Minister Dada Bhuse guiding Shiv Sena functionaries' gathering. Neighbor MLA Kishore Patil. esakal
जळगाव

Dada Bhuse : पाचोरा मतदारसंघातील सर्व शेतरस्ते पूर्ण करणार : दादा भुसे

Jalgaon News : पाचोरा-भडगाव मतदारसंघातील एकही शेत रस्त्यावाचून राहणार नाही. शेतकरीराजाला शेतातून घरी व बाजारपेठेत शेतमाल व साहित्याची ने-आण करण्यासाठी शेतरस्ते महत्त्वाचे आहेत.

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : पाचोरा-भडगाव मतदारसंघातील एकही शेत रस्त्यावाचून राहणार नाही. शेतकरीराजाला शेतातून घरी व बाजारपेठेत शेतमाल व साहित्याची ने-आण करण्यासाठी शेतरस्ते महत्त्वाचे आहेत. राहिलेल्या शेतरस्त्यांची त्वरित माहिती द्यावी. सर्व शेतरस्ते प्राधान्याने पूर्ण केले जातील, अशी ग्वाही मंत्री दादा भुसे यांनी दिली. (Dada Bhuse statement To complete all farm roads in Pachora Constituency)

पाचोरा येथे शिवसेनेच्या बूथप्रमुख व प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ‘शिवालय’ या आमदार किशोर पाटील यांच्या संपर्क कार्यालयात रविवारी (ता. २८) हा मेळावा झाला. प्रमुख मार्गदर्शक म्हणून मंत्री तथा विधानसभा निवडणूक निरीक्षक दादा भुसे उपस्थित होते.

जिल्हाप्रमुख रावसाहेब पाटील, भडगावचे संजय पाटील, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य पदमसिंग पाटील, तालुकाप्रमुख सुनील पाटील, उपजिल्हाप्रमुख किशोर बारवकर, बाजार समितीचे सभापती गणेश पाटील, शहरप्रमुख सुमित सावंत, माजी नगराध्यक्ष सुनीता पाटील, युवानेते सुमित पाटील आदी उपस्थित होते.

मंत्री दादा भुसे यांनी आमदार किशोर पाटील यांनी केलेल्या विकासकामांचे कौतुक केले. लाडकी बहीण योजनेचा विरोधकांकडून अपप्रचार केला जात असून, पंधराशेऐवजी दहा हजार रुपये द्या, अशी मागणी करीत असल्याची टीका त्यानी केली. युती सरकारने केलेली कामे प्रत्येक घर व व्यक्तीपर्यंत पोचवा. विधानसभेवर भगवा फडकविण्यासाठी कामाला लागा, असे आवाहन त्यांनी केले. पदाधिकाऱ्यांनी विचारलेल्या शंकांचे मंत्री भुसे यांनी निरसन केले. रावसाहेब पाटील यांनी आभार मानले. (latest marathi news)

इतरांना धक्का न लावता आरक्षण

‘मराठवाड्यात कुणबी नोंदणी असलेल्यांना ओबीसी आरक्षण देण्यासाठी समिती गठीत केली आहे. मराठा आरक्षणासंदर्भात मुख्यमंत्री शिंदे यांनी अहवाल तयार केला असून, कोणालाही धक्का न लावता आरक्षण देण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

मनोज जरांगेंच्या सरसकट आरक्षणावर निर्णय घेण्यासाठी झालेल्या बैठकीस आघाडीचा एकही नेता उपस्थित राहिला नाही, असेही ते म्हणाले. मेळाव्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना युतीच्या जागावाटपासंदर्भात वरिष्ठ नेते याबाबत निर्णय घेतील. अजून कोणतीही चर्चा झालेली नाही, असे सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT