When buying cayenne pepper. esakal
जळगाव

Jalgaon Michi Price News : रसगुल्लासह खानदेशी गावरानी मिरचीला मागणी! यंदा लाल मिरचीचे भाव स्थिर

Jalgaon News : रसगुल्ला मिरचीसह खानदेशी गावरानी मिरचीला मागणी चांगली असल्याचे व्यावसायिकांनी ‘सकाळ’ला सांगितले

संजय पाटील

पारोळा : गेल्या वर्षी लाल मिरचीचे भाव सुमारे दीडशे ते शंभर रुपये किलोमागे जास्त होते. त्यामुळे अनेकांना लाल मिरचीचा ठसका जाणवू लागला होता. मात्र, यावर्षी भाव स्थिर आहेत. त्यामुळे लाल मिरचीकडे गृहिणींचा कल वाढला आहे. सोबतच रसगुल्ला मिरचीसह खानदेशी गावरानी मिरचीला मागणी चांगली असल्याचे व्यावसायिकांनी ‘सकाळ’ला सांगितले. (Jalgaon Demand for Khandeshi Gavran Chilli with Rasgulla mirchi)

दरवर्षी पावसाळा सुरू होण्यापूर्वी गृहिणी वर्षभर लाल मिरचीची साठवण करून ठेवतात. त्यामुळे एप्रिल व मे या दोन महिन्यांत लाल मिरची घेणाऱ्यांची संख्या अधिक असते. दरम्यान, दळलेली मिरची व सुकलेली लाल मिरची पावडर याच्या भावात बराचसा फरक जाणवत असतो. त्यामुळे गृहिणी सुकलेल्या लाल मिरच्याच विकत घेतात. त्यानंतर ते ग्राइंडरने दळून वर्षभर ती मिरची घरात कशी राहील, याची काळजी घेतात.

दरम्यान, येथील भाजी बाजारात व मार्केट यार्डमध्ये मिरची विक्रीची अनेक व्यापाऱ्यांची दुकाने आहेत. व्यापारी हे मिरचीच्या वाणाची ग्राहकांकडून येेणाऱ्या मागणीनुसार खरेदी करीत असतात. पारोळा शहरात आठ ते दहा वाणांची मिरची बाजारात दाखल झालेली आहे. त्यात खानदेशी गावरानी व रसगुल्ला या वाणाला गृहिणींचा अधिक कल

दिसून येतो. दरम्यान, कर्नाटक येथील गुलबर्गा व आंध्र प्रदेशातील गंटूर, तर सोलापूरमधून सी फाईव्ह हे मिरचीचे वाण विक्रीसाठी व्यापऱ्यांकडून आणले जातात. दरम्यान, पावसाळ्यापूर्वी शहरासह ग्रामीण भागातील महिला हे लाल मिरची साठवून ठेवतात. विशेष म्हणजे वर्षभर ती मिरची पुरेल, याबाबतचे नियोजनही इतर धान्याप्रमाणेच बरोबर केलेले असते. यंदाही त्यासाठीच सध्या लाल मिरची खरेदीसाठी महिलांची बाजारात गर्दी येत असल्याचे चित्र दिसून येत आहे. (latest marathi news)

मिरचीचे वाण व किलोचे दर खालीलप्रमाणे

सी ५-१६० ते १८०

खानदेशी गावरानी -२५०

इंडिका- २००

दीपिका-२००

बॅडगी-३६०

कश्मीरी-४००

रसगुल्ला-४५०

गंटुर-२००

"ग्राहकांच्या मागणीनुसार मिरचीचे अनेक वाण विक्रीसाठी ठेवण्यात येतात. गेल्या वर्षापेक्षा यावर्षी मिरची घेण्याकडे ग्राहकांचा कल वाढला आहे. त्यामुळे लाल मिरची व्यावसायिक यावर्षी समाधानी आहेत."- दिनेश नावरकर, लाल मिरचीचे व्यावसायिक, पारोळा.

"गेल्या वर्षापेक्षा यावर्षी लाल मिरचीचे भाव स्थिर दिसून येत आहेत. त्यामुळे मिरचीची साठवण दरवर्षापेक्षा यावर्षी दोन ते तीन किलो जास्ती करण्याचे नियोजन आहे."

- प्रतिभा पाटील, गृहिणी, पारोळा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी पंकजा मुंडेंचे मानले जाहीर आभार ! म्हणाले, तू महाराष्ट्राच्या डोळयावरची पट्टी काढली अन् ...

Baba Siddique Murder Case : बाबा सिद्दीकी हत्याकांडातील आरोपी सलमानभाई वोहरा पोलिसांच्या जाळ्यात

Mayawati : 'बसप' इतर पक्षांसोबत मिळून निवडणूक का लढवत नाही? मायावतींनी सांगितले 'हे' कारण

Viral Video: तू T20 संघात राहण्यासाठी पात्र नाहीस... Babar Azam ला फॅन्सने तोंडावर अपमान करताच राग अनावर

Assembly Election: देशात 'चार सौ पार'ला फटका! आता महाराष्ट्रात भाजप ‘बटेंगे तो कटेंगे’मुळे बॅकफूटवर

SCROLL FOR NEXT