Books (file photo) esakal
जळगाव

Jalgaon News : मोफत पाठ्यपुस्तक योजनेचा जिल्ह्यात बोजवारा

Jalgaon : महाराष्ट्र शासनाकडून पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तक पुरवठा केला जातो.

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : महाराष्ट्र शासनाकडून पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तक पुरवठा केला जातो. शाळांकडून पाठवल्या जाणाऱ्या यादीप्रमाणे, समग्र शिक्षा योजने अंतर्गत विद्यालयांना मोफत पाठ्यपुस्तके दिली जातात. मात्र, या योजनेचा पुरता बोजवारा उडाल्याची परिस्थिती आहे. शाळांकडून सहा महिन्यापूर्वीच दिलेल्या यादीप्रमाणे नव्या शैक्षणिक वर्षाला पुस्तक वाटपापर्यंत विद्यार्थ्यांची संख्या दुप्पट झाली.(jalgaon district Free Textbook Scheme problem)

मग या वाढीव विद्यार्थ्यांना शाळेकडूनही पुस्तके मिळाली नसून बाजारातही पुस्तकही उपलब्ध नसल्याने पालक मेटाकुटीस आले आहे. शासनातर्फे पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना कायम अनुदानित तुकड्यांसाठी मोफत पाठ्यपुस्तक पुरविली जात असल्याने खुल्या बाजारात दुकानदारांकडे ही पुस्तके मिळत नाही.

दुसरीकडे शासनाच्या समग्र शिक्षा मोफत पाठ्यपुस्तक योजनेतून दिली जाणारी पुस्तके आणि विद्यार्थ्यांच्या संख्येत तफावत असल्याने निम्मे विद्यार्थी पुस्तकाविनाच असल्याची दरवर्षी ओरड होते. यंदा तशीच परिस्थिती असून पुस्तकाविना विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष अडचणीत सापडले आहे. प्राथमिक आणि माध्यमिक शाळांच्या वार्षिक परीक्षा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्या असताना शाळांना वाढीव यादीची पुस्तकेच उपलब्ध झालेली नाहीत.

शिक्षकांची अशीही सर्कस

विद्यार्थी पहिली इयत्तेत असताना शाळेकडून माहिती मागवण्यात येते. संबंधित विभागाकडून त्याच यादीतील विद्यार्थ्यांची नोंद घेतली जाते. नंतर, १ लीचे विद्यार्थी दुसरीत पोहचल्यावर शैक्षणिक वर्ष सुरु झाल्यावर वर्गातील पटसंख्या वाढते. समग्र शिक्षा मोफत पाठ्यपुस्तक योजनेअंतर्गत उपलब्ध झालेली पुस्तके मात्र, त्या शाळांना निम्मीच मिळतात.

उपलब्ध आहेत तीच पुस्तके घेऊन शिक्षकाकडून वाटप होतात. उर्वरित पुस्तके येणार आहेत, असे आश्वासन मुलांना देऊन वर्ष लोटूनही अद्याप त्यांना पुस्तक मिळालेली नसल्याने पालकांनी आता तगादा लावला आहे. परिणामी शाळांनी थेट शिक्षण विभागाकडे बोट केल्याने पालकांचा नाइलाज झाला आहे.

बाजारात पुस्तक भेटेना

मोफत पाठ्यपुस्तक योजनेअंतर्गत शासनाकडून शाळांना पुस्तक पुरवठा होत असल्याने ही पुस्तके खुल्या बाजारात कोणी विक्रीसाठी ठेवत नाही. ठेवल्यास ती, विक्री होत नाही तोवर सिलॅबस बदल होतो. असाच प्रकार गेल्यावर्षी झाल्याने यंदा बाजारात पुस्तकेच उपलब्ध नसल्याने काही पालकांनी झेरॉक्स प्रती काढून घेतल्या आहेत.

यंदाचा गोंधळ

शिक्षण विभाग आणि शिक्षणाधिकाऱ्यांच्या दाव्यानुसार, जिल्ह्यात आणि महापालिका क्षेत्रात प्रत्येक अनुदानित शाळांना पुरेपूर पाठ्यपुस्तक पुरवठा करण्यात आला आहे. मात्र, कागदोपत्री नोंदी तपासल्या असता, शाळांची पटसंख्या आणि मिळालेले पुस्तके यात निम्मा फरक आहे. तर, मोफत मिळालेल्या पुस्तकांत चारपैकी एक किंवा दोनच पुस्तकाची पुर्तता करण्यात आल्याने विद्यार्थी पालक आणि शाळाही गोंधळाच्या स्थितीत सापडल्या आहे.

चार भागांपैकी अशी झाली वाटप (एका शाळेची स्थिती)

पहिली : भाग-१ पटसंख्या २०९ प्राप्त ११० पुस्तके

पहिली : भाग २ प्राप्त ११० पुस्तके (भाग-३ व ४ उपलब्ध नाही)

भाग-३ व भाग-४ उपलब्ध नाही

इयत्ता १ ली ते ४ पर्यंत चार खंड (सेमिस्टर) पैकी दोन किंवा तीनच पुस्तकांचा पुरवठा

शंभर टक्के पुस्तकांचे वाटप

"आमच्याकडून जून-जुलै महिन्यातच संपूर्ण पुस्तकांचे वाटप झालेले आहेत. वाढीव याद्यांप्रमाणे अतिरिक्त पुस्तके मागवून त्याचे वाटप करण्यात आले आहे. शासनाकडून केवळ अनुदानित शाळेच्या विद्यार्थ्यांनाच मोफत पुस्तकांचे वाटप होते. ज्या शाळांची पुस्तके न मिळाल्याच्या तक्रारी आहेत. त्या शाळा अनधिकृतपणे (मंजूर नसलेल्या) तुकड्या चालवत असावेत."- विकास पाटील शिक्षणाधिकारी, जिल्हापरिषद

जळगाव शहर क्षेत्रातील पुस्तक वाटप

इयत्ता........... मराठी माध्यम...........हिंदी माध्यम............उर्दू माध्यम--- एकूण

१ली----------3247---------------३२-----------------1483-------4762

२री -----------3247---------------32----------------1483-----4762

३री-------------3247-------------32-----------------1483---- 4762

४थी -----------3273--------------25----------------1414-----4712

५वी -----------3765--------------64----------------1525-----5354

६वी -----------3822--------------82-----------------1493-----5397

७वी -----------4004-------------134---------------14८0--------5618

८वी -----------4087----------- १४०----------------1480--------5707

एकूण 41 हजार074 पुस्तकांचे वाटप झाले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT