sniffer dogs police esakal
जळगाव

Jalgaon News : जिल्‍हा पोलिस दलाकडे स्निफर डॉगच नाही! मुंबई-हावडा मेल तपासणीसाठी अडचण; तांत्रिक साधनसामग्रीचा वापर

Latest Jalgaon News : या पथकात एक्स्पोझिव्ह स्निफर डॉग (स्फोटके ओळख पटविणारे श्वान) नसल्याची धक्कादायक माहिती ऐनवेळी समोर आली. तरी, तांत्रिक साहित्यांद्वारे संपूर्ण रेल्वेची तपासणी करून गाडी सोडण्यात आली.

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : हावडा-मुंबई मेल टायमर बॉम्ब लावून उडवून देण्याची धमकी सोमवारी ट्विटरद्वारे देण्यात आली होती. रेल्वे विभागाने तत्काळ दखल घेत या प्रकरणी जिल्‍हा पोलिस दलाच्या बॉम्ब स्कॉड (बीडीडीएस) पथकाला पाचारण केले. मात्र, या पथकात एक्स्पोझिव्ह स्निफर डॉग (स्फोटके ओळख पटविणारे श्वान) नसल्याची धक्कादायक माहिती ऐनवेळी समोर आली. तरी, तांत्रिक साहित्यांद्वारे संपूर्ण रेल्वेची तपासणी करून गाडी सोडण्यात आली. (police force Difficulty checking Mumbai Howrah mail)

जिल्‍हा पोलिस दलात स्वतंत्र बॉम्बशोधक व नाशक पथक असून, या पथकाकडे सुसज्ज अशी यंत्रसामुग्री उपलब्ध आहे. सोबतच या पथकात स्फोटक पदार्थांचा वास घेऊन ओळख पटविणारे स्नायफर डॉग असणे गरजेचे असून, या पथकाकडे साधारण एक वर्षापासून स्नायफर डॉग उपलब्ध नाही.

परिणामी, ऐन गरजेच्या वेळेस शेजारील जिल्ह्यांना विनंती करून डॉग मागविण्यात येते. सोमवारी (ता.१४) पहाटे हावडा-मुंबई मेलमध्ये टायमर बॉम्ब ठेवल्याची धमकी देण्यात आल्याची माहिती मिळाल्यानंतर बॉम्ब शोधक व नाशक पथकाशी संपर्क साधल्यावर त्यांनीही अवघ्या २० मिनटांत रेल्वेस्थानक गाठले. दोन तास रेल्वेची तपासणी करण्यात आली. मात्र, या पथकाकडे स्निफर डॉग (श्वान) नसल्याने तसे प्रमाणपत्र देण्यात आले नसल्याची नोंद रेल्वे विभागाने लेखी स्वरुपात घेतली आहे.

बीडीडीएस श्वान शिवाय कार्यरत

जिल्‍हा पेालिस दलाचे बॉम्ब स्कॉड हे गेल्या वर्षभरापासून स्नायफर डॉग शिवाय काम करत आहे. पूर्वी या पथकाकडे दोन तरबेज श्वान होते. मात्र, एकाचा हदयविकाराने व दुसऱ्याचा कावीळ झाल्याने मृत्यू ओढवला. दोन्ही श्वानचा मृत्यू झाल्याने अवघ्या ३ ते ४ महिन्यापूर्वीच पुण्याहून एक श्वान मागविण्यात आला आहे. मात्र, तो अवघ्या तीन महिने वयाचा असून त्याची ट्रेनिंग अद्याप बाकी आहे.

चोविस तास अलर्टवर..

महाराष्ट्र आणि राज्यातील बॉम्ब स्कॉड हे २४ तास बाराही महिने अलर्टवर राहणारा विभाग असून, कधीही कुठल्याही प्रसंगी तपासणीची वेळ येऊ शकते. त्यात जळगाव जिल्‍ह्यास सिमीसारख्या संघटनांचा बट्टा लागला असल्याने सर्व सोयीसुविधांसह दहशतवादविरोधी पथकासह बॉम्ब डिस्पोजल पथक कार्यरत असणे अपेक्षित आहे. बॉम्ब स्कॉडमध्ये १ अधिकारी, १२ कर्मचारी चोविस तास ड्यूटीवर कार्यरत आहे. (latest marathi news)

श्वानाचे आयुष्य

पोलिस किंवा सैन्यदलात उपयोगी पडणाऱ्या या खास श्वानांचे वय अवघे १० ते १४ वर्षे इतके लहान असते. एका प्रकारचे ट्रेनिंग ९ ते १० महिने चालते, संपूर्ण तरबेज होण्यासाठी २ ते ३ वर्षे लागतात. अशा श्वानांचा पेालिस किंवा सैन्य दलास साधारण आठ वर्षांपर्यंत सेवा मिळते. त्यानंतर हे श्वान सेवेतून निवृत्त केले जातात. निवृत्तीनंतर त्यांचे खूप कमी वय शिल्लक राहून २ ते ३ वर्षांतच त्यांचा मृत्यू होत असल्याचे एका तज्ज्ञ अधिकाऱ्याने माहिती देताना सांगितले.

स्नायफर डॉगच्या प्रजाती

स्पोर्टिंग ब्रीड्स स्फोटक शोधण्याच्या कामात वापरल्या जाणाऱ्या सर्वात लोकप्रिय जाती आहेत. या कामात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या जातींमध्ये लॅब्राडोर रिट्रीव्हर्स, जर्मन शॉर्टहेअर पॉइंटर्स, जर्मन वायरहेअर पॉइंटर्स, विझस्लास आणि गोल्डन रिट्रिव्हर्स यांचा समावेश आहे.

"सोमवारी रेल्वे विभागातून माहिती आल्यावर आपण संबंधित अधिकाऱ्यांना श्वान नसल्याबाबत पूर्वसूचना दिली होती. तसेच, शेजारील जिल्ह्यातून मागवावा लागेल, असेही सांगितले होते. मात्र, तेवढा वेळ नसल्याने सुसज्ज यंत्र सामुग्रीद्वारे तपासणी करण्यात आली. एके ठिकाणी डिव्हाईस आढळले ते रेल्वेचेच असल्याची खात्री झाल्यावर गाडी सोडण्यात आली. आपल्या पथकात नव्याने एक श्वान दाखल झाला असून, तो तीनच महिन्याचा असून, त्याचे प्रशिक्षण अद्याप पूर्ण झालेले नसल्याने त्याचा वापर होत नाही."- अमोल कवाडे, प्राभारी अधिकारी, बीडीडीएस

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rickshaw meter fraud Video: रिक्षाच्या मीटरमध्ये कसा होते फ्रॉड? मुंबई पोलिसांचा लाईव्ह डेमो, क्षणात ओळखा फसवेगिरी

India vs Oman: भारताची विजयी हॅट्ट्रिक; Asia Cupच्या उपांत्य फेरीत धडक

Pune Crime : रविवार पेठेतील ज्वेलर्सच्या दुकानातून पावणेदोन कोटींचे दागिने चोरी

Pune Crime : पाषाण, सदाशिव पेठेतील ज्येष्ठ नागरिकांची ७० लाखांची फसवणूक

Pune Helmet mandatory: पुणे विभागात हेल्मेटसक्ती! विभागीय आयुक्तांचे निर्देश; दुचाकीवर मागे बसणारालाही नियम पाळावा लागेल

SCROLL FOR NEXT