जळगाव ः जिल्ह्यात दहा ते १२ दिवसांपासून पावसाने (Rain) ओढ दिली असून, पेरण्या (Sowing damage) वाया जाण्याची भीती व्यक्त होत आहे. दुबार पेरणीची टांगती तलवार शेतकऱ्यांवर (Farmer) आहे. दुसरीकडे तापमान वाढल्याने (Increase temperature) धरणातील (Dam) पाण्याचे बाष्पीभवन होऊन पाणीसाठ्यात घट होतेय. टंचाईग्रस्त गावांची संख्याही पाचवरून आठवर गेली आहे. पाऊस लांबल्याने पाणीटंचाईकडे अधिक लक्ष जिल्हा प्रशासनाला द्यावे लागणार असून, जिल्हा प्रशासनाची चिंताही वाढली आहे. ( jalgaon district water scarcity water tankar increase)
पावसाळा सुरू झाला असला, तरी दहा ते १२ दिवसांपासून जिल्ह्यात पावसाने ओढ दिली आहे. जुलैचा पहिला आठवड्यातही पाऊस न झाल्याने जिल्ह्यातील विविध प्रकल्पांतील साठा दिवसेंदिवस कमी होत आहे. जिल्ह्यातील हतनूर, गिरणा, वाघूर या तीन मोठ्या प्रकल्पांसह १३ मध्यम व ९६ लघु प्रकल्पांचा, प्रकल्पीय उपयुक्त साठा ५०.४०६ टीएमसी आहे. या प्रकल्पांमध्ये आजमितीस अवघा १६.०१ टीएमसी म्हणजेच ३१.७६ टक्के उपयुक्त साठा आहे. मागील वर्षी आजच्या दिवशी ३९.९५ टक्के इतका म्हणजेच ८.१९ टक्के साठा अधिक होता.
सध्या जिल्ह्यातील तीन मोठ्या प्रकल्पांत अवघा १३.२५ टीएमसी उपयुक्त साठा आहे. १३ मध्यम प्रकल्पांमध्ये २.२० टीएमसी, ९६ लघु प्रकल्पांत ०.५६ टीएमसी उपयुक्त साठा आहे.
जिल्ह्यातील धरणातील उपयुक्त साठा
हतनूर : १.६० टीएमसी (१७.७३ टक्के)
गिरणा : ६.१६ टीएमसी (३३.३१)
वाघूर : ५.५० टीएमसी (६२.६६)
अभोरा : ६६.७७ टक्के
मंगरूळ : ४६.१७
सुकी : ७२.२१
मोर : ५४.०२
तोंडापूर : ४१.९३
बहुळा : १९.९३
अंजनी : १९.३१
गुळ : २६
मन्याड : १७.४७
भोकरबारी : १५.१२
सुकी, भोकरबारी धरण क्षेत्रातही चांगला साठा आहे.
टँकर सुरू असलेली गावे
भुसावळ (दोन गावे- दोन टँकर), भडगाव (एक- एक टँकर), पारोळा (चार गावे- पाच टँकर). कंडारी, कुऱ्हे पानाचे (ता. भुसावळ), मळगाव (ता. भडगाव), खेडी ढोक, खोलसर, हनुमंतखेडे, खोलसर (ता. पारोळा). तळई (ता. एरंडोल), शेलवड, राजूर (ता. बोदवड), वाडी, अटलगव्हाण, कुऱ्हाड खुर्द, शेळावे (ता. पाचोरा), कोळपिंप्री, सार्वे बुद्रकु रामनगर (ता. पारोळा), हंबर्डी, अट्रावल, सांगवी बुद्रुक, महेलखेडी (ता. यावल) येथे विहीर खोलीकरणाची कामे सुरू आहेत. भोंडणदिगर (ता. पारोळा) येथे नळ पाणीयोजनेच्या विशेष दुरुस्तीचे कामे सुरू आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.