तरी मार्चअखेर पीक कर्ज भरूनही इतर जिल्ह्यात जमीन असलेल्या मिळकत धारकांना अजूनही जिल्हा बँकेचे पीक कर्ज मिळाले नाही. बदललेल्या निर्णयामुळे त्यांना दोन महिने उलटूनही पिककर्जाची प्रतिक्षाच करावी लागत आहे. (Crop loan of border farmers will not be decided by bank)

जळगाव जिल्हा मध्यवर्ती बँकेमार्फत आतापर्यंत जिल्ह्यात राहणाऱ्या परंतु पर जिल्ह्यात जमिनी असलेल्या शेतकऱ्यांना पीक कर्ज दिले जात असे. शक्यतोवर जिल्हाबदल हा नद्यांच्या दोन्ही तीरावरून झाल्याचे दिसून येते. त्यामुळे जिल्हा सीमेवरील गावात राहणाऱ्या शेतकऱ्यांच्या बऱ्याच जमिनी नदीपलीकडे (पैलाड) असतात. त्यामुळे सातबाऱ्यावर त्यांचा तालुका व जिल्हा बदलतो. अशा जमिनींवरील बोझा नोंद झाल्यानंतर पीक कर्ज मिळत असे.

मात्र यावर्षी ते नियमात बदल करण्यात आल्याने अजूनही मिळालेले नाही. सुरवातीला त्यासाठी तालुका सहाय्यक निबंधकांमार्फत जिल्हा निबंधकांची परवानगी मागविण्यात आली. अनेक शेतकऱ्यांनी ती मेहनत घेऊन आणली. मात्र आता बँकेने विभागीय निबंधकांकडे मागितलेल्या मार्गदर्शनानुसार हे कर्ज जिल्ह्याबाहेर होत असल्याने व जिल्हा बदल झाल्याने पीक विमा कंपनी बदलल्याने पंचनामे होण्यास व कर्ज थकल्यास १०१ ची प्रकरणे व सक्त वसुलीस अडचणी येतात.(latest marathi news)

शिवाय अतिवृष्टी,बोंडअळी अनुदान सारखे अनुदान देताना जिल्हा बदल ची अडचण निर्माण होते.अशा अनेक बाबींमुळे असे कर्ज देण्यास कायदेशीर अडचणी निर्माण होत असल्याच्या कारणास्तव हे कर्जवाटप होण्यास अडचण निर्माण झाली आहे.

पाचशे खातेधारक प्रतिक्षेत

जळगाव जिल्हा बँकेचा विचार करता धुळे,औरंगाबाद (संभाजीनगर)व बुलडाणा जिल्हा लगत अशा जमिनी असून सुमारे पाचशे शेतकरी अशा कर्जापासून अजूनही वंचित आहेत.चोपडा तालुक्यातील गणपूर (४१), घोडगाव(७२), वेळोदे(११), अजंटीसीम, मोहिदे, कूसुम्बे, अनवर्दे, आदी गावातील शेतकरीही अजून पीककर्ज मिळण्याच्या प्रतीक्षेत आहेत.दरम्यान जिल्हा बँकेच्या संबंधित संचालकांनी हा मुद्दा लावून धरल्याने त्यावर मधलामार्ग निघण्याची आशा संबंधित शेतकऱ्यांना आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nana Patole : अखेर नाना पटोले देणार राजीनामा? विधानसभा निवडणुकीतील दारुण पराभवाची स्विकारली जबाबदारी

Aadhaar Update : अलर्ट! आधार कार्ड अपडेटच्या नियमात मोठा बदल; हे कागदपत्र नसेल तर बदलता येणार नाही माहिती

Kamthi Assembly Election 2024 : कामठीमधील १७ उमेदवारांचे ‘डिपॉझिट’ जप्त...निवडणूक आयोगाने ठरवून दिलेली मते घेण्यात ठरले अपयशी

Ajit Pawar: मुख्यमंत्रीपदाच्या फॉर्म्युल्याबाबत अजित पवारांचं महत्वाचं भाष्य; म्हणाले, आम्ही तिघं...

Stock Market: महाराष्ट्रात भाजपच्या विजयानंतर अदानी शेअर्समध्ये तुफान वाढ; सेन्सेक्स-निफ्टीही तेजीत

SCROLL FOR NEXT