Girish Mahajan esakal
जळगाव

Assembly Election : जळगाव जिल्हा भाजप संघटनेत लवकरच ‘ऑपरेशन’; विधानसभा निवडणुकीची पार्श्वभूमी

सकाळ वृत्तसेवा

Assembly Election : वरवर काम करणारे काही पदाधिकारी लोकसभा निवडणुकीच्या संपूर्ण प्रचार प्रक्रियेत निष्क्रिय होते, तर काहींनी अगदी विरोधात काम केल्याचा प्रकार समोर आला आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पाश्वर्भूमीवर पक्षातील नेतृत्वाने त्याची गंभीर दखल घेत जिल्हा भाजपत ‘ऑपरेशन’ करायचे ठरविले असून, त्यात काहींना घरचा रस्ता दाखविण्यात येणार आहे. (district BJP organization will soon launch Operation )

देशभरात भाजपला अपेक्षित यश मिळू शकले नाही. गेली दोन टर्म भाजपच्या स्वबळावर बहुमतापेक्षाही अधिक जागा होत्या. यंदा लोकसभा निवडणुकीत सर्वाधिक फटका पक्षाला उत्तर प्रदेश व महाराष्ट्रात बसला. त्यामुळे एकूणच राष्ट्रीय व राज्य पातळीवर भाजपत संघटनात्मक बदलाचे वारे सुरू झाले आहेत.

राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागली असून, त्यांची अध्यक्षपदाची मुदतही संपली आहे. त्यामुळे नव्या राष्ट्रीय अध्यक्ष निवडीच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. त्या अन्वये प्रदेश पातळीवरही नवीन अध्यक्ष व संघटनेतील बदल अपेक्षित आहेत. परिणामी जळगाव जिल्ह्यातही हे बदल करावे लागणार आहेत.

काहींचे पक्षविरोधी काम

कार्यकारिणीच्या मुदतीनंतर नैसर्गिकरीत्या हे बदल होणार असले, तरी जळगाव जिल्ह्यातील संघटनेत जाणीवपूर्वक काही पदाधिकाऱ्यांना घरी बसविले जाण्याची शक्यता आहे. अर्थात, त्यासाठी नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत काही पदाधिकाऱ्यांनी पक्षविरोधी काम केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. (latest marathi news)

मोठे मताधिक्य तरीही..

जळगाव जिल्ह्यातील दोन्ही लोकसभा मतदारसंघात भाजप-महायुतीच्या महिला उमेदवार अडीच ते पावणेतीन लाखांच्या मताधिक्याने विजयी झाल्या. असे असले तरी संघटनेतील काही पदाधिकारी जाणीवपूर्वक निष्क्रिय राहिल्याचे निरीक्षण नेत्यांनी नोंदविले आहे.

वरिष्ठ पदाधिकारी रडारवर

जळगाव मतदारसंघात तर संघटनेतील प्रमुख पदावरील पदाधिकारी अक्षरश: घरी बसून होता. मतदानाच्या ऐनवेळी तो थोडाफार सक्रिय झाला. मात्र, दिवसा पक्षात सक्रिय आणि रात्री प्रतिस्पर्धी उमेदवारासाठी त्याने छुपे काम केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तर जळगाव मतदारसंघातील एका तालुक्यातील जबाबदार पदाधिकाऱ्याने पक्षनिष्ठेपेक्षा माजी खासदारासोबतच्या मैत्रीला प्राधान्य दिल्याची बाब उघड झाली आहे. हीच स्थिती कमी- अधिक प्रमाणात अन्य तालुक्यांमध्येही पाहायला मिळाली.

जळगावातही निष्क्रियता

जळगाव शहरातही पक्षातील जबाबदार पदाधिकारी व कार्यकर्ते अत्यंत निष्क्रिय होते. आपापल्या प्रभाग, कार्यक्षेत्रापुरते काही प्रचार रॅलींमध्ये ते फिरकले. शहराचे पद असताना, काही जण तर मतदानाच्या दिवशी जबाबदारी घ्यायला तयार नव्हते. काहींनी केवळ नेत्यांसमोर हजेरी लावून सक्रिय असल्याचा देखावा केला. विधानसभा निवडणुकीची तयारी करणारे काही जणही प्रचार प्रक्रियेपासून दूर असल्याचे नेत्यांनी लक्षात घेतले आहे.

रावेरला समांतर यंत्रणेचे काम

रावेर लोकसभा मतदारसंघातही रक्षा खडसे यांच्या उमेदवारीवर नाराज असलेले अनेक पदाधिकारी होते. काहींनी उघड नाराजी व्यक्त केल्यानंतर त्यांची समजूत काढण्यात आली. त्यानंतर त्यापैकी काही जण प्रचारात सक्रिय झाले. मात्र, काहींनी वरवर देखाव्यापुरते काम केले. प्रचारादरम्यान संघटनेतील निष्क्रियता लक्षात आल्यानंतर स्वत: प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मुक्ताईनगर येथे येऊन पदाधिकाऱ्यांची ‘शाळा’ घेतली.

त्यानंतरही काही जण निष्क्रियच होते. त्यामुळे रावेर मतदारसंघात स्वत: एकनाथ खडसे यांना त्यांचे समर्थक, कार्यकर्त्यांची स्वतंत्र व समांतर यंत्रणा कामाला लावावी लागल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे अशा सर्व पदाधिकाऱ्यांची निष्क्रियता पक्ष नेतृत्वाच्या लक्षात आली असून, विधानसभा निवडणूक तोंडावर असताना हे परवडणारे नाही, म्हणून लवकरच जिल्हा भाजपत मोठे ‘ऑपरेशन’ होण्याची शक्यता आहे.

रा. स्व. संघानेही नोंदवले निरीक्षण

रावेर व जळगाव दोन्ही जागांवर भाजप उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी झाले असले, तरी हा विजय जिल्ह्यातील भाजपच्या ‘कमिटेड व्होटर्स’ (हक्काचे मतदार)मुळे झाल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. बूथरचना हीच भाजपची मोठी ताकद आहे. त्या बळावर पक्षाला अपेक्षित यश मिळत असते. दोन्ही जागांवरील विजयात बूथरचनेचे योगदान असले, तरी यंदाच्या निवडणुकीत ही रचना सैल झाल्याचे दिसून आले. संघटनेतील काही प्रमुख पदाधिकाऱ्यांची निष्क्रियता व काहींचे पक्षविरोधी काम याबाबत राष्ट्रीय स्वंयसेवक संघानेही निरीक्षण नोंदवले आहे.

''लोकसभा निवडणुकीच्या एकूणच प्रचार प्रक्रियेत काही पदाधिकारी जाणीवपूर्वक निष्क्रिय होते, तर काहींनी पक्षाविरोधात काम केल्याचे प्रकार समोर येत आहेत. या विषयाची गंभीर दखल घेण्यात येणार असून, अशा पदाधिकाऱ्यांना पदावरून काढले जाईल.''-गिरीश महाजन, ग्रामीण विकास व पर्यटनमंत्री (महाराष्ट्र)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'हा जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार', IND vs BAN सामन्याविरोधात हिंदू संघटना आक्रमक, मालिका रद्द होणार?

Aaditya Thackeray : महायुती गद्दारांचा चेहरा घेऊन विधानसभा लढणार का?

Raj Thackeray: डॉ. अजित रानडेंना कुलगुरु पदावरुन हटवल्यानंतर राज ठाकरेंची पोस्ट; राज्यासह केंद्र सरकारला सुनावले खडेबोल

Sanjay Gaikwad: संजय गायकवाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल; वडेट्टीवारांचा जोरदार हल्ला

दोन टप्प्यात निवडणुका कुठे होणार? सुरत आणि गुवाहाटीला का? शिंदेंच्या वक्तव्यावर आदित्य ठाकरेंची खोचक टीका

SCROLL FOR NEXT