Crop Insurance  esakal
जळगाव

Jalgaon Crop Insurance : एक रुपयात पीकविम्यासाठी 15 जुलैपर्यंत मुदत; कृषी विभागाचे नोंदणीचे आवाहन

Crop Insurance : अमळनेर तालुक्यातील शेतकऱ्यांनी लवकरात लवकर पीकविमा काढून घ्यावा, असे आवाहन अमळनेर कृषी विभागाने केले आहे.

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Crop Insurance : अमळनेर तालुक्यातील शेतकऱ्यांनी लवकरात लवकर पीकविमा काढून घ्यावा, असे आवाहन अमळनेर कृषी विभागाने केले आहे. सध्या शेतकऱ्यांनी खरीप पिकाची लागवड केली असून, खरीप पिकाला संरक्षण मिळावे, यासाठी शासनाने पीकविमा योजना सुरू केलेली आहे. हा पीकविमा भरल्यानंतर शेतकऱ्यांना पिकाचे नुकसान झाल्यास संरक्षित असणारी रक्कम मिळणार असून, या वर्षीपासून एका पिकाला केवळ एक रुपया पीकविमा भरण्यासाठी लागणार आहे. (Deadline till July 15 for crop insurance at one rupees )

पीकविमा भरण्याची शेवटची मुदत १५ जुलै असून, जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी आपल्या पिकाला संरक्षित करणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांना एक रुपया भरल्यानंतर उर्वरित रक्कम शासन भरणार आहे. अमळनेर तालुक्यात सुमारे ६८ हजार हेक्टर क्षेत्र लागवड योग्य आहे. दरवर्षी शेतकऱ्याच्या पाठीशी एकापाठोपाठ एक संकटाची मालिका सुरू असून, कधी अतिवृष्टी तर कधी दुष्काळ यात शेतकरी भरडला जाऊ लागला आहे.

परंतु या वर्षीपासून शासनाने शेतकऱ्यांना पीकविमा भरण्यासाठी जास्त पैशाची तजवीज न करता एका पिकासाठी केवळ एक रुपया शेतकऱ्यांनी भरावा, उर्वरित रक्कम शासन भरणार असल्याने या योजनेचा शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे. पिकाचे नुकसान झाल्यानंतर विमा रक्कम ही शेतकऱ्यांना थेट बँक खात्यात मिळणार आहे.

एका पिकासाठी केवळ एकच रुपया लागत असल्याने जास्तीत जास्त शेतकरी पीकविमा उतरविण्यासाठी पुढाकार घेत आहे. पीकविमा उतरण्यासाठी १५ जुलै शेवटची तारीख असून, जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी पीकविमा उतरवावा, असे आवाहन कृषी विभागाचे तालुका कृषी अधिकारी चंद्रकांत ठाकरे, मंडळ अधिकारी अमोल कोठावदे, कृषी सहाय्यक निशा सोनवणे यांनी केले आहे.

''शेतकऱ्यांनी शेवटच्या १५ जुलैच्या दिवसाची वाट न पाहता लवकरात लवकर पीक विमा उतरवून घ्यावा, तसेच पीकविमा व शासकीय नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई-पीक पाहणी मोबाईलद्वारे करणे आवश्यक आहे. पीकविम्यासाठी पासबुक झेरॉक्स, आधार कार्ड झेरॉक्स, सातबारा, आठ अ आणि पीकपेरा पीकविमा भरण्यासाठी अनिवार्य आहे. आजच आपला नजीकच्या महा ई सेवा केंद्र, सेतू सुविधा केंद्र, येथे जाऊन आपला पिक विमा काढून घ्यावा.''- निशा सोनवणे, कृषी सहायक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar NCP Second List: अजित पवार गटाची दुसरी यादी जाहीर! सात नव्या उमेदवारांची घोषणा, वडगाव शेरीचंही ठरलं

शाहरुखच्या 'चक दे इंडिया'च्या बदललेल्या कथेवर अन्नू कपूर संतापले; म्हणाले- मुस्लिम चांगला दाखवून पंडितांची थट्टा...

Share Market Opening: शेअर बाजारात घसरण सुरुच; निफ्टी 24,400च्या खाली, कोणते शेअर्स कोसळले?

Share Market Today: आज कोणते शेअर्स असतील तेजीत? जागतिक बाजारात काय आहेत संकेत?

Ajit Pawar NCP: अजित पवार यांचा धडाका! काँग्रेससह भाजपलाही दिला धक्का; दोन माजी खासदारांसह आमदार राष्ट्रवादीत

SCROLL FOR NEXT