Jalgaon News : हिरव्यागार झाडाझुडपांनी बहरलेल्या डोंगररांगा हेच खानदेशाचे वैभव आहे. हे वैभव टिकविण्याची जबाबदारी सर्वांचीच असून, यामध्ये अधिक महत्त्वाची जबाबदारी वन विभागाची आहे. मात्र वन विभागाच्या नाकर्तेपणामुळे डोंगररांगांना दरवर्षी वणवे लागून वन्यप्राण्यांसह वृक्षसंपदेची अपरिमित हानी होत आहे. गेल्या काही वर्षांपासून सातपुडा पर्वतावर कुठे ना कुठे वणवा लागत आहे. यामुळे डोंगरावर आगीचे लोळ उठताना दुरूनच दिसून येतात. (Jalgaon Damage to trees due to fire incidents in Satpura Neglect of Forest Department)
या भीषण आगीत गवताची राख झाली, वनऔषधी करपल्या, वन्यप्राण्यांची निवासस्थाने नष्ट होऊन चिमुकल्या प्राण्यांची पिल्ले होरपळून गेली. वन विभागाच्या दुर्लक्षामुळे दरवर्षी वारंवार वणवे लागण्याच्या घटना घडत आहेत.
जंगलात डिंक गोळा करण्यासाठी गेलेल्या व शिकाऱ्यांकडून बिडी, सिगारेटमुळे किंवा परस्परविरोधातून या आगी लावल्या जात असल्याचे वन विभागाकडून सांगून सारवासारव करण्यात येत असते. दरवर्षी वन विभागाच्या यावल व चोपडा परिक्षेत्रामध्ये वणवे लागत आहेत.(latest marathi news)
वणवे रोखण्यासाठी वन विभागाकडून उपाययोजना गरजेची असली तरी कोणतीही ठोस भूमिका घेतली जात नसल्याने सातपुडा पर्वत वणव्यापासून सुरक्षित राहिला नसल्याचे निसर्गप्रेमींकडून बोलले जात आहे.
वन विभागामध्ये वनालगतच्या गावांमध्ये वन व्यवस्थापन समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. तरीही वणवे लागून अपरिमित हानी टाळण्यास वन विभागाला अपयश येत आहे. काळाची गरज म्हणून डोंगररांगांना लागणारे वणवे थांबवण्यासाठी वन विभागाने यापुढे काही तरी वेगळा उपक्रम हाती घेणे गरजेचे आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.