Jalgaon News : राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता अभियान व स्पर्धा २०२२-२०२३ वर्षाच्या स्पर्धेचा निकाल बुधवारी (ता. १९) जाहीर झाला. (Jalgaon district first in state in Rajiv Gandhi Administrative Mobility Campaign jalgaon news)
विभागीय स्तरावरील निवड समित्यांकडून प्राप्त होणाऱ्या प्रस्तावात जळगावचे जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी संजय गांधी निराधार योजनेचे अनुदान घरपोच वाटप करून राज्यात प्रथम क्रमांकांचे दहा लाख रुपयांचे पारितोषिक मिळविले आहे.
प्रशासनातील सेवांच्या गुणवत्तेमधील वाढ, लोकाभिमुखता व निर्णयक्षमता आणण्यासाठी, तसेच सर्वांच्या सहकार्यातून उत्तम प्रशासन कार्यान्वित करण्यासाठी राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता अभियान व स्पर्धा राबविण्यात येत आहे.
हेही वाचा : What Is Moksha: ‘अण्णा तुमच्या गुरूला मिळाला का मोक्ष?’
बचत गटांना फळझाड प्रकल्पाच्या माध्यमातून स्वयंरोजगाराचे साधन उपलब्ध करून दिल्याबद्दल सर्वोत्कृष्ट अधिकारी गटात एरंडोल नगरपालिकेचे मुख्याधिकारी विकास नवाळे यांना प्रथम क्रमांक मिळाला आहे. त्यांना ५० हजार रुपयांचे पारितोषिक मिळाले आहे.
येत्या नागरी सेवा दिनी शुक्रवारी (ता. २१) सह्याद्री अतिथीगृहात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत पारितोषिक वितरण होणार असून, त्यात या अधिकाऱ्यांना गौरविण्यात येणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.