Raksha Khadse  esakal
जळगाव

Jalgaon News : ‘त्या’ पाचशेवर ॲप्रेंटिसधारकांना मिळाला न्याय! रक्षा खडसेंबद्दल कृतज्ञता व्यक्त

Jalgaon News : प्रेंटिसधारकांना कामावर घ्यावे, यासाठी खासदार रक्षा खडसे यांनी रेल्वे मंत्रालयाकडे सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर या मागणीला यश आले आणि हजारो तरुणांना हक्काची व सुरक्षित नोकरी मिळाली.

सकाळ वृत्तसेवा

मुक्ताईनगर : रेल्वेतून निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना पुन्हा सेवेत घेण्याऐवजी ॲप्रेंटिसधारकांना कामावर घ्यावे, यासाठी खासदार रक्षा खडसे यांनी रेल्वे मंत्रालयाकडे सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर या मागणीला यश आले आणि हजारो तरुणांना हक्काची व सुरक्षित नोकरी मिळाली. (MP Raksha Khadse continuously followed up with Ministry of Railways to hire apprentices)

या नोकरीने आयुष्य सावरल्याची भावना व्यक्त करताना ही तरुण मंडळी सद्‌गदीत होते. ॲप्रेंटिसधारक तरुण या नोकरीबद्दल रक्षा खडसेंबद्दल कृतज्ञता व्यक्त करीत आहेत. रेल्वेतून निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना पुन्हा सेवेत घेण्याऐवजी ॲप्रेंटिसधारकांना कामावर घ्यावे, अशी भूमिका खासदार रक्षा खडसे यांनी गेल्या टर्ममध्ये लोकसभेत मांडली होती.

त्यासंबंधीची मागणी त्यांनी रेल्वे बोर्डाचे चेअरमन अश्विन लोहानी यांच्याकडे केली होती. गेल्या टर्मच्या काळात २६ ऑक्टोबर २०१७ ला रेल्वे मंत्र्यांना पत्र लिहून रेल्वे ॲप्रेंटिस पूर्ण झालेल्या तरुणांना रेल्वेत संधी मिळावी, अशी मागणी केली होती. (Latest Marathi News)

‘त्या’ तरुणांना न्याय

अनेक ॲप्रेंटिस झालेल्या तरुणांची घरची परिस्थिती गरिबीची आहे व त्यांचे वय वाढत आहे. या पार्श्वभूमीवर निवृत्त कर्मचाऱ्यांऐवजी माणुसकीच्या भूमिकेतून ॲप्रेंटिस झालेल्या तरुणांना संधी मिळावी, असा आग्रह श्रीमती खडसे यांनी धरला आणि त्यासाठी पाठपुरावा केला.

रेल्वेतील सर्व विभागातील ॲप्रेंटिस पूर्ण झालेल्या तरुणांची संख्या सुमारे २१ हजार आहे. ‘ग्रुप डी’ सुरक्षा विभागात सुमारे दीड लाख मनुष्यबळाची कमतरता आहे. ॲप्रेंटिस झालेल्या तरुणांना २० टक्के आरक्षणाच्या अटीतून सवलत मिळावी, अशी मागणी होत होती व जवळपास पाचशेहून अधिक तरुणांना त्यातून नोकरी मिळाली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Court Historic Verdict: देशातील अशी पहिलीच घटना... न्यायालयाने 98 जणांना सुनावली जन्मठेपेची शिक्षा! नेमकं काय घडलं होतं?

Nitin Gadkari: भाजपच्या दुसऱ्या यादीवर कोणाचं वर्चस्व? फडणवीस, बावनकुळे दिल्लीहून थेट गडकरींच्या घरी

Wayanad Loksabha ByElection : ‘बनवाबनवी’त भाजप पटाईत; वायनाडच्या व्हायरल व्हिडिओवरून काँग्रेसचे टीकास्त्र

Maharashtra Assembly Elections 2024 : मोदींच्या सभांचा राज्यात धडाका ?

Bomb Attack : इराक, सीरियावर तुर्किएचा बॉम्बवर्षाव; कुर्दिश दहशतवाद्यांची ठिकाणे केली नष्ट

SCROLL FOR NEXT