Couple worshiping the Gudi erected in front of the house  esakal
जळगाव

Jalgaon News: सराफ बाजारात सोने विक्रीत घट, दरवाढीचा परिणाम! गुढीपाडव्याला वाहन, घरे, वस्तूंच्या विक्रीत कोट्यवधींची उलाढाल

Jalgaon News : हिंदू नववर्षाच्या अर्थात गुढीपाडव्याच्या एकमेकांना शुभेच्छा देत, गुढी उभारून सर्व मांगल्य होऊ दे, अशी प्रार्थना मंगळवारी (ता. ९) करण्यात आली

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : हिंदू नववर्षाच्या अर्थात गुढीपाडव्याच्या एकमेकांना शुभेच्छा देत, गुढी उभारून सर्व मांगल्य होऊ दे, अशी प्रार्थना मंगळवारी (ता. ९) करण्यात आली. हिंदू बांधवांनी सकाळीच गुढी उभारून तिचे सहकुटुंब पूजन केले. दुपारी गोडधोड नैवेद्य दाखविला. (Jalgaon Decrease in gold sales in jewels market news)

साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेला गुढीपाडवा मुहूर्त साधत अनेकांनी नवीन वाहने घरी आणली. काहींनी नवीन घरात प्रवेश केला. इलेक्ट्रानिक वस्तू, मोबाईलची मोठी विक्री झाली. सोने खरेदीत मात्र ५० टक्के घट झाली. एकंदरित कोट्यवधींची उलाढाल बाजारपेठेत झाली.

चारशे जणांनी नवीन घरात प्रवेश केला. सकाळपासूनच नवीन घरात पूजा झाली. नातेवाइकांची गर्दी नवीन घरात दिसून आली. सरासरी १५ लाख एका घराची किंमत होती. सुमारे ६० कोटींची उलाढाल बांधकाम क्षेत्रात झाल्याचा अंदाज बांधकाम व्यावसायिकांनी वर्तविला.

दुपारी चारपर्यंत ६० ते ७० चारचाकीतून व सहाशे दुचाकी विक्रीतून साडेसहा ते सात लाखांची उलाढाल झाली, अशी माहिती दुचाकी, चारचाकी विक्रेत्यांनी दिली. नवीन वाहनाचे आरक्षण काही दिवसांपूर्वीच नागरिकांनी केले होते. ग्राहकांनी अगोदरच येऊन वाहनांचा रंग, मॉडेल, त्यातील सुविधांची पाहणी केली होती. मंगळवारी त्यांनी वाहने घरी नेली.

इलेक्ट्रानिक वस्तूंना मागणी

गुढीपाडव्याच्या मुहूर्त साधत कुलर, फ्रीज, पंखे, मिक्सर, वाशिंग मशिन, फ्रीज, आटा चक्की, फर्निचर, तयार सोफासेट, किचन सेट, एलइडी टीव्ही आदी वस्तूंची विक्री मोठ्या प्रमाणात झाली.  (latest marathi news)

श्रीखंडाला मागणी

नववर्षाला गोडधोड केले जाते. यामुळे श्रीखंड, बासुंदी, खवा, आम्रखंड, चक्का, रबडी, पेढे या गोड पदार्थांना मोठी मागणी होती. श्रीखंड ३२० रुपये किलो, तर इतर पदार्थ साडेतीनशे ते पाचशे रुपये किलोने उपलब्ध होते.

गतवर्षीच्या तुलनेत सोने १४ हजारांनी जादा

गुढीपाडव्याला नवीन हिंदू वर्षाची सुरवात होते ते सोने खरेदीने. यंदा सोन्याचे दर वाढल्याचा परिणाम खरेदीवर दिसून आला. २०२३ ला गुढीपाडव्याला सोन्याचे दर ६९ हजार ८०० रुपये होते. यंदा सोन्याचा दर ७३ हजार ५४२ रुपयांवर होता. तब्बल १४ हजारांची सोने यंदा प्रतितोळे महाग होते. यामुळे सोन्याच्या खरेदीत सुमारे ५० टक्क घट झाल्याचे चित्र पाहावयास मिळाले.

गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सोने खरेदी झाली. दोन तोळ्यांऐवजी एक तोळे घेतले गेले. चांदी २०२३ मध्ये गुडीपाडव्याला ६८ हजार ८०० होती. यंदा ८२ हजारांवर प्रतिकिलो होती. १३ हजार दोनशे रुपयांनी चांदीचे दर जास्त होते. मागील वर्षाच्या तुलनेत सोन्याचे दर यंदा अधिक असल्याने ग्राहकांनी सोन्याची खरेदी केली. मात्र, त्याचे प्रमाण कमी होते. मागील वर्षाच्या तुलनेत निम्मे प्रमाण होते, अशी माहिती नवलखा ज्वेलर्सचे संचालक आदित्य नवलखा यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar: “आजही तो कुटुंबासाठी काही बोलत नाही….”; सांगता सभेत अजित पवारांच्या आईचं पत्र दाखवलं वाचून

Sports Bulletin 18th November: गौतम गंभीरला हाय कोर्टाकडून दिलासा ते चेतेश्वर पुजारावर बॉर्डर-गावस्कर मालिकेत नवी जबाबदारी

Ajit Pawar: “....परत म्हणू नका दादा तुम्ही बोललाच नाहीत”; अजित पवारांचं सांगता सभेत भावनिक आवाहन

Champions Trophy पाकिस्तानमध्येच होणार, मागे हटणार नाही! PCB प्रमुखांचं रोखठोक मत; पाहा Video

Latest Maharashtra News Updates : सलमान खानच्या घरावर गोळीबार करणाऱ्या अनमोल बिश्नोईला अमेरिकेत अटक

SCROLL FOR NEXT