Dr. Ayush Prasad, the bollworm control technician in Kopus, informed. B. D. jade esakal
जळगाव

Jalgaon News : जिल्ह्यात कापसाची उत्पादकता वाढविण्यासाठी प्रयत्नांची गरज; जिल्हाधिकारी प्रसाद

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : कापूस हे आपल्या राज्यातील महत्वाचे नगदी पिक आहे. ४२ लाख क्षेत्रावर कापसाचे पिक घेतले जाते. जिल्ह्यात कापसाची उत्पादकता खूप कमी आहे (हेक्टरी ३३६ किलो रूई). राज्यात सर्वात जास्त क्षेत्र जळगाव जिल्ह्यात असुन, उत्पादकता कमी आहे.

त्यामुळे कापूस पिकाची उत्पादकता वाढविण्याची खूप आवश्यकता आहे. उत्पादकता आणि बाजारपेठ विचार करावा, असे मागदर्शन जिल्हाधिकारी आयूष प्रसाद यांनी येथे केले.(jalgaon district collector statement to increase productivity of cotton crop jalgaon news)

जागतिक कापूस दिनानिमित्त पळासखेडे मिराचे (ता. जामनेर) येथील दिनेश रघुनाथ पाटील यांच्या कापसाच्या शेतात जैन इरीगेशन, साऊथ एशिया जैव तंत्रज्ञान संस्थेतर्फे (जोधपूर) कापूस परिसंवाद झाला. त्यावेळी ते बोलत होते. श्री. प्रसाद यांनी शेतकऱ्यांसोबत संवाद साधत, उत्पादकता वाढविण्याबाबत अपेक्षा व्यक्त केली.

जैन ठिबकवरील कापूस पिकास भेट दिली. पिकामध्ये गुलाबी बोंडअळी व्यवस्थापनाकरीता वापरण्यात करण्यात आलेल्या जपानी पीबी नॉट तंत्रज्ञानबाबत जैन इरीगेशनचे वरीष्ठ कृषी शास्त्रज्ञ डॉ. बी. डी. जडे यांनी माहीती दिली. कृषी संशोधन केंद्र ममुराबादचे कापूस पैदासकार डॉ. गिरीश चौधरी यांनी जागतिक कापूस दिनाचे महत्व, त्याचा उद्देश यावर माहीती दिली.

कापूसतज्ज्ञ डॉ. संजीव पाटील यांनी कापसाचे वाण निवडीचे निकष, लागवड अंतर, झाडांची संख्या, कापूस पिकातील व्यवस्थापनाबाबत मनोगत व्यक्त केले. डॉ. जडे यांनी कॉटन मिशन २.० मध्ये कापूस पिकाचे उत्पादन कसे मिळवावे. कापूस लागवड गादी वाफा, मल्चिंग फिल्म, ठिबक सिंचन आणि फर्टीगेशनाचा वापर करण्याचा शेतकऱ्यांना आग्रह केला.

उपविभागीय कृषी अधिकारी रमेश जाधव यांनी कृषी विभागाच्या योजना विषद केल्या. करमाडचे प्रगतीशील शेतकरी संजय पाटील अध्यक्षस्थानी होते. त्यांनी कापूस शेतीतील अनुभव सांगीतले. जैन इरीगेशनचे विभागीय व्यवस्थापक दिलीप बऱ्हाटे, विक्री अभियंता मनोज पाटील, जैन ठिबक वितरक दिनेश पाटील, अजय पाटील, सुशांत चतुर, पी. के. पाटील, देवेंद्र पाटील आदी उपस्थित होते. तिर्थराज इंगळे यांनी सूत्रसंचालन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anmol Bishnoi Detained: बाबा सिद्दीकींच्या हत्येचा सूत्रधार अनमोल बिश्नोईला अमेरिकेत अटक

Anil Deshmukh: माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या गाडीवर हल्ला; देशमुख गंभीर जखमी

Mohol Assembly Election : अपक्ष उमेदवार क्षीरसागर यांनी दिला महाविकास आघाडीचे राजू खरे यांना पाठिंबा

हुश्श! प्रचार एकदाच संपला! पंतप्रधान मोदींपासून केंद्रीय मंत्र्यांसह ५ राज्यांचे मुख्यमंत्री अन्‌ सर्वच पक्षप्रमुखांनी गाजविले सोलापूरच्या विधानसभेचे मैदान, कोणाकोणाच्या झाल्या सभा?

43 Fours, 24 Sixes! आयुष शिंदेची Harris Shield स्पर्धेत ४१९ धावांची वादळी खेळी, वाचला सर्फराज खानचा विक्रम

SCROLL FOR NEXT