bullet firecracker sound and police esakal
जळगाव

Jalgaon: गर्दीच्या रस्त्यांवर बुलेटचे ‘फटाके’ नको फोडू रे भाऊ! पोलिसांची करडी नजर; इम्प्रेस करण्यासाठी फटाक्यांचा नाद

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon : शान की, सवारी म्हणून ओळख असलेली बुलेट मोटारसायकल आता गुंड, गुन्हेगार आणि टारकट तरुणांची आयकॉन बनली आहे. सायंकाळची वेळ, सामसूम कॉलन्यांमधून बुलेटस्वार तरुण कर्णकश आवाजाने वाहने दामटून आपली उपस्थिती दर्शवतात, तर काही बुलेटस्वारांना अजूनही फटाक्यांचा नाद सुटता सुटेना. वाहतूक शाखेसह संबंधित पोलिसही अशा वाहनधारकांवर कारवाई करतात. मात्र, अशा वाहनधारकांचा उपद्रव काही कमी होत नाही. (Dont burst firecrackers sound of bullets on crowded roads)

जळगाव शहरातील महाविद्यालयीन परिसर, रहिवासी कॉलन्या आणि गर्दीचे रस्ते, अशा कुठल्याही ठिकाणी कर्णकश अवाजाच्या सायलेन्सचा उपद्रव कायम आहे. त्यात बुलेटस्वारांचा रुबाब तो वेगळाच साधारण साडेतीनशे ते पाचशे सीसीपर्यंतची अवाढव्य शक्ती असलेले इंजिन असलेल्या या दुचाकीचा इंधनखर्च सर्व सामान्यांना परवडणारा नाही.

कधीकाळी फक्त सैन्यदलात वापरात असलेली बुलेट नंतर पोलिस अधिकारी आणि सध्या महाविद्यालयीन तरुण, टार्गेट पोरे, गुन्हेगारी क्षेत्राशी निगडित व्यक्ती बुलेटच्या प्रेमात जास्त आढळून येतात. ज्यांच्याकडे बुलेट नाही, अशांनी नव्वदच्या दशकात तरुणांचे हदय काबीज करणारी याहमा दुचाकी पर्याय म्हणून निवडली आहे.

टुस्ट्रेाक शंभर सीसी इंजिनक्षमता असलेली ही दुचाकी आजही तरुणांना वेड लावते ती त्याच्या सायलेन्सरच्या अवाजामुळेच. दूरपर्यंत एकसारखा आवाज येणारी यामाहा आजही वापरात आहे. अशा या दुचाकीच्या कानठळ्या बसविणारे कर्णकर्कश सायलेंसर पूर्वीपासूनच फॅशनमध्ये आहे. यामुळे होणारे ध्वनिप्रदूषण करत सुसाट पळणाऱ्या चालकांना मात्र कारवाईचा दंडुका सोसावा लागणार आहे.

फटाक्यांसह आग ओकणारे सायलेन्सर

कोणत्याही वाहनाला सायलेन्सर बसविताना ध्वनिप्रदूषण होणार नाही, याची काळजी कंपनीकडून घेतली जाते. मात्र, काहींना नियम मोडल्याशिवाय जगताच येत नाही. त्यात सालेन्सरमध्ये तांत्रिक बदल करून त्यातून कर्णकश आवाज काढण्यासाठी सायलेन्सरच्या आतील ग्लास ऊल काढून जाळी आपल्यावर आवाज वाढतो, तर बुलेटच्या सायलेन्सरमध्ये जाळी नसल्याने स्ट्रेाक वाढवून फटाके फोडता येतात.

आता याच सायलेन्सरमधून फटाक्यासह आग ओकणारे सायलेन्स ऑनलाईन आणि स्थानिक मॅकेनीककडून बदल करून मिळत आहे. असे सायलेन्सर वापरणाऱ्यांना एक हजार रुपयांचा दंड करण्यात येतो. (latest marathi news)

मासिक दंडात्मक कारवाई अशी

जानेवारी : ५

फेब्रुवारी : ७

मार्च : ३

एप्रिल : ४

मे : ४

जून : ७

जुलै : ५

संक्रमित परिसर

बुलेटस्वारांच्या फटाक्यांनी संक्रमित परिसरात काव्यरत्नावली चौक ते डी-मार्ट, एम. जे. कॉलेज मुख्य रस्ता, आयएमआर कॉलेज, मेहरुण चौपाटी, पिंप्राळा रोड, गोविंदा रिक्षास्टॉप ते रेल्वेस्थानक रोड, स्वातंत्र्य चौक, रिंग रोडचा परिसर, अशा विविध रस्त्यांवर सायंकाळी सुसाट पळणारे दुचाकीस्वार केव्हा फटाके फोडून दिसेनासे होतात.

सायलेन्सर जप्ती मोहीम हवी

मोठ्या आवाजाचे सायलेन्सर बसविलेल्या दुचाकी पकडून त्यांचे सायलेन्सर काढण्यात येते. यामध्ये यापूर्वीही असे सायलेन्सर जप्त करून ते नष्ट करण्यात आले होते. वर्षभर वेगवेगळ्या भागात ही कारवाई सुरू असते.

कारवाई सुरूच : डी. डी. इंगोले

कर्णकर्कश्‍श आवाजाच्या सायलेन्सरवर रोजच आम्ही कारवाई करतोय. बुलेटच्या बाबतीत उलटेच होते. काही सज्जन लोकांकडेही हे वाहन असून, कंपनीनेच दिलेले सायलेन्सर लावलेले आढळून येतात. तरी तक्रारी असणाऱ्या मार्गावर ठरवून कारवाई करण्याच्या सूचना कर्मचाऱ्यांना दिल्या आहेत. फटाके फोडणाऱ्यांची तर गय नाही,, असे डी. डी. इंगोले यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींचे टपालात दीड लाख खाती; जिल्हाभरातील महिलांची पसंती

IND vs NZ, Test: जड्डू मानलं तुला! किवींच्या दोन फलंदाजांचे उडवले त्रिफळे, भारताचे दमदार पुनरागमन

Model Code Of Conduct: विधानसभेचा धुरळा... आचारसंहितेत काय करता येते अन् काय नाही? जाणून घ्या एका क्लिकवर

Ratan Tata: कोणाला मिळणार 7,900 कोटी रुपये? रतन टाटांच्या मृत्यूपत्राची अंमलबजावणी कोण करणार?

Rishabh Pant कसोटी मालिकेला मुकण्याची चिन्ह; तिसऱ्या दिवशी मैदानावर नाही आला, BCCI ने दिले अपडेट्स

SCROLL FOR NEXT