District Milk Union Election esakal
जळगाव

District Milk Union : निवडणूक ‘सहकार’ ची, फैसला राजकीय वर्चस्वाचा

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : जिल्हा सहकारी दूध संघाच्या निवडणुकीसाठी शनिवारी (ता. १०) मतदान पार पडले. शंभर टक्के मतदान झाले आहे. निवडणुकीची मतमोजणी रविवारी (ता.११) सकाळी आठपासून होणार आहे. निकाल एकपर्यंत लागण्याची अपेक्षा आहे.

सहकार क्षेत्राची निवडणूक, त्यातही अल्प मतदारांचे मतदान असले तरी यामुळे जिल्ह्यातील राजकीय वर्चस्वाचा फैसला होणार आहे. यावरच पुढील जिल्हा परिषद व पालिका निवडणुकीतील राजकीय कल दिसून येणार आहे. ( Jalgaon District Milk Union Election Update Jalgaon News)

जळगाव जिल्हा सहकारी दूध संघाची निवडणूक अत्यंत चुरशीची झाली. राज्याचे माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या नेतृत्वाखाली ‘सहकार’ पॅनल व राज्याचे ग्रामीण विकासमंत्री गिरीश महाजन, पाणीपुरवठा मंत्री गिरीश महाजन यांच्या नेतृत्वाखालील ‘शेतकरी’ पॅनलची ही लढत आहे. दोन्ही पॅनलमध्ये राजकीय दिग्गज आहेत. दोन्ही पॅनल असले तरी खऱ्या अर्थाने ही ‘महाविकास’आखाडी विरुद्ध ‘भाजप-शिंदेगट’ अशीच राजकीय निवडणूक आहे. दोन्ही गटाच्या नेत्यांनी आपले वर्चस्व पणाला लावले आहे.

त्यामुळे याकडेही जिल्ह्याचे लक्ष आहे. या शिवाय शिवसेना शिंदे गटाचे आमदार चिमणराव पाटील, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी आमदार डॉ. सतीश पाटील यांनीही पारोळ्यात एकमेकांना आव्हान दिले आहे. जळगावच्या महापौर जयश्री महाजन यांच्या सासू व शिवसेनेनेचे महापालिका विरोधी पक्षनेते सुनील महाजन यांच्या मातोश्री मालतीबाई महाजन यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याविरूद्ध उमेदवारी केली आहे.

हेही वाचा : असा वाढवा तुमचा ‘क्रेडिट स्कोअर’

जिल्ह्यातील दिग्गज आमने-सामने

राज्यात सत्तांतर झाले, शिवसेना फुटली. त्यानंतर सहकार क्षेत्रातील जिल्ह्यात प्रथमच निवडणुका होत आहेत. जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या काळात राज्यात महाविकास आघाडी सत्तेत होती. शिवसेना एकसंध होती. मात्र आता शिवसेना फुटली आहे. राज्यात भाजप आणि शिंदे गटाची सत्ता आहे. या सत्तेत गिरीश महाजन, गुलाबराव पाटील हे दोन मंत्री आहेत. या दोन मंत्र्यांच्या दृष्टीने ही निवडणूक चुरशीची आहेच, परंतु भाजपचे चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांच्या दृष्टीनेही ही निवडणूक महत्त्वाची आहे. त्यांनी थेट महाविकास आघाडीचे नेते एकनाथ खडसे यांना आव्हान देत मुक्ताईनगर तालुक्यातून खडसे यांच्या पत्नी व दूध संघाच्या चेअरमन मंदाताई खडसे यांच्याविरोधात उमेदवारी केली आहे.

महापौर जयश्री महाजन या शिवसेना ठाकरे गटाच्या आहेत. तर गुलाबराव पाटील शिवसेना शिंदे गटाचे आहेत. त्यामुळे या निवडणुकीकडे राजकीय दृष्टीकोनातून पाहिले जात आहे. जिल्हा बँकेचे विद्यमान अध्यक्ष गुलाबराव देवकर यांच्या पत्नी छाया देवकर महिला मतदारसंघातून मैदानात आहेत. राष्ट्रवादीचे आमदार अनिल भाईदास पाटील अमळनेर तालुक्यातून उमेदवार आहेत. त्यांच्याविरोधात भाजपच्या माजी आमदार स्मिता वाघ यांची उमेदवारी आहे. अमळनेर विधानसभेच्या दृष्टीनेच याकडे बघितले जात आहे.

आगामी निवडणुकीची रंगीत तालीम

जिल्हा दूध संघाच्या या निवडणुकीच्या निकालातून सर्व उमेदवार आगामी निवडणुकीसाठी राजकीय ताकद जोखत आहे. ‘सहकार’ क्षेत्रात अल्प मतदार असतात. तसेच पक्ष नसला तरी त्याचा कल कळून येतो, त्यातून आगामी निवडणुकीच्या दृष्टीने तयारीही करणे सोयिस्कर ठरते, असेही सांगण्यात येत आहे. त्यामुळे या निवडणुकीच्या निकालाकडे जिल्ह्याचे लक्ष असल्याचे दिसून येत आहेत. मात्र नेत्यांच्या राजकीय वर्चस्वाचा कलही दिसून येणार आहे. त्यातूनही ‘खोके’ची चर्चा होणारच आहे. निकालानंतर किती खोक्यानंतर किती ‘ओके’ याबाबतचेही आरोप- प्रत्यारोपाच्या फैरी झडणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Municipal Elections: मुंबईत शिवसेनेला उभारी मिळणार? महापालिकेवर महायुतीचा झेंडा फडकणार...

Unsold Player List IPL 2025 Auction: पृथ्वी, शार्दूल ते वॉर्नर यांच्यासह ११० खेळाडू राहिले अनसोल्ड, वाचा संपूर्ण लिस्ट

IPL 2025 Mega Auction: लिलाव संपला! १८२ खेळाडूंसाठी फ्रँचायझींनी खर्च केले ६३९.१५ कोटी रुपये; पाहा खरेदी केलेल्या खेळाडूंची यादी

MLA Rohit Pawar : आपले उद्योग गुजरातला, तेथील ईव्हीएम महाराष्ट्रात

हैतीमध्ये अराजकता! टोळीयुद्धात शेकडो जणांचा मृत्यू, अल्पवयीन मुलांची टोळ्यांमध्ये भरती

SCROLL FOR NEXT