Jalgaon Lok Sabha Constituency  esakal
जळगाव

Jalgaon Lok Sabha Constituency : 'ड्राय डे' पाळा! अन्यथा परवाने होतील कायमचे रद्द

Lok Sabha Constituency : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ कार्यक्रमानुसार जळगाव जिल्ह्यातील जळगाव आणि रावेर लोकसभा मतदारसंघात १३ मेस मतदान होणार आहे.

सकाळ वृत्तसेवा

पहूर : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ कार्यक्रमानुसार जळगाव जिल्ह्यातील जळगाव आणि रावेर लोकसभा मतदारसंघात १३ मेस मतदान होणार आहे. निवडणूक प्रक्रिया खुल्या, भयमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी संपूर्ण जळगाव जिल्ह्यात मतदान कालावधी संपण्याच्या ४८ तास अगोदरपासून ते मतदान संपेपर्यंत जिल्ह्यातील मद्यविक्री पूर्णत: बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिले आहेत. (Jalgaon stop sale of liquor in district in election duration)

निवडणूक कालावधीत मतदान संपण्याच्या वेळेपूर्वी ४८ तासापासून म्हणजेच ११ मे २०२४ रोजीच्या सायंकाळी सहापासून, मतदानापूर्वीचा एक दिवस म्हणजेच १२ मे २०२४ आणि १३ मेस मतदान प्रक्रिया संपेपर्यंत मद्यविक्री बंद राहील. (latest marathi news)

या आदेशाचे बंद कालावधीत उल्लंघन करुन मद्य विक्री करीत असल्याचे आढळून येणाऱ्या संबंधित परवानाधारकांचे परवाने कायमस्वरुपी रद्द करण्यात येतील, असे राज्य उत्पादन शुल्क विभागाने कळविले असून, पहूर पोलिस ठाण्याचे निरीक्षक सचिन सानप यांनी मद्यविक्री दुकानांवर वर 'वॉच' ठेवला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi Press Conference: 'एक है तो सेफ है' राहुल गांधींनी उघडली तिजोरी अन् निघाला अदानी-मोदींचा फोटो, Video Viral

Latest Maharashtra News Updates : नाशिकमधील रेडीसन ब्लू हॉटेलवर निवडणूक आयोगाची कारवाई

ऋषभ पंतसारखाच आणखी एका क्रिकेटपटूचा भीषण अपघात; गाडीचा झालाय चुराडा...

भावासाठी उदयनराजे मैदानात! 'झुकेगा नही साला' म्हणत, कॉलर उडवत शिवेंद्रराजेंना मताधिक्‍याने विजयी करण्याचं केलं आवाहन

Nawab Malik : मतदानाच्या एक दिवस आधीच नवाब मलिक यांचे 'एक्स' अकाऊंट हॅक

SCROLL FOR NEXT