Collector Abhijit Raut felicitating the employees along with their families on the occasion of Revenue Day. esakal
जळगाव

गतिमानतेसोबतच संवेदनशील प्रशासन देवू : Collector अभिजित राऊत

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांनी कोरोना काळापासून सर्वाधिक चांगले काम केले आहे. त्याची दखल राज्य शासनाने घेऊन जिल्हा प्रशासनाला सर्वोत्कृष्ट पुरस्कार दिले आहेत.

कामात गतिमानता आली आहे, आता संवेदनशिल प्रशासन होऊन शेवटच्या घटकाला लाभ देण्यासाठी कार्य करू या, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी सोमवारी (ता. १) अधिकारी, कर्मचाऱ्यांना केले. (Jalgaon district Collector Abhijit Raut statement on revenue day jalgaon Latest Marathi News)

जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे महसूल दिनानिमित्त महसूल अधिकारी व कर्मचाऱ्यांचा उत्कृष्ट अधिकारी, कर्मचारी म्हणून गौरव करण्यात आला. त्यावेळी ते बोलत हेाते.

जिल्हा नियोजन भवनात झालेल्या या कार्यक्रमास जिल्हा पोलिस अधिक्षक डॉ. प्रवीण मुंढे, अप्पर जिल्हाधिकारी प्रवीण महाजन, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया, निवासी उपजिल्हाधिकारी राहुल पाटील, अधिक्षक भूमी अभिलेख एम. पी. मगर, चिटणीस पंकज लोखंडे उपस्थित होते.

जिल्हाधिकारी राऊत यांनी महसूल विभागाने कोरोना काळात केलेल्या कामांचा उल्लेख करीत त्याला मिळालेली सर्वाची साथ, सातबारा संगणकीकरण, माझी वसुंधरा अभियान यासह विविध विभागातील चांगल्या कामांना सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या मिळालेल्या प्रतिसादाचे कौतुक केले. डॉ. आशिया यांनी मनोगत मांडले.

प्रास्ताविकात निवासी उपजिल्हाधिकारी पाटील यांनी महसूल कर्मचाऱ्यांच्या समस्या मांडल्या. तहसिलदार कैलास धावडे, जिल्हाधिकाऱ्यांचे स्वीय सहाय्यक मिलिंद बुवा यांनी सूत्रसंचालन केले.

यावेळी महसूल उपजिल्हाधिकारी शुभांगी भारदे, जिल्हा गौण खनिज अधिकारी दीपक चव्हाण, महसूल उपविभागीय अधिकारी विनय गोसावी यासह ४५ महसूल अधिकारी कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.

महसूल विभागात काम करणे भूषणावह

पोलिस अधीक्षक डॉ. मुंढे म्हणाले, की महसूल विभागाने सर्वच बाबतीत चांगली कामगिरी केली आहे. यामुळे राज्यस्तरावरील पुरस्कार मिळाले आहे. इतर बाबतीत पहिल्या पाच क्रमांकात जिल्हा असतो. नागरिकांची सर्वाधिक कामे पोलिस व महसूल विभागाकडेच असतात. यामुळे हा विभाग सर्वसामान्य प्रशासन विभाग झाला आहे. महसूल विभागात काम करणे हे भूषणावह आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Parliament Session: संसदेचे हिवाळी अधिवेशन 25 नोव्हेंबरपासून, 'या' मुद्द्यांवरुन होणार घमासान

Olympic 2036 च्या आयोजनासाठी भारत सज्ज; IOC कडे पत्र पाठवून व्यक्त केली यजमानपदाची इच्छा

Nagpur AIIMS Recruitment: नागपूर एम्समध्ये विविध विभागांसाठी ‘ग्रुप-ए’ पदांची थेट भरती, पगार २ लाख रुपये; असा करा अर्ज

Gold Investment : महिला आणि संपत्ती: तरुणींमध्ये सोन्यात गुंतवणूक करण्याचा वाढता कल

Latest Marathi News Updates live : जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा रक्षक अन् दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरु

SCROLL FOR NEXT