Pandharpur reached by cyclists on bicycles. esakal
जळगाव

Ashadhi Ekadashi 2024 : सायकलपटूंनी सायकलवर गाठली पंढरी! भुसावळ स्पोर्ट्स ॲन्ड रनर्स असोसिएशनचा उपक्रम

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : आषाढ महिना म्हटला, की महाराष्ट्राचे आराध्यदैवत असलेले ‘विठोबा माऊली व माय रखूमाई’ यांच्या दर्शनाची आस संपूर्ण महाराष्ट्राला लागते. काही वारकरी, टाळकरी व भाविक एक ते दीड महिन्यापासून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून पायी दिंडी काढून विठ्ठलाच्या दर्शनासाठी आषाढी एकादशीच्या दिवशी पंढरपुरात दाखल होतात. (Cyclists reached Pandhari)

यंदा भुसावळ स्पोर्ट्स ॲन्ड रनर्स असोसिएशनच्या सायकलपटूंनी आगळीवेगळी भक्तीची वाट ण भुसावळ शहर व जिल्ह्यासाठी दाखवून दिली. औचित्य होते पंढरपुरात विठ्ठल रखूमाईचे दर्शन घेणे. सायकलपटूंनी सायकलीने पंढरपूरची वारी करायचे ठरविले. भुसावळहून तब्बल ४७० किलोमीटरचे अंतर सायकल चालवून त्यांनी पंढरपूर गाठले.

यासाठी सतत दोन दिवस ऊन, वारा, पाऊस याची कसलीही तमा न बाळगता ११ सायकलवीरांनी भुसावळहून निघाल्यानंतर जामनेर, पहूरमार्गे बीड, तेथून सोलापूरमार्गे पंढरपूर गाठले. रस्त्यात ठिकठिकाणी नागरिकांनी सायकलवारीचे विशेष कौतुक केले. त्यांच्या ठायी असलेला भक्तिभाव बघून त्यांचे स्वागत केले.

पंढरपूरात दाखल झाल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रातून आलेल्या इतर सायकलपटूंसोबत गोल रिंगण करून जणू हा सायकलवीरांचा महामेळावा आहे, असे चित्र त्याठिकाणी निर्माण झाले. सायकल वारीत भुसावळ स्पोर्ट्स ॲन्ड रनर्स असोसिएशनचे प्रमुख प्रवीण फालक यांच्या नेतृत्वात विद्याधर इंगळे, मधुकर इंगळे, गजानन पाटील, मनोज चौधरी, तुषार पोतरवार, युवराज सूर्यवंशी, भाऊसाहेब पाटील, रविकांत पवार. (latest marathi news)

जगदीश रेहपाडे, सोमनाथ जाधव यांनी यशस्वीपणे सहभाग नोंदविला. लांब पल्ल्याच्या अंतरात कुठे थांबायचे? कुठे नाश्ता, चहा व जेवणाची व्यवस्था करायची आदी सगळ्या गोष्टींचा समावेश होता. पंढरपुरात दाखल झाल्यानंतर निवासाची व्यवस्था कुठे असेल व दर्शनाची व्यवस्था कशी असेल, याचीही जबाबदारी त्यांनी पार पाडली.

भुसावळ येथून विठ्ठल मंदिर वॉर्डातील विठ्ठल मंदिरापासून सुरू झालेल्या सायकल वारीला विठ्ठल मंदिर व्यवस्थापन समितीचे प्रमुख गणेश बऱ्हाटे यांनी हिरवी झेंडा दाखविला. सायकलपटूंचा उत्साह वाढविण्यासाठी गणसिंग पाटील, विजय फिरके, डॉ. जगदीश अत्तरदे, तेजस चौधरी, राजेंद्र ठाकूर, प्रमोद शुक्ला, जितेंद्र चौधरी, स्वाती फालक, अर्चना भगत, प्रवीण पाटील आदी सदस्य उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'हा जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार', IND vs BAN सामन्याविरोधात हिंदू संघटना आक्रमक, मालिका रद्द होणार?

Aaditya Thackeray : महायुती गद्दारांचा चेहरा घेऊन विधानसभा लढणार का?

Raj Thackeray: डॉ. अजित रानडेंना कुलगुरु पदावरुन हटवल्यानंतर राज ठाकरेंची पोस्ट; राज्यासह केंद्र सरकारला सुनावले खडेबोल

Sanjay Gaikwad: संजय गायकवाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल; वडेट्टीवारांचा जोरदार हल्ला

दोन टप्प्यात निवडणुका कुठे होणार? सुरत आणि गुवाहाटीला का? शिंदेंच्या वक्तव्यावर आदित्य ठाकरेंची खोचक टीका

SCROLL FOR NEXT