Nagar Panchayat Office. esakal
जळगाव

Jalgaon News : बोदवडला पोटनिवडणुकीआधीच फैसला शक्य? पडद्यामागून हालचालींना वेग

Jalgaon : नगरपंचायत प्रभाग क्रमांक चारच्या राष्ट्रवादीच्या नगरसेविका सईदाबी बागवान या मृत झाल्याने त्या जागी पोटनिवडणूक जाहीर झाली आहे.

अमोल अमोदकर

Jalgaon News : नगरपंचायत प्रभाग क्रमांक चारच्या राष्ट्रवादीच्या नगरसेविका सईदाबी बागवान या मृत झाल्याने त्या जागी पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. ही निवडणूक ११ ऑगस्टला होणार आहे. परंतु त्या आधी ३१ जुलैला या जागेचा फैसला होऊ शकतो? यामध्ये निवडणुकीसाठी सय्यद रुबीना सय्यद हरून, बागवान रुकसार शेख कलिम या दोघांनी अपक्ष अर्ज भरला आहे तर शहनाज इमाम खान व शेख सादिया असलम या दोघांनीही शिवसेनेकडून (शिंदे गट) अर्ज दाखल आहे. (decision is possible before Bodwad by election )

तसेच याच उमेदवारांपैकी शेख सादिया असलम यांच्याकडून अपक्ष अर्ज भरण्यात आला आहे. मागील निवडणुकीत या उमेदवारांनी याच प्रभागात लढत दिली असल्याने त्यांची या प्रभागावर आजही पकड कायम असल्याने यामुळे मोठ्या घडामोडी घडू शकतात. रिक्त जागेसाठी राष्ट्रवादीकडून नगरसेविका या निवडून आल्या होत्या. परंतु या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीकडून कुठल्याही उमेदवारास एबी फॉर्म दिला नसल्याने अनेकांचे भुवया उंचावल्या आहेत. यात काही गौडबंगाल आहे काय? अशी चर्चा आता बोदवड शहरात रंगू लागली आहे.

या निवडणुकीत राष्ट्रवादीतर्फे एबी फॉर्म न दिला जाणे म्हणजे सरळसरळ शिवसेनेला हा उमेदवार हे शरण गेला आहे की काय? याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच ऐनवेळी कोणत्या उमेदवाराचा अर्ज शिवसेनेकडून कायम ठेवला जातो व कोणत्या उमेदवाराचा अर्ज मागे घेतला जातो, तसेच ही निवडणूक बिनविरोध होऊन शिवसेनेच्या पारड्यात ही जागा जाते का? याबाबतचा मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. परंतु यामध्ये अपक्षांनी अर्ज भरला असल्याने ऐनवेळी काट्याची लढतही होऊ शकते. (latest marathi news)

..असेही असू शकतात डावपेच?

अडीच वर्षानंतर बोदवड नगरपंचायतीचे पन्नास टक्के महिला आरक्षण असल्याने महिला आरक्षण सर्वसाधारण किंवा अनुसूचित जाती जमाती किंवा आरक्षित महिला उमेदवार नगराध्यक्ष होऊ शकतो. राष्ट्रवादी काँग्रेसचे आतापर्यंत सात नगरसेवक असून, त्यातील उमेदवार सईदाबी बागवान या राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या होत्या. त्या मृत झाल्याने ऐकून संख्या सहावर आली आहे.

राष्ट्रवादीने पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचा एबी फॉर्म न लावणे हे कुठे न कुठे संगनमताचे राजकारण असल्याचे लक्षात येते. विशेष सभेत सत्ताधारी असलेले दोन नगरसेवक गैरहजर असणे म्हणजे नवीन उमेदवाराचे पाऊल राष्ट्रवादीत किंवा शिवसेना शिंदे गटात नगराध्यक्ष स्वरूपात राहू शकतो, अशीही शक्यता वर्तविण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT