Unmesh Patil esakal
जळगाव

Jalgaon News : जिल्हा दुष्काळसदृश्‍य दाखविल्याने होरपळ : उन्मेश पाटील; जिल्ह्यातील तिन्ही मंत्र्यांनी राजीनामा द्यावा

Jalgaon News : माजी खासदार पाटील म्हणाले, की लोकसभा निवडणुकीच्या मतदानानंतर आचारसंहिता शिथील करून याबाबत प्रशासनला उपायोजना करण्याचे आदेश देण्याची गरज होती

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : जिल्ह्याचे तापमान राज्यात सर्वांत जास्त आहे. वाढत्या तापमानामुळे उष्माघाताने नागरिकांनी जीव गमावले आहेत. अनेक तालुक्यांतील गावात पाणीटंचाई असून, पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न गंभीर झाला आहे. जनावरांना चारा नसल्याचे शेतकऱ्यांना चिंता आहे.

अशा स्थितीत जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करण्याची गरज होती. मात्र, तो दुष्काळसदृश्‍य जाहीर झाला. त्याच्याही उपायोजना शासनाच्या अध्यादेशाप्रमाणे करण्यात आलेल्या नाहीत. याबाबात जिल्ह्यातील तिन्ही मंत्री अपयशी ठरले आहेत. त्यांनी तत्काल राजीनामा द्यावा, तसेच जिल्ह्यात दुष्काळाच्या उपाययोजना कराव्यात, अन्यथा महाविकास आघाडीच्या माध्यमातून ४ जूननंतर तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा माजी खासदार, शिवसेना (उबाठा) पक्षाचे उन्मेश पाटील यांनी येथे झालेल्या पत्रकार परिषदेत दिला. (Jalgaon district troubled by drought Unmesh Patil)

माजी खासदार पाटील म्हणाले, की लोकसभा निवडणुकीच्या मतदानानंतर आचारसंहिता शिथील करून याबाबत प्रशासनला उपायोजना करण्याचे आदेश देण्याची गरज होती. मात्र, पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी कोणतीही भूमिका घेतली नाही. त्यामुळे प्रशासन ठप्प आहे. कर्जवसुली करून शेतकऱ्यांवर अन्याय केला जात आहे.

कापूस उत्पादकांना भावांतर फरक तत्काळ द्यावा. दूध उत्पादकांना पाच रुपये फरक भाव द्या. मुख्यंमत्री एकनाथ शिंदे यांच्या जवळचे पालकमंत्री गुलाबराव पाटील आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याजवळचे मंत्री गिरीश महाजन आहेत. मदत व पुनवर्सन मंत्री अनिल भाईदास पाटीलही जिल्ह्यातीलच आहेत. तिन्ही मंत्र्यांनी जिल्ह्यातील जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात तीन हजार विहिरी, शेततळे केलेली नाहीत. (latest marathi news)

यामुळे तिन्ही मंत्र्यांनी राजीनामे द्यावेत. आपण विहिरी व शेततळे अध्यादेशानुसार करून देण्यास तयार आहोत. जिल्हा सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ, जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, महानगरप्रमुख शरद तायडे, माजी महापौर जयश्री महाजन, लक्ष्मण पाटील आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: घाटकोपर पूर्व विधानसभा मतदार संघात कोणी घेतली आघाडी ? भाजप विरुद्ध शरद पवार गटात थेट लढत

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: मावळमध्ये सुनील शेळके यांची दणदणीत आघाडी

Maharashtra Assembly Election Result : महायुती सत्तास्थापनेजवळ; महाविकास आघाडीचीही कडवी झुंज

नुकतीच पार पडलेली ब्राइड टू बी पार्टी; आता बॅचलर पार्टीसाठी थायलंडला पोहोचली मराठी अभिनेत्री; पाहा झक्कास फोटो

Winter Diet: आहारात 'या' 5 पदार्थांचा करा समावेश, हिवाळ्यात राहाल निरोगी

SCROLL FOR NEXT