Dadar Nandurbar Express
Dadar Nandurbar Express  esakal
जळगाव

Jalgaon News : दादर-नंदुरबार एक्सप्रेस धावणार आता भुसावळपर्यंत! खासदार स्मिता वाघ यांच्या प्रयत्नांना यश

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : रेल्वे विभागामार्फत नव्याने सुरू करण्यात आलेली ०९०४९/५० दादर- नंदुरबार एक्सप्रेस आता भुसावळपर्यंत धावणार आहे. ही गाडी भुसावळपासून करावी, यासाठी खासदार स्मिता वाघ यांनी रेल्वे प्रशासनाकडे लेखी मागणी केली होती. त्या मागणीला यश मिळाले आहे. (Dadar Nandurbar Express will now run till Bhusawal)

ही रेल्वे गाडी नंदुरबारपर्यंत असल्यामुळे जळगाव व धुळे जिल्ह्यातील प्रवाशांची मोठी गैरसोय होत होती. त्यामुळे ही रेल्वेगाडी भुसावळपर्यंत करण्यात यावी, अशी मागणी जळगाव, धरणगाव, अमळनेर येथील रेल्वे प्रवासी संघटना, स्थानक सल्लागार समितीने स्मिता वाघ यांच्याकडे केली होती. या मागणीच्या अनुषंगाने स्मिता वाघ यांनी रेल्वे प्रशासनाकडे पाठपुरावा केला होता.

दरम्यान, खानदेशला मुंबईशी जोडणाऱ्या यापूर्वी दोन रेल्वे गाड्या सुरू करण्यात आल्या होत्या. मात्र, शुक्रवारी कुठलीही रेल्वे गाडी नसल्यामुळे प्रवाशांचे हाल होत होते. ही रेल्वे गाडी उपलब्ध होणार असल्यामुळे प्रवाशांची मोठी सोय होणार आहे. १७ जुलैपासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे. ही गाडी आता भुसावळपर्यंत धावणार असल्यामुळे झेडआर युसीसी सदस्य प्रतीक जैन व प्रवासी संघटनांनी खासदार श्रीमती वाघ यांचे आभार व्यक्त केले आहेत. (latest marathi news)

"दादर- नंदुरबार एक्स्प्रेस भुसावळपर्यंत वाढविल्यामुळे खानदेशातील, विशेषत: जळगाव जिल्ह्यातील प्रवाशांची चांगली सोय होणार आहे, याचे समाधान आहे."

- स्मिता वाघ, खासदार, जळगाव

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rane VS Thackeray : मोदी शाहांच्या दलालांनी रस्ता अडवला, जोडेमारो आंदोलन करणार; उद्धव ठाकरे यांची आक्रमक भूमिका

Rane Vs Thackeray: "मला ओढत तुडवत नेले," ठाकरे गटाच्या महिलेने सांगितले कशी सुरू झाली मारहाण, व्हिडिओ व्हायरल

तिने माझ्या आई- वडिलांना... एक्स गर्लफ्रेंड नताशासोबत का झालेलं अली गोनीचं ब्रेकअप? आता सांगितलं खरं कारण

Rule Change: गुगलपासून ते UPI पर्यंत... 1 सप्टेंबरपासून बदलणार अनेक नियम; सर्वसामान्यांवर होणार थेट परिणाम

Latest Maharashtra News Updates LIVE : आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावीत पेसा आंदोलकांच्या भेटीला

SCROLL FOR NEXT